भेटली तू पुन्हा! भाग - पाच

दुरावलेले दोघे एकत्र येतील का?
भाग - पाच

भक्ती कामात व्यस्त असतांना तिने स्क्रिनकडे न पाहता फोन पिक अप करून “हॅलो”म्हटले.

दूसरीकडे फोनवरील त्याचं नाव ऐकल्याने त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिच्या तोंडून निघालेला “राज” त्याच्या कानामध्ये सतत लाऊडस्पीकरसारखा घूमत होते.
पलीकडून अजून राजचे शब्द कानावर पडले नाही म्हणून तिने पुन्हा आवाज दिला.


“हॅलोऽऽ..” बोलतच तिने स्क्रीन कडे पाहिलं. अननोन नंबर पाहून कोणाचा असेल याचा अंदाज लावून तिच्याही हृदयाची धडधड अचानक वाढू लागली. मिनिटभर दोन्हीकडे शांतता पसरली. मग भक्तीनेच बोलयला सुरवात केली.

“ व्हू इज दिस.” तरीही पलीकडून कोणी बोललं नाही.

“ हॅलोऽऽ.” कपाळावर आठ्या पाडतच म्हणाली. त्याने मोठा श्वास भरला आणि बोलयला तोंड उघडणार तोच “टाइमपास करायला तुम्ही फ्री आहे मी नाही.” चिडतच तिने फोन कट केला. विश्वराजच्या तोंडाचा आऽ वासला गेला. तिने त्याला बोलू ही न देता फोन कट केला.

“मशीनगन.” तो बडबडला. त्याने अमरला कॉल करून बोलावयास खुणावले. परत तिचा फोन खणाणला. तोच नंबर झळकत होता.

“कोण भैताड सकाळी सकाळी डोकं उठून ऱ्हाहिलयं बे.” ती मनातच संतापत होती.

“hello can i speak to miss Ranadive.” अमरने नम्रपणे विचारले.

“Yes I am talking Miss Ranadive but who are you?” तीही राग बाजूला ठेवत हळू आवाजात म्हणाली.

“My boss wants to talk to you.”

“Who is your boss?”

“ मिस्टर विश्वराज अभ्यंकर.” तिचेच हार्टबिट्स तिलाच ऐकू येतील इतक्या मोठ्याने धकऽ धकऽऽ धकऽऽऽ करत होते. त्याचं नाव ही तिचे हार्टबिट्स वाढायला पुरेसे होते. तिने शेवटी हृदयावर हात ठेवला.

“Hello ma'am are you there?” तिचा प्रतिसाद न आल्याने अमर विचारत होता.

“या .. i am here. मिस्टर .. अंऽऽ..”

“अमर.” तो अदबीने म्हणाला.

“मिस्टर अमर, तुम्हाला ड्रेसचे फॉलोअप हवं आहे तर माझा मॅनेजर रजत तुम्हाला हवी ती मदत करू शकतो.” ती टाळण्यासाठी एक एक कारण सांगत होती.

“मॅम, प्लिज बॉस पर्सनली यात इनव्हॉल आहेत. पूर्ण ड्रेसेसे पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तरी मॅम.” तो विनवत म्हणतात.

“ओके. हा कॉल तुमच्या बॉसकडे हॅन्डओव्हर करा.”

“या शुअर मॅम.” त्याने बॉसकडे म्हणजे विश्वराजकडे फोन दिला.


“हॅलो..” विश्वराज. फोनवर पलीकडून शांतता पसरली.

“ हॅलो .. तो पुन्हा आवाज देत म्हणाला. त्याच्या आवाजाने ती भानावर आली.

“येस मिस्टर अभ्यंकर ..”


“भक्ती.” त्याने सार्त हाक दिली. त्या सादेने तिचं मन भरून आलं. गळा दाटला लगेच डोळे ही भरले.

“भक्ती .. मी ..”

“मिस रणदिवे ..” एक उसासा सोडत तिने निर्विकार पण कठोर आवाजात त्याला करेक्ट करत म्हणाली. तिचा बदलेला आवाज त्याला एक प्रकारची ती आपल्यापासून दूर खूप जाऊन सक्त असल्याची जाणीव करून देत होती.


“लक्षात ठेवा मिस्टर अभ्यंकर, माझं नाव मिस रणदिवे आणि हेच माझी ओळख. तुम्ही जे नाव घेत आहे ती जेव्हा तिचा विश्वास मारला गेला त्याच दिवशी तीही मेली आहे. आता तुमच्या समोर आहे ती AR कंपनीची ओनर, एक मुलगी आणि एक आ … .” ती मध्येच थांबली. तिने पॉज घेतला.‘हे काय बोलणार होते मी .. बाप्पा.’ बोलता बोलता ती काय सांगणार होती आलं असेल तुमच्या लक्षात.
“आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा.. कामाचं असेल तर फोन करा .. माझ्याकडे खूप कामे आहेत.” ती फटकारून देत म्हणाली.


“Ok.. आपण कामाचं बोलूया .. आत्तापर्यंत काम कुठपर्यंत आलं आहे.. मला सगळ्या डिटेल्स हवेत.” तो दोन बोटे कपाळावर घासत पण आवाजात जरब आणात म्हणाला.. तिने कामांची सगळी माहिती दिली आणि पटकन फोन ठेवला…

“ हुश्श..” तिने लांब श्वास सोडला. स्वभावाच्या विरुद्ध तिचं बोलणं, वागणं होतं होत. पुन्हा तिचा मोबाइल फोन वाजू लागला.. तिने त्या मोबाइलकडे त्रासिक चेहरा करून बघत होती. पण त्यावरच नाव बघून तिच्या ओठांवर गोड हसू आले. तिने कॉल उचलून समोर धरला.

“ जेवलास ..” तिने विचारले.

“ हे काय नानू आणि मी बसतोच आहोत. तू केव्हा लंच करणार आहेस?” राज उत्तरला.

“ मला अजून वेळ आहे रे बच्चा.”

“ओके, तोपर्यंत टिफिनही पोहचेल.”

“तू टिफिन पाठवलास.” तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.

“आम्ही .. नानू आणि मी मिळून.” राघव दादा आता पोहचत असेल.”

“ऑऽ .. माझा रसगुल्ला ..” तिने स्क्रिनवर ओठ ठेवून पपी घेतली.

“ मम्मा ..तू पण ना काहीही बोलत असते.” तो खाली बघून लाजत होता.

“माझं पिल्लू लाजतयं.” ती तिच्याकडे बघत म्हणाली.

“मी ठेवतो फोन आणि तू पण लंच करून घे. बाय.” राज ने पटकन कॉल कट केला आणि ती खळखळून हसायला लागली. चेहऱ्यावर छान हसू होतं. राघव टिफिन घेऊन आला होता. लिलीने तो छोट्या टेबलवर मांडला.. एक डबा अजूनही बंद होता. तिने लिलीला ही जेवणाला बसवले.. भक्तीने बंद असलेल्या डब्याचं झाकण काढले आणि तिचा चेहराच पडला.. लिली मात्र तिचा चेहरा पाहून हसू लागली.

राज म्हणत कपाळावर हात मारला.
“काय करू मी या मुलाचं.. या बाबतीत अगदी बापावर गेलाय. ही घासपूस मला नाही जमणार रे..” एका डब्यात तिला राजने डाएट फूड पॅक करून दिलं होतं.

“मॅम इथे एक चीट पण आहे..”

“Momma please stop your diet food.. you will do it for your Adiraj. Love you mom.” त्याने खाली स्माईली पण काढली होती. तिने त्यावर ओठ ठेवले.

“लिलावती, लय दात सुटून ऱ्हाहिलेत तुला …तू दात काढणं बंद करं नाहीतर एका बुक्कीत दात पाडीन.” लिलीने लगेच तिचे ओठ बंद केले. तरीही भक्तीचा चेहरा पाहून ती कसेबसे हसण्यावर कंट्रोल करत होती.


“ सॉरी मॅम पण माझ्याकडून कंट्रोलच होत नव्हती.”

“मी करून देते तुझं कंट्रोल ..” भक्ती बारीक डोळे करून म्हणाली.

“मी तुझं रिअलनेम पूर्ण स्टाफला सांगून देईल.” आता लिलीचा चेहरा पाहण्यासारखा झाला..

“नाही .. मी नाही हसणार ..” ती शांतपणे जेवत होती. जेवण आवरून ते कामाला लागले..

*******************************************************

“तुम्ही जे नाव घेत आहे ती जेव्हा तिचा विश्वास मारला गेला त्याच दिवशी तीही मेली आहे.” तिचे शब्द त्याच्या काळजावर वार करत होते.

ती आपल्याकडून दुखावल्याची जाणीव तर होती पण ती त्यांचं ऐकायला ही तयार होत नव्हती. तिचं निर्वाणीच बोलणं त्यालाच श्वास गुदमरायला होतं होत. तिला पूर्ववत त्याची भक्ती करण्यासाठी काहीही करून तो प्रयत्न करणं सोडणार नव्हता.. प्रयत्न तर तिनेही खूप केले होते. तेही त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता पण आता वेळ त्याची होती. त्याच उत्साहाने तो पुन्हा कामाला लागला.

‘आता जी आहे AR ची ओनर, एक मुलगी आणि आणि ती काहीतरी बोलत होती पण मध्येच शांत झाली. काय बोलणार होती?’ तिचं बोलणं त्याच्या मेमरी डिव्हाईस मध्ये हाईलाईट होऊन क्लिक झालं तसं त्याप्रमाणे तो विचार करायला लागला होता.


*********************************************************
टेबलवरच काम आवरून ती थोडी रिलॅक्स झाली. एक कडक चहा पिऊन ती कामाला लागली.. कोणत्या ड्रेसला डिझायनिंग नूसार कपडा कसा पाहिजे? हेवी वेट, लाईट वेट त्याचे मटेरियल पाहत होती.. त्यानूसार ती आता कामात पूर्णपणे व्यस्त झाली. फोनकॉल करणे सुरू झाले. लिली तिच्या मदतीला होती.. काही फॅब्रिक्स तिला मागवायचे होते त्याची तिने नोंद करून घेतली.

“लिली आपल्या टेक्सटाईल माल सप्लायरांना फोन करून माल मागवून घे.”

“ओके मॅम.. मी आत्ताच कॉल करते.” लिली कॉल लावायला गेली आणि भक्तीने टेप घेऊन, मार्क करून ती फ्रॅबिक्स कट करू लागली. तिने एक एक कपडा डिझायनिंग नुसार कट करून बाजूला करत होती. टेबलवर कपड्यांचा ढिग जमू लागला.. डोळ्यांवर चष्मा, गळ्यात टेप, मेसी झालेले केसांच्या बटा चेहऱ्यावर आल्या होत्या. हातात पेन्सिल आणि जवळच कात्री.. काहीतरी विचार करत होती. ती इतकी कामात गढली होती की तिला आजूबाजूचे ही भान नव्हते. दूर उभे कोणीतरी तिला एकटक बघत होते.


क्रमश ..

कोण तिला एकटक बघत होते? पटापट कमेंट करून सांगा.. या कथेतील कोणते पात्र तुम्हाला आवडते तेही सांगा. आजचा लाजरा राज कसा वाटला तेही कमेंटमध्ये कळू द्या. महत्त्वाचे तुम्ही बोललेच नाही, व्यक्त झाला नाही तर मला कसे कळणार तुम्हाला ही कथा आवडतेय की नाही? भेटूया पुढच्या भागात


©® धनदिपा
२८/४/२०२४


🎭 Series Post

View all