तिची वागणुक शीर्षक -2

कौटुंबिक
शीर्षक 2

अजित बाळाला आणि प्रियाला घेऊन बेडरूम मध्ये जातो, अजित ने जशी प्रियाची डिलिव्हरी झाली तसं आधीच येऊन रूम सजवली होती...

प्रिया पाहुन फार खुश होते, " अरे वाह खुप छान रूम सजवला आहे थँक्स.. "

" मला वाटलेलं मुलगा त्यानुसार रूम सजवला, पण मुलगी झाली. असो तु नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. " आणि तो बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो.

" निदान तु तरी दुःखी राहू नकोस, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे माझ्या हातात नव्हतं. आणि देवाने जे दिलं त्यातच मि समाधानी आहे, आणि मला वाटतं तुही समाधानी रहा. " प्रिया त्याला थोडक्यात समजावते.

प्रिया आणि बाळ घरी आल्या पासुन प्रत्येक जण बाळाला पहायला येतं होते.

" आई अगं प्रिया आत्ताच आली आहे, तु तिला जरा मेथीची पेज करुन देशील का..? " अजित आईला बोलतो.

पण तिच्या तोंडून हु नाही की चु नाही, " पुन्हा तो विचारतो. " पण त्याची आई दुर्लक्ष करत होती.

अजित ला फार राग येतो, तो रागा रागाने बेडरूम मध्ये येतो आणि त्याच्या मित्राला फोन करतो, आणि पेज मागवून घेतो.

" पेज,,, आई ने बनवली..? " प्रिया मुद्दाम त्याला विचारते.

" नाही आई ने नाही माझ्या मित्राच्या बायकोने.. आईला सांगितलं पण ती जागेवरून हलायला तयार नाही.. " अजित चिडून बोलतो.

" अरे असू दे त्यात काय, उद्या पासुन मीच बनवून घेत जाईन. " प्रिया त्याला समजावते.

प्रिया जशी घरी येते तसें आजु बाजुच्या शेजारी बायका प्रिया आणि तिच्या बाळाला पहायला येतात, घरात बायकांचा नुसता गोंधळ असतो.

" मग प्रिया बाळाचं बारस तु माहेरी करणार की सासरी..? " पाहायला आलेल्या शेजारच्या शिंदे काकु विचारतात..

प्रिया हळूच सासु कडे पाहते, " नाही काकु सासरीच करणार आहोत.. "

" चांगल आहे बाई, नाही तर बारस माहेरीच होतो ना म्हणुन विचारलं. बरं मेथीची पेज पी, डिंक लाडू खा. त्याने बाळाला अंगावरच दूध ही छान भरपुर भेटेल. हो की नाही अजितच्या आई..? " शिंदे काकु तिच्या सासुला आवाज देत.

प्रिया घरातले वाद बाहेर कळू नये म्हणुन मुद्दाम मध्ये बोलते, " हो तर आई नीं लाडू भरपुर केलेत आणि पेज ही दिली गरमागरम.." प्रियाला सासु ची बाजु घेणं गरजेचंच होतं.

" बरं मालिश बाळाची, बाई भेटली का कोणी..? नाही तर माझ्या ओळखीत आहे की सुमन म्हणुन छान मालिश करते. तु बोलतेस तर मि तिला देते पाठवून.. " शिंदे काकु बोलतात.

क्रमश...

🎭 Series Post

View all