तिची वागणुक शीर्षक -1

कौटुंबिक
विषय - बाळंतपणातील वागणुक..


"अभिनंदन, मुलगी झाली आहे." ऑपरेशन थेटर मधुन बाहेर बाळा ला घेऊन येत डॉक्टर म्हणाली.

" काय मुलगी, अहो डॉक्टर तुम्हाला काही तरी गैरसमज झाला असेल मुलगी नाही मुलगा.. " प्रियाची सासु डॉक्टरांना बोलते.

" अहो काकी नाही मुलगीच झाली, ही बघा. " डॉक्टर बाळाला दाखवतात.

डॉक्टर बाळाला तिच्या सासुच्या हातात देतात, पण त्या काढता हात घेतात

" शी... माझ्या हातात ही घाण नको." प्रियाची सासु हात झटकत बाजुला होते.

" अहो डॉक्टर तुम्ही ह्या बाळाला त्याच्या आई जवळ द्या, मि भेटतो तिला येऊन. " प्रियाचा नवरा अजित डॉक्टरांना बोलतो.

डॉक्टर ते बाळ सिस्टर ला सांगुण प्रिया जवळ देतात.

" आई जे झालं त्याला आपण बदलू तर शकत नाही ना..? " अजित बोलतो.

" तुला सांगितलं होतं, मुलगा आहे की मुलगी ह्याची चाचणी करुन घे पण नाही तु काही ऐकलंस नाही. घे आता बस त्या बाळाला घेऊन, मि जाते. माझा अजिबात मुड नाही येथे थांबण्याचा. " आणि प्रियाची सासु तवातवा ने हॉस्पिटल मधुन निघुन जाते.

अजित प्रियाला भेटायला तिच्या वॉर्ड मध्ये जातो, तिला बाहेर काय घडलं ह्याची कल्पनाच नसते.

" काय रे काय झालं..? तुझं तोंड का पडलंय..? आणि आई कुठे आहेत, नातीला बघायला नाही आल्या फार खुश झाल्या असतील त्या. हो ना..? " प्रिया बोलते.

बराच वेळ अजित काहीच बोलतं नाही, " काही खुश नाही ती, तिला नात नाही नातु हवा होता. " हे ऐकताचा प्रियाचा चेहरा पडतो.

" मुलगी झाली तर ह्यात वाईट काय आहे, नात आणि नातु मध्ये कसला आलाय फरक..? " प्रिया बोलते.

" मला माहित आहे आत्ताच्या जमान्यात हे सगळं चालतं नाही, पण...? " अजित मध्येच थांबतो.

" थांबलास का..? तु सांग तु खुश आहेस ना..? की तुझं ही मुलगा असता तर बरं झालं असतं असं काही मत वगरे आहे का..? " प्रिया त्याला विचारते.

त्याच्या कडुन उत्तर काहीच येत नाही, प्रियाच्या डोळ्यांतुन पाणी येतं.

दोन दिवसांनी अजित प्रियाला आणि बाळाला घेऊन घरी येतो, दारात आल्यावर तो आईला आवाज देतो पण त्याची आलेल्या बाळाचं स्वागत करायला अजिबात पुढे येतं नाही.

प्रिया आणि अजित एकमेकांकडे पाहतात," तु थांब मि अंगावरून काढायला पाणी घेऊन येतो. " असं बोलुन अजित आत येतो, स्वयंपाक घरातुन पाण्याने भरलेला ग्लास आणतो. तिच्या आणि बाळाच्या अंगावरून काढतो.

क्रमश....

🎭 Series Post

View all