इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १८

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
वैभवी मॅडम समीरच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये पोहोचल्या.स्टाफ रूममध्ये डोकावताच त्यांना अचानक मागून एक आवाज आला.
“ कोण हवंय आपल्याला?”

चोराचा चेहरा चोरी पकडल्यावर जसा होतो अगदी तसाच वैभवी मॅडमचा झाला होता. जरासे भांबवल्यागत त्यांनी मागे वळून पाहिले.

ते महेश सर होते.महेश सरांना वैभवी मॅडमना पाहून हम आपके है कौन चित्रपटातील एक गाणे मनातल्या मनात ऐकू यायला लागले,
‘ पहला पहला प्यार हैं
पहली पहली बार हैं..’

तसे पाहिले तर वैभवी मॅडम देखील दिसायला सुंदर होत्या.वयाच्या चाळिशीत अनमॅरीड असूनही त्यांनी स्वतःची फिगर चांगली मेन्टेन केलेली होती,पण स्वभावातील अकड मात्र कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच अशी होती. त्यांच्या अंगी बुद्धिमत्ता होतीच पण तिचा प्रचंड गर्व झाल्याने मीपणा गाजवायला त्यांना खूप आवडत असे अन् त्यामुळे त्यांचा स्वभाव विकृत झालेला होता.

महेश सर देखील असेच काहीसे होते. फरक एवढाच की महेश सर जरासे वेंधळे होते तर वैभवी चाणाक्ष.

महेश सर वैभवी मॅडमकडे पाहून स्तब्ध झालेले होते.
“ एक्सक्युज मी?” त्यांच्या डोळ्यांसमोर बोटांची चुटकी वाजवत वैभवी मॅडमने महेश सरांना शुद्धीवर आणले.

“ हा..” महेश सर ध्यानावर येत म्हणाले.

“ काय बघताय असे माझ्याकडे?” वैभवी

“ तुम्ही म्हणजे नितळ कांतीचा करीश्मा आहात..” महेश सर

“ ओह हॅलो? तोंड सांभाळून बोला.”
वैभवी

“ बघा,इथे मी एका सुंदर स्त्रीचं इतकं कौतुक करतोय आणि थँक्यू म्हणायचे सोडून हिला राग येतोय.खऱ्याचा जमानाच नाही राव या दुनियेत!” महेश सर

“ उफफ्! कोण भेटलं यार मला इथे?” वैभवी

“ अहो मी महेश,
( शर्टची कॉलर वर करत)फ्युचर एच. ओ. डी.,केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट.” महेश सर

वैभवी मॅडम आता चांगल्याच वैतागल्या होत्या. त्यांनी इकडे तिकडे पाहिले अन् त्यांना एच. ओ. डी.,केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अशा नावाची एक रूम दिसली.त्या तिथे गेल्या. त्यांच्यामागे महेश सर देखील गेले.

“ मे आय कम इन सर?”वैभवी

“ येस.” भाबड सर

वैभवी मॅडम आत आल्या.
“ थँक्यू सर.मी वैभवी,सीनिअर प्रोफेसर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिपार्टमेंट.”वैभवी.

“ अच्छा.बोला काय काम काढलंत माझ्याकडे?”भाबड सर

“ मला ना समीर सरांच्या लेक्चर्सचा टाईम टेबल हवा होता.” वैभवी

‘ अरे बापरे!यांच्यावर सुद्धा त्या समीरने जादू केली की काय? काही सांगता येत नाही त्याचं. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला जाऊन प्रिशासोबत हिलाही पटवलं असेल त्याने.’ महेश सर मनातल्या मनात पुटपुटले.

“ कशासाठी?”भाबड सर

“ ॲक्च्युअली,ते आणि मी फर्स्ट इयरच्या एका क्लासला शिकवतो.आमचे लेक्चर्स मागे पुढेच असतात . मी लवकरच एका दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होणार आहे त्यामुळे मला त्यांच्या आणि माझ्या लेक्चर्समध्ये शफलिंग करायचं होतं.”वैभवी

“ हो का? बरं .पण मग तुम्हाला याबद्दल त्यांच्याशीच बोलावं लागेल.” भाबड सर


“ ते मला दिसले नाही.त्यामुळे तुमचे टाईम टेबल इन्चार्ज असतील त्यांच्याशी बोलून मी सध्या फक्त त्यांचा टाईम टेबल घेते आणि मग त्यांच्याशी याविषयी बोलते.अर्थात तुमची हरकत नसेल तर!” वैभवी.

“ माझी काहीही हरकत नाही मॅडम. विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान नको हीच माफक अपेक्षा आहे माझी. सो कॅरी ऑन.आमचे टाईम टेबल इन्चार्ज हे सर आहेत.महेश सोनवणे.” भाबड सर

“ ओके सर. थँक्यू फॉर युवर हेल्प.” वैभवी

“ ओह! दॅट्स माय प्लेझर !” भाबड सर

वैभवी आणि महेश सर भाबड सरांच्या केबिन मधून बाहेर आले.

“ हे बघा,उगाच माझा टाईम वेस्ट करू नका.मला समीरचा टाईम टेबल द्या.” वैभवी

“ ओके. ब्युटिफुल लेडी.( टेबलच्या ड्रॉवर मधून एक फाईल काढत) हीअर इट इज..”महेश सर

महेश सरांच्या हातातून वैभवी मॅडमने फाईल हिसकून घेतली अन् त्या फाईल चाळू लागल्या.

“ येस. हिअर इट इज.(मोबाईल मध्ये फोटो काढत) थँक्यू डियर.” वैभवी

“ ओह थँक्यू मॅडम.(आपला भांग हाताने हलकेसे नीट करत) अजून काय मदत करू शकतो मी तुमची?”महेश सर

“ जेवढी केली तेवढी पुरेशी आहे. काही काम असेल तर सांगेलच.( वैभवी मॅडमने त्यांचा टाय त्यांच्याच चेहऱ्यावर हलकेच भिरकावला.)” वैभवी

“ आय हाय!” महेश सर

वैभवी मॅडम तिथून निघाल्या.त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे महेश सर बऱ्याच वेळ पाहत उभे होते.

‘ चला,या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला हा महेश एक मोहरा म्हणून वापरता येऊ शकतो.समीरची काहीही माहीती मला हा देऊ शकतो बदल्यात त्याला जरा लटके झटके दाखवायचे. बाय द वे आज खूप दिवसांनंतर कोणीतरी माझ्यावर लाईन मारली. ॲम आय ग्रोईंग यंगर डे बाय डे?’ आपल्या डिपार्टमेंटकडे जात वैभवी स्वतःशीच पुटपुटली.

काय प्लॅन असेल पुढे वैभवीचा? महेश आणि
वैभवी मिळून समीर आणि प्रिशाच्या प्रेमाचा खेळ कसा बिघडवतील?असे घडू नये म्हणून समीर आणि प्रिशा काय करतील? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

भाग १८ समाप्त.

( कथा बोअर तर होत नाहीये ना? नाही म्हणजे काही ट्विस्ट आणि टर्न अजून बाकी आहेत. महाविद्यालयीन पार्श्वभूमी असलेल्या कथेला हात घालण्याचा हा माझा पहिला प्रयत्न..सो कळवा तुम्हाला काय वाटतं कथेबद्दल ते..)

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all