हिंदोळा श्वासाचा

To dear sun , the life giver.


हिंदोळा श्वासाचा !

तू एकवटून प्रकाशलाटा
अंधाराच्या बुजवतोस वाटा,
उषेसोबती वात्सल्य तुझे अन
संध्ये सोबत अल्लड प्रेमळ चाळा!
निशेसोबत तुझा अबोला
प्रभे सोबतचा किती उंच झुला,
कातरवेळी तू सोबत असावास
हिंदोळ्यांवर जेव्हा तो नसावा!
हे मित्रा, आदित्या डाव तुझा
मावळतीचा पण निरोप घे माझा,
आयुष्याच्या या झुल्यावर उंच भरारी
पराभवाच्या गर्तेतूनही उठल्यावर तूच तारी!
पदरचे आयुष्य तुझे येणे जाणेच,
हिशोब श्वासांचा, तुझे उगणे अन मावळणे!
प्रभाकरा रे ,तूच सोबती , तूच सखा रे
अश्वाश्वत आयुष्याच्या तूच सहार रे!

© स्वाती  बालूरकर, सखी

दिनांक  ३१.०१ .२०२२