इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १९

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची प्रेमकहाणी
समीर आणि प्रिशा एकमेकांच्या प्रेमरंगात तर न्हाले होतेच पण अजून या नात्याचा स्वीकार दोघांनीही केला नव्हता.ते म्हणतात ना,नको म्हणत असताना देखील हवेहवेसे वाटणारे प्रेम गोजिरवाणे असते आणि ते भाग्यवंत लोकांनाच मिळते.

त्या दिवशी समीर आपल्या कामात गुंतलेला होता. मायक्रोसॉफ्ट एक्सएल हे सॉफ्टवेअर टर्मवर्क फ्रेम करण्यासाठी वापरायचं होतं.तशी तर समीरला थोडी प्रॅक्टिस होती या सॉफ्टवेअरची पण त्याला त्यात फ्ल्यूएन्सी हवी होती.त्यासाठी आपल्या डिपार्टमेंट मधील कॉम्प्युटर लॅबमध्ये बसून त्याने प्रिशाला फोन करायचे ठरवले.तिला यासाठी इथे बोलवावं की मीच तिच्याकडे जावं असा विचार करता करता त्याने तिला फोन लावला,रिंग गेली.

तेवढ्यात समीरला एक आवाज ऐकू आला,
“ एक्सक्यूज मी?”

समीरने प्रिशाला लावलेला फोन कट करत मागे वळून पाहिले.

साधारण तिशीतील एक तरुणी डीप नेक स्लिव्हलेस ब्लाउसमध्ये,गुलाबी रंगाच्या साडीत अत्यंत मादक अशा पोझमध्ये उभी होती.चेहऱ्यावर भरपूर मेक्-अप,मुलायम,झुपकेदार मखमली असे लांबसडक मोकळे केस, उठावदार भुवया,रसरशीत असे गुलाबी लिपस्टिक लावलेले नाजूक ओठ आणि अत्यंत नितळ कांती असलेला तिचा लयबद्ध देह कुठल्याही पुरुषाला आकर्षक वाटेल असाच होता.समीर देखील क्षणभर तिच्याकडे पाहून थबकला पण त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मनातील पहिले आणि खरेखुरे प्रेम म्हणजे प्रिशाचाच चेहरा होता.त्यामुळे त्याने स्वतःला सावरले आणि भानावर आला.

“ ह.. बोला?कोण पाहिजे आपल्याला?”समीर

“ मला समीर सरांना भेटायचे होते.कुठे भेटतील ते?”

एवढ्या सुंदर स्त्रीचे माझ्याकडे काय काम? या विचारांत समीर हरवला.

“ एक्सक्युज मी?” तिने पुन्हा विचारले.

“ हा,मीच आहे समीर.काय काम आहे आपले माझ्याकडे?”समीर

कॉम्प्युटर लॅबमध्ये कोणीही नाही असे पाहून तिने आपला पदर चुकून खाली पडला असे भासवत नीट करण्याचा प्रयत्न केला.

“ उप्स!!”

आपली वक्षस्थळे किती भरीव आहेत हेच ती समीरला दाखवण्याचा जणू प्रयत्न करत होती.एकनिष्ठ समीर मात्र तिच्या या डावाला भुलला नाही.त्याने मान फिरवून पुन्हा विचारले,

“ काय काम आहे तुमचे माझ्याकडे? तुम्ही कोण आहात?”समीर

समीरच्या थोडे जवळ येत ती म्हणाली,
“ मी वनिता मेढे.असिस्टंट प्रोफेसर, बायोटेक डिपार्टमेंट.”

तिच्या अशा वात्रट हालचाली पाहून समीरचा पारा हळूहळू चढू लागला.

“ काम काय तुमचं माझ्याकडे?कम टू द पॉइंट फास्ट!”समीर

“ एवढी पण काय घाई आहे?” तिने समीरच्या हातावर हलकेच हात ठेवला.

“ एक्स्क्युज मी!”समीर रागाने उठत म्हणाला.

वनिता मॅडम आपल्या साडीचा फॉल सँडलमध्ये अडकुन, तोल जाऊन समीरच्या अंगावर कोसळणार तोच समीरने त्यांना अलगद पकडले,अगदी सिनेमात हिरो हिरोईनला पकडतो तसं..

तेवढ्यात आपल्याला आलेला समीरचा मिस्ड कॉल पाहून आनंदित झालेली प्रिशा तिथे हजर झाली.आपल्या डोळ्यासमोरील चित्र पाहून तिच्या अंगाचा तिळपापड झाला.अचानक समोर प्रिशा आलेली पाहून समीरने वनिता मॅडमला हळूच उभे केले.त्या खाली पडता पडता वाचल्या.

“अरे? मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सएल हे सॉफ्टवेअर शिकवण्यासाठी मदत करावी असे मला भाबड सरांनी सांगितले म्हणून इथे आले अन् तुम्ही माझ्यासारख्या सुंदर स्त्रीला आधी आपल्या ओंजळीत घेऊन असे प्रेमाने उभे करताय.. इss श्य!!”वनिता मॅडम

हे सारे ऐकल्यावर प्रिशाचा पारा प्रचंड चढला.ती तावातावाने तिथून निघून गेली.

‘ कोण समजतो हा स्वतःला?म्हणजे मला याने हे चाळे बघायला इथे बोलावलं होतं? शीss..कसं पकडलं होतं त्याने त्या मॅडमला? विद्येच्या मंदिरात असे घाणेरडे वागणे शोभले का याला? दिसायला सुंदर म्हणून तिच्यासोबत असे गुलछर्ररे उडवता यावे म्हणून याने हिच्याकडून ते सॉफ्टवेअर शिकायचे ठरवले आहे तर! अच्छा! एकदा भेट बेटा तू मला, तुला असा धडा शिकविन की माझे नाव तुझ्या कायम लक्षात राहील. हम्म.. शेवटी एक इम्परफेक्ट आणि वाया गेलेला माणूस असाच वागणार,हे माझ्यासारख्या मुलीला समजले नाही ही माझी चूक झाली.’समीरबद्दल असे असंख्य विचार प्रिशाच्या मनात पिंगा घालत होते.

ती तिच्या टेबलजवळ पोहोचली.तिने तातडीने डोळे पुसत एक फोन केला..

“ हॅलो..”प्रिशा

“ हं बोल..” समीर

“ आपला विषय इथेच संपला.गुड बाय..”प्रिशा

“प्रिशा,प्रिशा..” समीर

रागाने लालबुंद झालेल्या प्रिशाने ताबडतोब फोन कट करून टाकला.

इकडे वनिता समीरचा फोनवर चाललेला गोंधळ पाहून,कंटाळून शेजारच्या कॉम्प्युटरवर टाईमपास करत बसली.समीरला काय करावे ते कळेना.

‘आता प्रिशाला कसे मनवू?’ हा विचार करत असताना त्याने एक मेसेज टाईप केला.

‘संध्याकाळी विद्यानिकेतन बागेत ये.प्लीज गैरसमज करून घेऊ नको.महत्वाचे बोलायचे आहे.
टू प्रिशा..
फ्रॉम समीर..’

मेसेज सेंट म्हणून मोबाईलची ट्यून वाजली. प्रिशानेही त्वरित आपला मेसेज वाचला असे पाहून समीरने सुटकेचा निःश्वास सोडला.

वनिता मॅडमकडे जाऊन रागातच त्यांच्याकडे बोट करून समीर म्हणाला,

“ डोन्ट यू डेअर टू बी अराऊंड मी.”

वनिता मॅडम घाबरतच तिथून निघून गेल्या..

काय आहे ही वनिता मॅडमची भानगड?खरंच भाबड सरांनी त्यांना समीरकडे पाठवले होते? प्रिशाला झालेला गैरसमज समीर कसा दूर करेल? प्रिशा आणि समीर समजून घेतील एकमेकांना?जाणून घेण्यासाठी स्टे ट्युनड टू ‘ इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..’

भाग १९ समाप्त..

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all