तिची वागणुक शीर्षक -3 अंतिम भाग

कौटुंबिक
भाग -3

" हो म्हणजे आई घालतीलच की, त्यांनी बाळंतपनाच्या आधी तसं सांगितलं होतं करतील त्या.. " प्रिया बोलते.

बराच वेळ शिंदे काकु सल्ले देत होत्या, रात्र होते.

बारशाचा दिवस उजाडतो, अजित ची सतत गडबड चालु होती. बारशाची तयारी, पाहुण्यांची उठ बस सारं काही अजित वर येऊन पडलं होतं.
तो करत होता, पण त्याची ही दमछाक होतं होती.

त्याची आई मात्र एका कोपऱ्यात बसुन हे सारं काही पाहत होती, " आई अगं एकदा पहा ना काही कमी जास्त असेल तर सांग.? " अजित बोलतो.

" मला कशाला काही विचारतोस, तिच्या माहेरचे आले आहेत त्यांना विचार.. " आईचा आवाज जरा चढतो.

आत बेडरूम मध्ये प्रियाची आई आणि बहीण बसलेली होती, " आई कशाला पराचा कावळा करतेस, इतक्या चांगल्या दिवशी नको ना वाद.. " अजित वैतागलेला असतो पण त्याने स्वतःवर ताबा ठेवलेला असतो.

दुपार होते, बाळाला पाळण्यात घालायची वेळ होते.

" आई अहो पुढे या, तुमच्या नातीला पाळण्यात घालतो आहे. " प्रियाची बहीण बोलते.

" माझी नात नाही ती, काय बाई पहिलीच मुलगी झाली. माहित असतं तर व्हायलाच दिलं नसतं.. " प्रियाची सासु तोंडाला येईल ते बोलतं होती.

" आई अहो चांगल्या दिवशी कशाला उगाच काही बोलतायत, किती ही नाकारलात तरी ती तुमचीच आहे.. " प्रिया बोलते..

प्रियाच बोलणं ऐकुन तिची सासु आत निघुन जाते, प्रिया हताश होते तिच्या डोळ्यांतुन पाणी येतं.
ती डोळे पुसते आणि पुन्हा कार्यक्रमाला लागते.
बारसं छान पार पडत, प्रियाची आई तिला काही दिवस घरी चल असं म्हणत होती.
" आई अगं नको मि आता घरी गेली तर त्या अजुन चिडतील.. " प्रिया बोलते आणि ती अजित कडे पाहते.

आईच्या ह्या वागण्याचा अजितला खुप त्रास होतो, त्याला प्रिया बद्दल फार वाईट वाटतं. कारणं तो आज एकामुलीचा बाप झालेला असतो, त्याची ही मुलगी मोठी होणार होती. तिचं ही बाळंतपण येणार होतं तो प्रियाच्या जागी स्वतःच्या मुलीला पाहतो आणि ढसाढसा रडु लागतो.

बाळंतपण हा एक असा क्षण असतो, ज्यात स्त्रीला अनेक प्रसंगाणा सामोरं जावं लागत आणि त्यात मुलगी झाली तर..

नवरा म्हणुन समजुन घेणं खुप महत्वाचं असतं..

समाप्त.


🎭 Series Post

View all