इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १५

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
रिंग जात होती. एकीकडे फोन कानाला लावून प्रिशाचे मन स्वतःशीच बोलत होते,

’असा कसा हा? मघाशी कॉल केल्यावर याचा फोन बिझी येत होता मग याला कॉल बॅक करता आला नाही?जरा म्हणून याला दुसऱ्यांची कदर नाही.खरंच इम्परफेक्ट आहे हा! तरीही काही झाले तर नसेल ना त्याला?यावेळी तरी समीरला फोन उचलू दे रे देवा,’अशी आर्त साद प्रिशाचे मन ईश्वराला देत होते.

पाच-सहा वेळा रिंग गेल्यावर पलीकडून आवाज आला,
“ हॅलो..”

आता कुठे प्रिशाचा जीव भांड्यात पडला होता. तिला जरा हायसे वाटले.परंतु समीरविषयी वाटणारी काळजी तिला भीतीकडे झुकवत असतानाच, काहीशा संमिश्र भावंनानी तिला घेरले.ती डायरेक्ट म्हणाली,

“ हॅलो, समीर तू बरा आहेस ना?”

“ हो.मी बरा आहे.”समीर

“ हुशssश् !” प्रिशा

“ काय हो काय झालं?”समीर

“ सगळ्यात आधी हे अहोजाओ करणं बंद कर.मी सुद्धा तुला आता आरेकारेच करणार आहे.त्याने नात्यात आपुलकी वाढते,परकेपणा राहत नाही.”प्रिशा

प्रिशाकडून नात्याबद्दल असे छान ऐकून समीरला रखरखत्या उन्हात गारेगार उसाचा रस पिल्यावर जसा दिलासा मिळतो तसा आपल्या नात्यात असलेल्या पोरकेपणाला काहीतरी अर्थ मिळाला, असा आशावाद मिळाला.

“बरं.मग आपलं नातं नक्की काय आहे हे आधी ठरवूया ?” समीर

प्रिशा आता जराशी कावरी बावरी झाली, खरं तर आनंदाने मोहरली म्हणुया हवं तर!

‘ बापरे! आता हा चक्क आय लव्ह यू, विल यू मॅरी मी म्हणतो की काय?’ असा विचार करता करताच तिच्या मनातील प्रेमाचे फुलपाखरू अलगद उडू लागले..

परंतु याने विषय छेडलाच आहे तर त्यालाच कबूल करू देत असे मनाला समजावत प्रिशा म्हणाली,
“ तूच सांग ना, आपलं नातं काय आहे ते?”

एव्हाना,आग दोनो तरफ बराबर लगी हैं| अशी परिस्थिती झाली होती.

तेवढयात अचानक समीरला कोणीतरी बोलावले.
“ एक्सक्युज मी सर! पेशंटसोबत तुम्ही आहात म्हणून डॉक्टरांना तुमच्याशी जरा बोलायचं होतं..”

प्रिशाला हे संभाषण अगदी स्पष्टपणे ऐकू आले.

समीर जरा गोंधळला आणि म्हणाला,
“ बरं.ठीक आहे.आलोच मी.”

“ ऐक ना प्रिशा,मी तुला नंतर कॉल करतो.” समीर

“ अरे,पण ….” प्रिशा

समीरने घाईतच फोन ठेवून दिला.

प्रिशा बराच वेळ मोबाईल हातात धरून बसली होती.
तेवढ्यात तिच्या पुढच्या लेक्चरची वेळ झाली.

काहीशी हतबल,नाखूष होत ती लेक्चरला गेली.लेक्चर व्यवस्थित पार पडले.

आपल्या टेबलजवळ येताच प्रिशाने पुन्हा समीरला फोन लावला.यावेळी त्याने लगेच फोन उचलला.

“हॅलो..”प्रिशा

“ ह..बोल..” समीर

“ मघाशी डॉक्टरांनी तुला का बोलावलं होतं? काय झालंय ज्यामुळे तू अचानक लिव्ह घेतलीस?”प्रिशा

“अगं तुला हे सगळं सांगणार तोच मला सिस्टरने बोलावलं. काय झालं,मी कॉलेजला निघालो होतो आणि अचानक रस्त्यात एक अपघात झालेला मी पाहिला.तिथे खूप लोकांची गर्दी जमली होती.जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं की माझ्याच वर्गातल्या एका मुलाचा हा अपघात झालाय. बाकीच्या लोकांसारखी बघ्याची भूमिका न घेता मी सरळ तिथे ॲम्बुलन्स बोलावली आणि त्याच्यासोबत हॉस्पिटलला गेलो. इमर्जन्सी केस म्हणून डॉक्टरांनी त्याला आत घेतले आणि तेवढ्यात मघाशी तुझा फोन आला.”समीर

“ अरेरे! मग काय म्हणाले रे डॉक्टर?”
प्रिशा

“ जरा बोन फ्रॅक्चर झालेले आहे पण तेही होईल बरे.नशीब अजून काही दुखापत झाली नाही.बरं तरी काही गर्दी नव्हती आज त्या रस्त्यावर..”समीर

“ थँक गॉड.त्याच्या आईवडिलांचा जीव हे सारे ऐकून कासावीस झाला असेल.” प्रिशा

“ आईवडील नाहीत त्याला.” समीर

“काय?”प्रिशा कळवळून म्हणाली.

“ मामांकडे राहतो तो शिक्षणासाठी. त्याचा मामा याच्या कॉलेजची फीस भरतो आणि मामी घरी उणे दूने बोलणे करत राहते.त्यामुळेच वैतागून त्याचा हा अपघात झाला.”समीर

“ मग आता? त्याच्या मामांना तरी याबाबत कल्पना द्यायला हवी.” प्रिशा

“ हो मी त्यांनाच सांगणार आहे. बघतो मेडिकल फीस मध्ये काही कंसेशन मिळते का ते!गरीब फॅमिली आहे त्याची.त्यामुळेच आज मी लिव्ह घेतली.” समीर

“ सो नाइस ऑफ यू.. आय ल…” प्रिशा भावनेच्या भरात म्हणाली.

“काय? “ समीरच्या मनात देखील प्रिशा
बद्दल प्रेमभावना उद्युक्त झाली होती.फक्त त्याला एका इशाऱ्याची साद हवी होती.

“ आय मीन आय कुडोस यू.म्हणजे मला तू जे केलेस त्याचा अभिमान आहे.” प्रिशा

“ ओह.. थँक्यू सो मच! बरं चल आता फोन ठेवतो.त्याच्या मामांना कळवतो याबद्दल.” समीर

“ ओके, बाय.. अँड टेक केअर..” प्रिशा

प्रिशाला आपल्याविषयीची असणारी काळजी समीरला या शब्दांवरून कळाली होती. आपल्या मनासारखे तिचेही मन प्रेमाच्या नितळ,गोड भावनेत गुंतले आहे याचा त्याला साक्षात्कार झाला होता.

बऱ्याचदा, रुसवेफुगवे ही प्रेमाची पहिली पायरी असते.या रुसव्या फुगव्यांतून फुलत जाणारे मैत्रीचे नाते अन् मग याच नात्याचे प्रेमाच्या गोड नात्यात होणारी दोन जीवांची आल्हाददायी गुंफण खरंच कमाल असते.

बघुया प्रिशा आणि समीरची ही गुंफण कशी होते ते..

सो स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..

क्रमशः

भाग १५ समाप्त..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all