प्रिय अनुराधा

कविता
अनुराधाचे नाव ऐकताच
होते पहाट नवी
मजबूत आणि साहसी अनुची
सोबत हवी हवी...

खर्चिक आणि आध्यात्मिक ती
एक तेजस्वी तारा
लेखणीतून तिच्या दर्शविते
आसमंत उजळून टाकी सारा...

कधी न बघता, कधी न भेटता
तरी ओळखीची असते
मैत्रिणींचा ग्रुप हसरा ठेवूनी
ती हवीहवीशी वाटते....

चैतन्य आणि आनंदाचा
हासरा खळाळता झरा
कृतीतून ती सहज साधते
उजळी आसमंत सारा....

शुभेच्छा देऊन आनंदाचे
क्षण हे जपूया सारे
कुठल्यातरी वाटेवरती
एकदा तरी भेटू या रे....

©® अश्विनी मिश्रीकोटकर
छ.संभाजीनगर