अध्यात्म

कविता

जातीपातीच्या भिंती दुर सारून
आधी धर्म समजून घ्या रे
माणसाने माणसाशी माणसासारखे
वागण्याचे धैर्य दाखवून द्या रे ....१

दुःखी आणि कष्टी लोकांना
हात मदतीचा देऊ रे
तंटा , मतभेद सारे विसरून
आपण सुखी होणार रे.....२

अध्यात्माचा मार्ग कोणता?
कळलाच नाही कधीही रे
मुर्खासारखे वागून कधीतरी
स्वतः च मुर्ख बनतो रे....३

कनिष्ठ, वरिष्ठ हा भेद नको
सद्भावना मनात जपू या रे
संत , महात्मे यांच्या संगतीने
जीवन अपुले घडवू या रे....४

जीवदया अन् भुतदयेची
सांगड घालून जगू या रे
प्रेम ,आदर, कर्तव्याची
वचने सारी निभवू या रे...५

खेळ नशीबाचा ना कळे कोणाला
वेळेच महत्व जाणून घेऊ या रे
मनुष्य जन्म ना मिळे पुन्हा रे
या जन्माचे सार्थक करून या रे....६

©®अश्विनी मिश्रीकोटकर