आंबट गोड हरभरा डाळ

आंबट गोड हरभरा डाळ रेसिपीज इन मराठी
आंबट गोड हरभरा डाळ
साहित्य
एक वाटी हरभरा डाळ, एक लिंबू, हळद, मीठ, हिरवी मिरची, फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग.
कृती
प्रथम हरभरा डाळ स्वच्छ धुऊन पाच-सहा तास भिजत घाला. भिजल्यानंतर पाणी निथळून त्यात हिरवी मिरची, लिंबू रस, कोथिंबीर, मीठ घालून मिक्सरमधून काढून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा. एका पातेल्यात वाटलेली हरभरा डाळ घेऊन त्यावर तयार केलेली फोडणी घाला. ही आंबट गोड हरभरा डाळ भाकरी किंवा चपाती सोबत छान लागते.

२)टोमॅटो,बेसन रोल
साहित्य
एक वाटी बेसन, अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस, तीन मोठे टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, मीठ, हळद. फोडणीसाठी तेल. मोहरी, कढीपत्ता,हिंग.
कृती
प्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन वाफवून घ्या. त्याची साल काढून टाका. हे वाफवलेले टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या घालून मिक्सर मधून काढून घ्या. एका पातेल्यात बेसन, चवीपुरते मीठ, किंचित साखर व तयार केलेला टोमॅटोचा गर घालून बेसन चांगले एकजीव करून घ्या. गॅसवर कढई ठेवून हे तयार केलेले मिश्रण टाका व चांगले शिजू द्या. खोलगट ताटाला थोडे तेल लावून त्यावर हे शिजवलेले बेसन टाका. वरून ओल्या नारळाचा कीस व कोथिंबीर पसरवा. तेलाची, मोहरी कढीपत्ता हिंग घालून फोडणी तयार करा व ती बेसनावर ओता. थंड झाल्यावर सूरीने कापून त्याचे रोल तयार करा.व खायला घ्या.
चला तर मग करा रेसिपीला सुरुवात.
मस्त खा.
स्वस्थ रहा. व्यस्त रहा.
सौ. रेखा देशमुख