बटाट्याचे गुलगुले

बटाट्याचे गुलगुले रेसिपीज इन मराठी
बटाट्याचे गुलगुले
साहित्य
चार मध्यम आकाराचे बटाटे, गूळ किंवा साखर आवडीप्रमाणे, कणिक, तळणासाठी तेल.
कृती
बटाटे स्वच्छ धुऊन उकडून घ्या. त्याचा लगदा करून त्यात कणिक, किंचित मीठ, साखर किंवा गूळ घालून चांगले फेटून घ्या. व भज्याप्रमाणे तेलातून तळून घ्या.

२) उकड कणकेचे आपाल

दोन वाटी पाणी, अर्धी वाटी साखर किंवा गूळ, तळणासाठी तेल.

कृती

जाड बुडाचा गंज गॅसवर ठेवून त्यात पाणी टाका . त्या पाण्यातच साखर किंवा गूळ व एक छोटा चमचा (टी स्पून) तेल टाका. पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्या पाण्यात मावेल एवढी कणिक टाकून उकड तयार करा. लगेच गॅस बंद करा व ती उकड थंड झाल्यावर चांगली मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करून पुरीप्रमाणे लाटा व तेलातून तळून घ्या. अनारशाप्रमाणे खूप छान लागतात.(जास्त करायचे असल्यास तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता)

चला तर मग वाट कसली बघताय करा रेसिपीला सुरुवात.
मस्त खा.
स्वस्थ रहा.
व्यस्त रहा.
सौ. रेखा देशमुख