इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ७

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
" कॉफी?म्हणजे तुम्हाला काही काम किंवा लेक्चर नसेल तर.." समीर

"तुम्ही माझा मूड बूस्ट केलात.त्यामुळे तुमच्यासोबत कॉफी प्यायला नक्की आवडेल."प्रिशा

दोघेही कॅन्टीनकडे निघाले.

' बापरे! मी इतका गोड बोलतो मुलींशी? मी मूड बूस्टर आहे? वाव! माझ्यातील ही क्वालिटी मलाच माहित नव्हती.असो! पण मॅडम एकदम १८० डिग्री चेंज झाल्यात.कमाल आहे,अर्थातच माझी!' समीर चालता चालता स्वतःशीच पुटपुटला.

दोघेही कॅन्टीनमध्ये पोहोचले.समीर दोन कॉफीचे कूपन घेऊन आला.त्यांची कॉफी यायला वेळ होता.

" खरंच कमाल आहात तुम्ही!"प्रिशा

" ओह! थँक्यू सो मच! मुलं असतातच अशी!एकदम प्रॅक्टिकल.मुली मात्र खूप इमोशनल असतात.त्यांना सतत.."समीर

" काय? सतत काय?"प्रिशा

" नाही म्हणजे मुलींना समजून घेणारा किंवा घेणारी एखादी व्यक्ती हवी असते.भलेही ती मुलगी परफेक्ट असली तरीही.."समीर

" अच्छा! म्हणजे गोड बोलून तुम्ही सरळ सरळ माझ्या परफेक्शनिस्ट असण्यावर शंका घेत आहात.बरोबर?"प्रिशा खोडसाळपणे बोलली.

" हे बघ प्रिशा..."समीर

" हम्म?" एकदम आरेकारे केल्याने प्रिशाच्या मनात आनंद शहारे फुलले.

" ओह सॉरी.चुकून झालं माझ्याकडून.." समीरने गुगली फेकली.

" काही हरकत नाही.तुम्ही मला उभारी दिलीत म्हणजे आपण चांगले फ्रेंड्स नक्कीच होऊ शकतो आणि फ्रेंडशिपमध्ये आरेकारे तर केलंच पाहिजे तेव्हाच आपसांतील परकेपणा जातो." प्रिशा

समीरला आनंदाने उड्या माराव्यात असे वाटत होते पण स्वतःवर वेळीच आवर घालत त्याने आलेले कॉफीचे कप ट्रे मधून खाली ठेवले.त्यातील एक त्याने प्रिशाला दिला आणि दुसरा स्वतःला घेतला.

' खरंच इतकं कसं ऐकतेय मी याचे? कोण आहे हा माझा? मागच्या दोन तासांत याने मला इतके आपलेसे केले आणि मी चक्क त्याच्यात अडकत गेले.काय होतंय मला? एवढे सारे होऊनही इतका निवांतपणा, आनंद मला याच्यासोबतच कसा काय मिळतोय? आलेला प्रत्येक क्षण कसा जगायचा हे सांगणारा हा माझा सेव्हीयर तर नाही?' या विचारांच्या तंद्रीत प्रिशा हरवलेली असतानाच कोणीतरी म्हंटले,

" सॉरी मॅडम.." विद्यार्थी

" तुम्ही? त्या दिवशी असे गैरकृत्य करण्यात तुम्हाला काहीच वाटले नाही मग आता मला का सॉरी म्हणताय?"प्रिशा

" आमचं खरंच चुकलं मॅडम.आमच्यामुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागला.खरंच सॉरी.पुन्हा असे कधीही होणार नाही."विद्यार्थी

" जाऊ दे प्रिशा.माफ कर त्यांना.खरं तर त्यांचं गैरकृत्य माफीलायक नाही पण चुका शेवटी माणसाकडूनच होतात आणि आपलेच विद्यार्थी आहेत ते.पुन्हा असे कधीही होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली आहे त्यामुळे त्यांना माफ कर." समीर

" बरं ठीक आहे.ज्यादा अभ्यास आणि सर्व सब्जेक्ट क्लिअर हेच तुमचं पनिशमेंट.यातून धडा घ्या आणि अभ्यासाला लागा."प्रिशा

" थँक्यू मॅडम, थँक्यू सर.." असे म्हणून ते विद्यार्थी तिथून निघून गेले.

तेवढ्यात समीरचे कलीग महेश सर तिथे आले.

" काय समीर? कॉफी विथ प्रिशा मॅडम?"महेश सर

" हो.काही प्रॉब्लेम?"समीर

प्रिशाला कसेतरीच वाटले.तिने पटकन कॉफी संपवली.

" समीर सर,येते मी."प्रिशा लगबगीने उठली आणि झपाझप चालत निघाली.

" पण प्रिशा मॅडम.."समीर मात्र कळवळला.ती अशी का निघुन गेली हे त्याला समजले होते.

" वाह! तुमच्यासोबत आल्या या मॅडम कॉफीला अन् मी जेव्हा हेच सॉफ्टवेअर शिकायला गेलो होतो तेव्हा तर कामाव्यतिरिक्त साधे माझ्याकडे पाहिले देखील नाही. हं,आजकालच्या या मुली ना.."महेश सर

"महेश सर, आपले वय आणि चेहऱ्यावरील म्हातारपणाचे वलय पाहता कोणीही तुमच्यासोबत कॉफी तर सोडाच पण साधे ढुंकून देखील बघणार नाही.हा अशी कोणी तुम्हाला गळ घालणारी भेटलीच तर ती एक अपवादात्मक युक्तिवाद साधणारी प्लेअर असावी नाहीतर शुद्ध मूर्ख असावी."
एवढे बोलून समीर कॅन्टीनमधून बाहेर पडला.

महेश सर मात्र तो नक्की काय बोलला याचा अर्थ लावत पेचात पडले.आपले डोके चालावे म्हणून त्यांनी चहाचे कूपन घेतले आणि चहाची वाट पाहत थांबले.

एव्हाना दुपारचे ३ वाजले होते. प्रिशाच्या डिपार्टमेंटकडे जाण्याच्या आधी समीरने घड्याळात पाहिले. लेक्चर असल्याने त्याने आपले डस्टर आणि चॉक उचलले आणि थेट वर्गात पोहोचला.

लेक्चर अगदी छान झाले आणि तो प्रिशाच्या डिपार्टमेंटकडे जाण्याच्या तयारीत असतानाच भाबड सरांनी त्यांचे एक प्रॅक्टिकल त्याला घ्यायला सांगितले.ते संपले आणि कॉलेजची वेळ देखील संपली.

समीर प्रिशाच्या डिपार्टमेंटकडे डोळे लावून बसला होता. त्याला प्रिशा दिसलीच नाही.तो नाराज झाला आणि तसाच घरी जायला निघाला.

" हाय सर.." प्रिशा

एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यास ती जेव्हा सापडते तेव्हा होणारा आनंद जसा मनाला सुखावतो तसाच समीर सुखावला आणि त्याने प्रिशाकडे पाहिले.

" हे माझे कार्ड.असू द्या तुमच्याकडे.यावर नंबर आहे माझा. एकमेकांच्या वेळा सांभाळून टर्मवर्क सॉफ्टवेअर मी तुम्हाला शिकवीन. सो डोन्ट वरी. बाय.."प्रिशा

" ओह.. खूप खूप धन्यवाद!सो नाइस ऑफ यू..तुम्हाला ड्रॉप करू का कुठे?"समीर

" माझे बाबा येतीलच इतक्यात.थॅन्क्स फॉर अस्किंग.." प्रिशा

समीर निघाला.थोड्या वेळात प्रिशाचे बाबा देखील आले आणि ती घरी गेली..

हम्म.. प्रिशाचे बदललेले रूप तिच्या घरच्यांना आता समजेल.अगदी बरोबर! जे आपण करू शकलो नाही ते कोणी केले याचा तिच्या घरच्यांना विशेषतः वसुधाताईंना नक्कीच प्रश्न पडेल.बरोबर? प्रिशा आणि समीरचा हा परफेक्ट बाँड अजून असाच मुरत जाणार की अजून काही घडेल त्यांच्या आयुष्यात? त्यासाठी नक्की वाचा,
" इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ८"

भाग ७ समाप्त

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे










🎭 Series Post

View all