इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १४

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
प्रिशा कॉलेजला पोहोचली.आज तिला दोन लेक्चर्स होते.तेही जरा उशिरा होते. आपल्या डिपार्टमेंटकडे चालता चालता,तिचे मन काल कॉलेजमध्ये घडलेल्या गोष्टींत गुंतून बसले.आपण चुकीचे वागल्यामुळे आधी समीरकडे जाऊन माफी मागावी असे तिचे अंतर्मन तिला दटावून सांगत होते.

तिने आपली पर्स आपल्या टेबलवर ठेवली.ती समीरच्या
डिपार्टमेंटकडे निघणार तोच राणा सरांनी तिला आवाज दिला.

“मिस प्रिशा..” राणा सर

प्रिशाने सरांकडे बघितले आणि म्हणाली,
“ येस सर?”

“ कम इन माय केबिन..”राणा सर

प्रिशा जरा घाबरली.ती स्वगत करू लागली,
‘कालच्या पॉवर सप्लाय बटनचे मॅटर सरांकडे पोहोचले की काय?बापरे आज पुन्हा सरांचे बोलणे खावे लागणार.देवा वाचव रे बाबा,प्लीज!’प्रिशाने एका हाताने नमस्कार केला.

“ हे काय?नमस्कार कोणाला?देवाला?” राणा सर

“ हो ना..आ..नाही.काही नाही.” प्रिशा

“ बरं. बाय द वे,वंडरफुल जॉब बाय यू येस्टर्डे! ग्रेट !!”
राणा सर

प्रिशा अचंबित झाली.तरीही स्वतःला सावरत ती म्हणाली,
“ ओहह,थँक्यू सर..”

“ काल,तुम्ही तुमचा प्रेझेन्स ऑफ माईंड दाखवला अन् मोठा अनर्थ टळला.यू आर अ परफेक्ट टीचर.त्यामुळे प्रिन्सिपल पाटील सरांनी तुम्हाला खास अभिनंदन करण्यासाठी बोलावले आहे.सो बी देयर, ही इज वेटींग..” राणा सर

“सो नाइस ऑफ यू सर.मी लगेच जाते पाटील सरांकडे..” प्रिशा

ती निघाली.जाताना तिचे विचारचक्र वेगाने फिरू लागले,
‘ कमाल आहे, काल हेच राणा सर माझ्याकडून एक चूक झाली म्हणून मला किती बोलले आणि आज एवढे छान बोलून परफेक्ट टीचर म्हणून मला संबोधले.वाव,फिलिंग व्हेरी व्हेरी हॅप्पी.. म्हणजे याचा अर्थ नथिंग इज परमनंट इन लाईफ.आपणच स्वतःला सावरत सर्व काही ठीक करायचं असतं. मी खरंच किती वेडी आहे यार! किती टेन्शन घेत होते कालच्या माझ्या हातून झालेल्या चुकीचं.असो! पण ज्याच्यामुळे हे झाले त्या समीरला तर आताच्या आता भेटायलाच पाहिजे.आता आधी पाटील सरांकडे जाते मग समीरच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्याला एक सुखद धक्का देईल.’
हलकेसे हसत हसत ती पाटील सरांच्या केबिनसमोर उभी राहिली.

“ मे आय कम इन सर?” प्रिशा

“ येस,कम इन मिस प्रिशा..”पाटील सर

प्रिशा पाटील सरांसमोर जाऊन उभी राहिली.

“ खूप छान कामगिरी केलीत तुम्ही काल.अभिनंदन!”पाटील सर

“ थँक्यू सर! यात समीर सरांचा देखील खारीचा वाटा आहे.ते होते म्हणून मला या संकटात ऐनवेळी मोठी मदत मिळाली.” प्रिशा

“ ओह!! वेट मी त्यांनाही बोलावून घेतो.”पाटील सर

पाटील सरांनी केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला फोन लावला.

“हॅलो,प्रोफेसर समीर यांना मी बोलावले आहे असे सांगा.” पाटील सर

“ पण सर ते आज आलेले नाहीत.ते आज लिव्हवर आहेत.” केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हेड, भाबड सर

“ ओके! ठीक आहे.”पाटील सर

पाटील सरांनी फोन ठेवला.
“ वेल,ते तर आज आलेले नाहीत.त्यांना अभिनंदन सांगा. तसेही ते तुमच्याकडे टर्म वर्क सॉफ्टवेअर शिकायला येणार आहेत.राईट?”

पाटील सरांजवळ डिपार्टमेंट अंटर्गत चालणाऱ्या गोष्टींची बरीच माहिती असते हे पाहून प्रिशा थक्क झाली.

“येस सर. हॅव अ नाइस डे!”
एवढे बोलून प्रिशा तिथून बाहेर पडली.ती आपल्या डिपार्टमेंटकडे जायला निघाली.तिचे मन समीरच्या विचारांनी व्यथित झाले.

‘अशी अचानक सुट्टी कशी घेतली त्याने? काही झालं तर नसेल ना त्याच्या घरी? तो ठीक असेल ना?
ओह! आज सकाळी मला त्याचा कॉल आला आणि मी वेडी चक्क त्याला कॉलबॅक करायला विसरले.एक काम करते, आता त्याला कॉल करून बघते म्हणजे नेमकी काय भानगड आहे ती कळेल.’प्रिशाने मनोमन असे ठरवले आणि कॉल डायल केला.

“ ऑल द लाईन्स इन धिस रुट आर बिझी. प्लिज ट्राय अगेन लेटर..”फोन मधून प्रत्युत्तर आले.

प्रिशाची बेचैनी वाढली.चालता चालता ती आपल्या टेबल जवळ आली.तिला काय करावे काहीच सुचत नव्हते.आपण इतके अस्वस्थ का होतोय? हे देखील तिला समजत नव्हते.

’खरंच माझेही त्याच्यावर प्रेम आहे म्हणून असे होतेय? एक मिनिट पण तो देखील माझ्यावर प्रेम करतो ना? अगदी खरंखूर?मला स्वतःला ही उत्तरं सापडणं अवघड आहे.त्याला प्रत्यक्ष भेटून मी हा प्रेमाचा गुंता सोडवणार! बास! ठरलय आता माझं!’ प्रिशा मनोमन पुटपुटली.

थोड्याच वेळात तिच्या लेक्चरची वेळ झाली आणि ती क्लासकडे निघाली.

लेक्चर छान चालू होते.सारे विद्यार्थी मन लाऊन ऐकत होते. बोर्डवरील महत्वाचे मुद्दे तिने मुलांना टिपायला सांगितले आणि अचानक तिला शेवटच्या बेंचवर समीर बसलेला दिसला.

त्याचे ते कुरळे कुरळे केस,हसरा चेहरा,दोघांच्या नात्यातील एक अनामिक ओढ तिला हवीहवीशी वाटत होती अन् तिला जवळ येण्यासाठी उद्युक्त करत होती.ती त्याच्याजवळ गेली पण तिथे कोणीही नव्हते.हा केवळ तिचा भास होता ज्यामुळे ती स्वतःची देखील राहिली नव्हती. आभास, आकर्षण,अनामिक ओढ,आत्मीयता आणि एकमेकांत आकंठ बुडून एकमेकांचे होणे ही प्रेमाची गोड लक्षणे आहेत हे तिला ठाऊक होते.आपल्यालाही असे प्रेम बिम होईल यावर तिला कधीच विश्वास नव्हता.तिचा हा विश्वास सत्यात उतरवण्यात,सार्थ ठरवण्यात समीर एक दुवा ठरला होता.

तेवढ्यात लेक्चर संपले.प्रिशा आपल्या टेबलजवळ आली.समीरला परत एकदा फोन करून बघायला हवा असे तिला वाटले.तिने फोन केला..

काय झाले असेल? समीरने अचानक सुट्टी का घेतली? जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..

भाग १४ समाप्त..
क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all