आमची शाळा

ईरा : शब्दांची शाळा
आमची शाळा

आम्हा मनापासून आवडते ही शाळा
लाविते सगळ्यांंना शिक्षणाचा लळा

माळरानावर वसली ही शाळा
रम्य परिसर आजूबाजूला शेतीचा मळा

वृंदावन नाना फुलांनी फुललेली
मुलांची मने कायम हसलेली

शिक्षक म्हणजे आमचे गुरु
आम्हा सर्वांचे सौख्याचे सागरु

मुले - मुली वागतात समसमान
शाळा आहे आमची म्हणून महान

केवळ शिक्षण हाच शाळेचा ध्यास
सर्व कलागुणांचा होतो येथे विकास

सुबत्तेचे मुलावर होतात संस्कार
उत्तम चारित्र्याला मिळतो सुंदर आकार

अशी आमची स्वच्छ सुंदर शाळा
नेहमीच भरतो येथे शिक्षणाचा मेळा

©®नामदेवपाटील