अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस
शीर्षक - अवकाळी पाऊस

अचानक आले अंधारून
सोसाट्याचा वारा सुटला
धुवाधार पाऊस झाला सुरू
बळीराज्याच्या गळ्यात हुंदका दाटला...

भर उन्हाळ्यात पाऊस
सोबत गारा घेऊन आला
निसर्गाचे रौद्ररूप पाहून
तो कासावीस झाला...

बागेतला संत्रा/आंबा पाहून
बागायतदार सुखावला होता
अचानक आलेल्या पावसाने
त्याच्या तोंडचा घास हिरावला होता...

हाय रे दैवा, एकच टाहोsss
सांगा कुणाला हाका मारू?
नको रे पावसा असा
आमच्या पोटावर मारू...

जंगले नष्ट झाल्यामुळे
पर्यावरणाचा समतोल बिघडला
ग्लोबल वार्मिंग चा फटका
सर्वांनाच बसू लागला...

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी
आता एकच काम करा
झालेल्या चुकांचे परिमार्जन करून
पुन्हा झाडांचे जंगल उभे करा.

सौ. रेखा देशमुख