अव्यक्त 4 अंतिम

अव्यक्त प्रेम
आपल्याला हे थांबवता आलं असतं... का विचार केला नाही मी? का सांगितलं नाही कांचनला सगळं? सर्वांची संमती होती, मग...

"नाही नाही, आज कांचनचे वडील असते तर त्यांनी हे होऊ दिलं असतं का?"

पराग स्वतःचं दुःख गिळत मदतीला पुन्हा बाहेर आला. एकेकाला मदत करू लागला. कांचनच्या घरी गेला,

कांचन खूप आनंदात होती, तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकून तो सरळ आईकडे गेला,

"मावशी, लग्नाचं कसं ठरलं? काय करतो मुलगा?"

"इंजिनियर आहे, चांगल्या पगारावर आहे.."

"हो पण स्वभाव, कुटुंब, सगळी चौकशी केलीत का? माझ्या कांच.....आय...मिन...कांचन ला...नीट ठेवतील ना??"

आई आणि कांचन आश्चर्याने बघू लागले..परागने विषय बदलला आणि सगळे आपापल्या कामाला लागले..

संध्याकाळी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होणार होता. सर्वजण तयार होऊन आले. परागला हे सहन होणार नव्हतं. कार्यक्रमाच्या वेळेस तो मंदिरात जाऊन बसला, तिथे रडत होता.

तेवढ्यात तिथे पिंट्या आला,

"पराग इथे काय करतोस? चल लवकर, तिकडे एक प्रॉब्लेम झालाय.."

"काय झालं??"

"तू चल आधी.."

पराग धावतच गेला,

पराग गेला तसं सर्वजण त्याच्याकडे बघू लागले..परागला कळेना सगळे त्याच्याकडे का बघताय ते...

पिंट्याने परागला आणलं आणि कांचनसमोर बसवलं, कांचन लाजली, इतर सर्वजण हसू लागले,

पराग चक्कर यायचाच बाकी होता..

कांचनची आई पुढे आली आणि तिने परागच्या हातात एक डायरी दिली, कांचनच्या वडिलांची डायरी होती ती...त्यात लिहिलं होतं,

"कांचनसाठी परागच योग्य आहे आणि समाजाचा विचार न करता मुलीच्या भविष्याचा विचार करत मी कांचनसाठी परागलाच विचारणार आहे.."

कांचनच्या वडिलांना डायरी लिहायची सवय होती. ही डायरी नेमकी तो शहराबाहेर गेल्यावर आईला सापडली. आईने परागच्या घरच्यांशी बोलणी केली, तेही खुश झाले आणि महिनाभरात सगळं झालं.

पिंट्या ओरडला,

"अरेच्या...एक मोठा प्रॉब्लेम झालाय, आपण परागला तर विचारलंच नाही? त्याची संमती आहे की नाही? सॉरी पराग, उठ बरं... पुन्हा विचार कर.."

"नाहीsssss..."

पराग मोठ्याने ओरडला, त्यातच त्याचीही कांचनसाठी किती तळमळ होती हे दिसून आलं..

सर्वजण हसू लागले, आणि या कथेचा सुखद शेवट झाला..


🎭 Series Post

View all