ब्रेड पोहा !

.
साहित्य :

ब्रेड
कांदे
टोमॅटो
पावभाजी मसाला
लाल तिखट
मिरची
कडीपत्ता
तेल
हळदी
आले लसूण पेस्ट
मीठ
बटर
कडीपत्ताची पाने

कृती :

सर्वप्रथम ब्रेड बारीक चौकोनी आकारात चिरून घ्यावे. मग कढईत / पातेल्यात थोडेसे तेल गरज करायला टाका. त्यात कडीपत्ताची काही पाने टाका. तडका लागताच त्यात बटर , बारीक चिरलेला कांदा , बारीक चिरलेला टोमॅटो , ब्रेडचे तुकडे , हळद , लाल तिखट , मीठ , आले लसूण पेस्ट , मिरचीचे तुकडे इत्यादी साहित्य टाका. कढईवर ताटली ठेवा म्हणजे ब्रेड सर्व पदार्थ शोषून घेईल. दहा मिनिटांनी तुमचे " ब्रेड पोहे " तयार होतील. त्यावर कोथिंबीर टाकून खाऊ शकता. एन्जॉय.

( जर पदार्थ बिघडला तर लेखक / व्यासपीठ जबाबदार नाही. स्वतःच्या रिस्कवर पदार्थ बनवा. )

©® पार्थ