नातं विश्वासाच की..? भाग - अंतिम भाग

प्रेम, मैत्री, विश्वास
भाग -3 अंतिम भाग.

संपदा तडक उठते आणि बॅग लावुन निघते, कुठे गेला काहीच तिला माहित नसतं.

ती त्याला फोन लावते, पण तो कॉल घेत नाही. सकाळची दुपार होते, दुपारची संध्याकाळ होते तरी त्याचा काही फोन नाही किंवा मॅसेज नाही.

तेवढ्यात तिला मुग्धाचा कॉल येतो, मुग्धाचा कॉल पाहुन तिला भरून येतं. ती कॉल घेते, तिच्या आवाजाने मुग्धाला काही तरी बिनसल्याच जाणवतं.

" काय गं काय झालं..? आवाज असा का..? सगळं ठीक आहे ना..? " मुग्धा अनेक प्रश्न करते.

" अगं बघ ना मि आज विशाल च्या घरी गेली पण विशाल मला काही न सांगता बाहेर गेलाय. का गेला, कशासाठी गेला काहीचं बोलला नाही. " संपदा सांगते.

" तु त्याला फोन केलेलास का..? तु आता त्याला कॉल लाव आणि विचार.. " मुग्धा बोलते.

" नाही मि कॉल केला पण तो कॉल घेत नाही, मला तर वेगळीच भिती वाटतेय.. " संपदा बोलते.
आणि ती पुन्हा रडु लागते, मुग्धा तिला समजावते शांत करते आणि घरी जायला सांगते.

मुग्धाला विशालवर काडीमात्र विश्वास नव्हता, आणि मैत्रीण म्हणुन तिच्यासाठी जीव तुटत होता.

बरेच दिवस होतात पण संपदा आणि विशालचा काहीच कॉन्टॅक्ट झालेला नसतो. त्याने संपदा जरा डिप्रेशन मध्ये जाते आणि दिवस रात्र कामं आणि घरी आली की शांत पडुन राहायचं.

संपदाच्या आईला तिची ही परिस्थिती पाहवत नव्हती, अचानक मुग्धाचा सकाळी सकाळी संपदाला कॉल येतो, " तु घरी आहेस ना..? कुठे ही जाऊ नकोस आपल्याला लग्नाला जायचंय पटकन तयार हो.. "

" लग्न कोणाचं..? माझा मुड नाही तु जां.. " संपदा बोलते,
आणि फोन ठेवते. काही वेळातच मुग्धा संपदाच्या घरी पोहचते.

" हे काय तु अजुन तयार नाही झाली, तु उठ आणि छान ड्रेस अडकव.. " मुग्धा बोलते.

" कोणाचं लग्न, माझा मुड नाही आणि तुझ्या ओळखीच्या लग्नाला मि का येऊ तु जा.. " संपदा तिला जायला सांगते..

मुग्धा तिला कसं बस तयार करते आणि सोबत लग्नाला घेऊन जाते, छान मांडव सजलेला, पिवळी, गुलाबी, लाल फुले. आत्ताराचा वास, सनई चौघडे वाजत होते.

मुग्धा तिला आत घेऊन जाते, समोरच नवरा नवरी एकमेकांना हाल घालणार होते, तेव्हा मुग्धा तिला स्टेज जवळ घेऊन जाते, " पहा सामोरं.. " ती संपदाला बोलते.

संपदा मान वर करते आणि तिला धक्काचं बसतो, सामोरं नवरा म्हणुन विशाल उभा असतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते.

तिच्या डोळ्यांतुन पाणी येतं, पापन्या ओलावतात ती तशीच बाहेर येते आणि ढसाढसा रडु लागते, आधी काही वेळ मुग्धा काहीचं बोलतं नाही.

मग शांतपणे मुग्धा बोलते, " पाहिलंस ना, तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास होता पण तोही चुकीचा ठरला. जेव्हा तु मला म्हटलंस ना तेव्हाच मि समजुन गेली आणि ह्याला शोधून काढलं.. पण मि जर तुला फोन वर हे सांगितलं असतं ना तर कदाचित तुझा विश्वास बसला नसता. म्हणुन तुला स्पष्ट दाखवलं.. "

" मला माझ्या प्रेमावर विश्वास होता पण त्याने तो तोडला, का केलं असेल त्याने असं एकदा तरी सांगायचं. " आणि संपदा हुंदके देऊन रडु लागते.

मुग्धा तिला जवळ घेते, तिला धीर देते," मि इतकंच सांगेन विसर त्याला आणि पुढे हो कुडत राहुन तु तुझंच नुकसान करशील.. तो तर त्याच्या आयुष्यात पुढे गेला, तु मात्र पाठी राहू नकोस.. "

खरंच प्रेमात विश्वास असावा पण आंधळा विश्वास नसावा..

समाप्त...


🎭 Series Post

View all