इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १०

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
कॉलेज संपल्याची बेल वाजली आणि प्रिशा देखील निघाली.नेहमीप्रमाणे बाबांची वाट बघत ती पार्किंगमध्ये थांबली.

समीर आपली बाईक घेऊन घरी निघाला होता तेवढ्यात त्याने प्रिशाला पाहिले आणि दुरूनच ड्रॉप करू का असे खुणावले.तिने नाही,असू दे म्हणून खुणावले.समीरने तिच्याकडे बघून स्मितहास्य केले.प्रिशाने देखील हलकेसे स्मितहास्य केले.समीर निघून गेला.

प्रिशा मात्र त्याच्याच विचारांत हरवली.
‘ खरंच समीर चांगला मुलगा आहे? जर बेस्ट टीचर अवॉर्डसाठी त्याला माझ्यासारख्या कॉम्पीटीटरला शह द्यायचा असला असता तर त्याने आज माझी मदत केली नसती. उलट मला या प्रसंगात संकटात टाकून त्याला निघून जाता आले असते पण त्याने तसे केले नाही.
माझ्यावर असलेल्या प्रेमाखातर त्याने मला मदत केली आहे असे मला देखील वाटते पण दोन दिवसांच्या ओळखीत मी त्याला कशी काय जज करू शकते? म्हणून आता पर्यंतच्या त्याच्या वागण्यानुसार तो मला ६० % चांगला आणि त्याच्या काही इम्परफेक्ट सवयींमुळे ( जसे की सारखे माझ्या मागे येणे, लेक्चर व्यतिरिक्त टाईम पास करण्यात वेळ घालवणे,सतत मी त्याचं ऐकून घ्यावं हा अट्टाहास ठेवणे)४० % वाईट वाटतो.परंतु एक मिनिट मला नेमके त्याचे हेच इम्परफेक्शन का आवडते आहे? बास आता घरी गेल्यावर रात्री शांत डोक्याने हा गुंता मी सोडवणार आणि या नात्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावणार. ओके
प्रिशा,डोन्ट गेट पँनिक.स्टे फोकस्ड अँड काम!’

“ प्रिशा,अगं कुठे हरवलीस? मी केव्हाचा इथे उभा आहे.” विनयराव

“हो का? सॉरी बाबा. माझे लक्षच गेले नाही तुमच्याकडे.” प्रिशा

“ एनी प्रॉब्लेम?” विनयराव

“ नाही बाबा,जरा थकलेले आहे ना त्यामुळे.नथिंग सिरीयस..” प्रिशा

“ पक्का?”विनयराव

“ हो बाबा..”प्रिशा

दोघेही गाडीवरून घरी निघाले.

“ थकवा घालवण्यासाठी एक चहाची अमृततुल्य प्याली घेशील का?”विनयराव गाडी चालवता चालवता प्रिशाला म्हणाले.

“ नक्कीच..तेही माझ्या रॉकिंग वडिलांबरोबर तर १०१ %”प्रिशा

ते दोघे साईनाथ गुळाचा अमृततुल्य चहा या शॉपवर थांबले.नेमकी तिथे प्रिशाची नजर समीरवर पडली.तो एका मुलीसोबत तिथे होता आणि चक्क स्वतःचे कान पकडून तिला सॉरी म्हणत होता.

हे चित्र पाहताच प्रिशाची तळपायाची आग मस्तकात गेली.ती स्वगत करू लागली,
‘ आधीच मी इतकी दमलेली आहे आणि हा अजून मला हायपर करतोय.कोणासोबत आलाय हा इथे? ( तिने थोडे वाकून पाहिले) दिसायला तर छान दिसतेय. ह्ममम..नक्कीच हे त्याचे लफडे असणार! कॉलेजमध्ये मी आणि बाहेर ही मुलगी! या मुलांची ना फितरतच वाईट असते.मुलगी दिसली की लगेच तिच्या पाठी लागायचं आणि गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवून प्रेमाचे नाटक करायचे.अरे यार,म्हणजे हा माझ्याशी सुद्धा असेच नाटक करत असणार का? बापरे आता तर मला नक्की भोवळ येणार..’

तेवढ्यात गरमागरम चहा तिच्यासमोर आला.

“ प्रिशा शांततेत चहा पी.” विनयराव

“ हो बाबा, पण मी तर शांतच आहे.”प्रिशा

“ हो का? मग रागात समोरच्या टेबलकडे पाहून पाय का आपटत होतीस?”विनयराव

“ मी? कधी? हा हा.. माझ्या पायावर मला झुरळ आल्यासारखं वाटलं म्हणून मी खाली न पाहता,समोर पाहून पाय झटकत होते.”प्रिशा

“ अच्छा! प्रिशा,बेटा काय झालंय तुला ? तुझे मूड स्विंगस् हल्ली खूप वाढले आहेत.तू मला तुझ्या मनातले सारे काही सांगू शकतेस.. “विनयराव

“ बाबा,मी..”

तेवढ्यात समीर अचानक तिच्या टेबलसमोर आला.

“ हॅलो मॅडम..”समीर

“आ..हा..हॅलो..”प्रिशा

“ कसा वाटला इथला चहा?”समीर

“ फारच उत्तम,अगदी नावाप्रमाणे अमृततुल्य!”विनयराव

“ आम्हालाही..आम्ही नेहमी इथेच येतो चहा प्यायला.”समीर

“ माफ करा पण आपण कोण?”विनयराव

“ ओह,सॉरी.मी प्रोफेसर समीर.प्रिशा मॅडमच्याच कॉलेज मध्ये केमिकल इंजिनीअरिंगमध्ये डिपार्टमेंटमध्ये ॲज अ रिसर्चर कम प्रोफेसर म्हणून काम करतो.”समीर

“ आणि या कोण?” प्रिशा रागातच दुसरीकडे चेहरा वळवत म्हणाली.

“ ही माझी बहिण निशा. अहो आज मी कॉलेज संपल्यावर हिच्यासाठी समोरच असलेल्या पुस्तकालयातून पुस्तक आणायचं विसरलो.रोज मी तिला तिच्या क्लासवरून पिक करतो अन् मग आम्ही घरी जातो.”समीर

प्रिशाने मनातल्या मनात सुटकेचा निःश्वास सोडला.

“ ओह!अच्छा..मला वाटलं..” प्रिशा

“ हम..?” विनयराव

“ चला ना आपण सर्व पुन्हा एकदा चहा घेऊया.खरंच फार छान चहा आहे इथला.” प्रिशाने विषय बदलत म्हंटले.

“ येस. शुअर.पण माझ्यातर्फे..” समीर

“ अहो,नाही नाही..” विनयराव

“ बस का सर! आमच्या कॉलेजच्या परफेक्ट मॅडम आहेत या.. त्यांच्यासाठी मी एवढं पण करू शकत नाही का?”समीर

“ नाही तसं नाही..पण”विनयराव

“ बाबा,त्यांची एवढी इच्छा आहे तर होऊ द्या त्यांच्या मनासारखं..”प्रिशा मुद्दाम म्हणाली.

समीरने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला,
‘ वाह! काय हा तोरा! आता मॅडम माझ्यासारख्या बिनधास्त होऊ लागल्या आहेत.अगदी परफेक्टली इम्परफेक्ट..’

“ हो.हे काय असा गेलो अन् असा आलो..” समीर

प्रिशाला हसू येत होते पण तरीही तिने ते रोखले आणि ती शांत बसली.

सर्वांनी चहा घेतला आणि घरी जायला निघाले.

“ चला सर अँड मॅडम.येतो मी.मॅडम भेटू उद्या;म्हणजे ते सॉफ्टवेअर शिकण्यासाठी.” नेहमीप्रमाणे समीर आपल्या स्टाईलमध्ये म्हणाला.प्रिशा मात्र चपापली.

तसे विनयरावांनी त्याच्याकडे चमकून पाहिले.

“ म्हणजे आमचे एक टर्म वर्क सॉफ्टवेअर आहे ते यांनाच येतं.आमच्या सरांनी यांच्याकडून शिकून घ्यायला सांगितलं आहे ना..” समीर

“ ओह.. अच्छा! मग ठीक आहे..”विनयराव

सगळे घरी जायला निघाले.

प्रिशाच्या मनात प्रेमाचे चांदणे फुलवताना समीरला आणखी काय काय करावे लागेल? प्रिशाच्या मनात त्याच्याविषयी असणारे प्रेम खरंच खरे आहे का? अन् जर द्वेष आहे तर तो का आहे हे तो कसे ओळखेल?त्या दिवशी रात्री तिला कोणाचा फोन आला होता? जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..

कथा आवडत असल्यास कमेंटमधून नक्की कळवा.आपला अभिप्राय माझ्यासाठी प्रोत्साहनाचा शीतल, आनंददायी झरा आहे.


भाग १० समाप्त..
क्रमशः..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all