आम्ही बाई सूना भाग 3

कहाणी नव्या वळणावर.

आम्ही बाई सूना भाग 3


मागील भागात आपण पाहिले आपल्या मैत्रिणीच्या भाचीमध्ये रंजुताईंना आपली भावी लाडकी सून दिसते. इकडे संजनाची आई काहीही करून तिचे लग्न ठरवायचे असा चंग बांधते. आता पाहूया पुढे.


"आई, चील यार. संजू हुशार आहे. करेल सगळे मॅनेज." पार्थ हसून म्हणाला.

" हो का? थांब संध्याकाळी तिच्या हातचा चहा पी." सुरेखाताई म्हणाल्या.

"ये नाही हा आई. तुला काय पाहिजे ते कर." पार्थ रागाने निघून गेला.

तिकडे संजू ऑफिसात पोहोचली. आज एका दुसऱ्या कंपनीतून प्रतिनिधी प्रेझेंटेशन द्यायला येणार होते. संजू आणि तिचे बॉस कॉन्फरन्स रूममध्ये आले.


तिथे उभा असलेला जवळपास पाच फूट दहा इचं उंच,सपाट पोट आणि धारदार नाक,काळेभोर डोळे, दाट केस आणि रुंद खांदे,गालावर पडणारी खळी. संजूच्या मनात गाणे वाजायला लागले.

तुम्हे जो मैने देखा!"


"संजना, मिस संजना प्लीज टेक अ सिट." त्याचा आवाज ऐकून संजुची विकेट गेली.



प्रेझेंटेशन संपले आणि संजना भानावर आली. मिस्टर समीर रविंद्र मांडेकर . संजना ते नाव मनाशी घोळत घरी आली.


"मॉम, मॉम कुठे आहेस तू?" संजना ओरडत घरात शिरली.


"तायडे,आई घरात नाहीय." पार्थचे उत्तर आले.

"मला तायडे म्हणू नको हा! माझ्यासारख्या मॉडर्न मुलीला ते मॅच नाही होत."


तेवढ्यात संजनाला आठवले आज तिला खोया पनीर रेसिपी ॲपवर अपलोड करायची होती.


किचनमध्ये जाताना ती म्हणाली,"पार्थ,मी कॉफी बनवत आहे."


"काय? ॲपवर दर्शकांना चव कळत नाही. माझ्यावर प्रयोग नको. तुझी कॉफी तूच पी."


पार्थ आपल्या खोलीत निघून गेला. संजना नाक उडवत किचनमध्ये शिरली.


इकडे सारिका आणि मेघा दोघींना संजना कोण आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. चक्क सासूबाई जीची स्तुती करत आहेत ती आहे तरी कोण?


"मेघा,कोण असेल ही संजना?" सारीकाने पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न केला.


"नाही आपल्या आईंच्या नातेवाईक मुलींमध्ये कोणीही संजना नाहीय."
अशी चर्चा चालू असताना समीर आला.


"अय्या भाऊजी,कधी आलात. थांबा चहा करते." मेघा पटकन म्हणाली.


"मेघा वहिनी काय यार? ते भाऊजी नको."


"आमच्यात दिराला नावाने हाक मारत नाहीत ह मेघा!" सारिकाने नक्कल केली.


"अच्छा,सासूबाई घरी नाहीत म्हणून ह्या दोन सूना मजा करत आहेत तर!"

समीर हसून फ्रेश व्हायला गेला. सारिका त्याला कॉफी घेऊन आली.

मेघाने चीज ग्रिल सँडविच पुढे सारत हळूच विचारले ,"काय मग समीर,आम्हाला छोटी जाऊ कधी येणार?"


तो प्रश्न ऐकल्यावर समीरने सँडविच खाली ठेवले. त्याला मनोज आणि अमेय दोघांनी दिलेला इशारा आठवला.


"सम्या,दोन्ही वहिनी आणि आई कोणालाच काही प्रॉमिस करायचे नाही."


तसेही त्याला सकाळी भेटलेली संजना आवडली होती.


"समीर भाऊजी आम्हाला नाही सांगणार का?" सारीकाने कॉफी देताना विचारले.


"सम्या,बकरा कापताना खाऊ घालतात विसरू नको." अमेय आत येत ओरडला.


" समीर भाऊजी हुशार आहेत. चांगले एम बी ए आहेत. इंजिनियर नाहीत म्हंटले."
मेघा डोळे मोठे करून म्हणाली.


"मेघा वहिनी,तू स्वतः पण इंजिनियर आहेस." समीर मोठ्याने हसला.


"हे हसायचा गुण कुठून आला रे तुमच्यात?" सारिका ओरडली.


"नाहीतर काय? हिटलर तर चेहऱ्यावर असलेली एक रेष हलवत नाही." मेघाने दुजोरा दिला.


" मेघा, आई शाळेत हसतमुख शिक्षिका म्हणून प्रसिद्ध होती." अमेय तिला चिडवत म्हणाला.

"होती,अमेय होती. भूतकाळ झाला तो." मेघाने उसासा टाकला.


"पण आई गेलीय कुठे?" सँडविच संपवत समीर म्हणाला.


"सांगा ह्या बाळाला. समीर घरात आल्यावर पहिले आईला शोधायचे थांबव. लग्न होईल तुझे आता." सारिका रागावली.


तेवढ्यात आई!आई! ओरडत मनोज घरात शिरला.


"घ्या आले श्रावणबाळ ." सारिका पुटपुटली.

सगळे हसायला लागले.

"काय झाले दात काढायला ? आई कुठे गेली सांगा आधी?"


मनोज ओरडला.

"आख्खी बायको इथे उभी आहे ती नाही दिसत वाटते तुला. " सारिका फणकाऱ्याने म्हणाली.


" बर,जयश्री काकू येणार आहेत. त्यांनी मला निरोप दिला कारण आई फोन उचलत नाहीय." मनोजने सांगितले.


" मनोज ऐक ना ! " अचानक बदल झालेला टोन पाहून मनोज सावध झाला.

"काय हवे आहे?" त्याने विचारले.


" आईंच्या माहेरी कोणी संजना आहे का रे ?" सारिका शेवटी बोललीच.


" नाही,कोणी संजना नाही. " मनोज उत्तरला.

"दादा,अरे ती शेजारच्या विमल काकूंची संजी विसरला का तू?" अमेय समीरकडे बघत म्हणाला.

मनोजने हाताच्या उलट्या मनगटाने नाक पुसायची कृती करून उत्तर दिले,"हो, रे . आजी तिला नातसून म्हणायची."


सारिका वाऱ्याच्या वेगाने चार सँडविच आणि दोन कॉफी घेऊन आली.


"मनोज,ती संजना आता कुठे असते? तिचे लग्न झाले का?" तेवढ्यात समीर रागाने पाय आपटत निघून जायला उठला.

त्याला अमेयने हाताला धरून खाली बसवले.

"सम्या अरे तुझ्या पहिल्या गर्लफ्रेंडविषयी बोलतोय तू कुठे चालला?"


"गप हा दादा,ती शेंबडी माझी गर्लफ्रेंड नव्हती. वहिनी काय यार? संजना कुठून आणली तुम्ही मध्येच?" समीर चिडला.


" कारण मी केलेली दलगोना कॉफी पिऊन आई चक्क म्हणाल्या कॉफी छान झाली हा संजना."
सारिका हुबेहूब नक्कल करत म्हणाली.


तेवढ्यात रविंद्र घरात आला.

"इथे मैफिल बसली म्हणजे हेड मास्तर बाई घरी नाहीत." त्यांनी हसून विचारले.

"बाबा, आई त्यांच्या सासूला घाबरत का हो?" मेघा न राहवून बोललीच.


" आईला इकडे करमत नसे. त्यामुळे ती गावी राहायची. आजही ती राहते तशीच. पण सुट्ट्या लागल्या की अर्ध्या सुट्ट्या आई बरोबर असायचो तेव्हा काय गंमती व्हायच्या." रविंद्र हसत असताना सगळे गप्प झाले.

"अरे गंमत सांगतोय हसा ना?" रविंद्र हसत म्हणाला.


"हो,सांगा सांगा. आम्हा मुंबईच्या पोरींना ह्यांची आई पाट्यावर
वाटण करायला लावायची. वर म्हणत हातात जीवच नाही पोरींच्या. संसार कशा करणार माहित?"
रंजना चिडून म्हणाली.


"ते जाऊ द्या. समीर तुझ्यासाठी मी स्थळ शोधले आहे. ह्यावेळी सून माझ्याच पसंतीची येणार. ऐकशील ना राजा माझे."

रंजूताई प्रेमाने म्हणाल्या आणि समीरने होकारार्थी मान हलवली.


त्याबरोबर त्या गाणे गुणगुणत आत निघून गेल्या.

दोन्ही वहिनी पाय आपटत स्वयंपाक करायला गेल्या. बाबा आणि दोघे भाऊ बिचारा ! असा कटाक्ष टाकून निघून गेले.


आपले काय चुकले हा विचार करत असताना समीरला ऑफिसमधून मेल आला.

उद्या पुन्हा संजना आणि तिच्या बॉस बरोबर मीटिंग होती.

समीर आनंदाने आत निघून गेला.


पुढे काय होणार ? मनासारखी सूनबाई मिळणार का?


वाचत रहा.

आम्ही बाई सूना.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all