ईरा : लेखणीचे वरदान

ईरा : साक्षात सरस्वतीचे रुप
ईरा : लेखणीचे वरदान

साक्षात अवतरली ही
ईरावर सरस्वती
लेखकांना मिळत आहे
लिहण्यास गती

कशी सुचली असेल
ईराची भन्नाट संकल्पना
ईराच्या या सर्वेसर्वा
नाव त्यांंचे संजना

शब्दांची नाळ कधी
जोडली कळलेच नाही
लेखकांचे नाते ईराशी
लेखनाने अधिक दृढ होई

माणुसकीने जपले जातात
ईथे आपुलकीने स्नेहबंध
ईराच्या बहारदार लेखनाचा
जगभर पसरतो सुंगध

ईरावरील स्पर्धा म्हणजे
लेखनाचा असतो श्वास
दर्जेदार लेखन करणे
हाच लेखकांचा ध्यास

लेखकांच्या गोड संवादाने
ईरा कुटुंंब सतत बहरते
प्रगल्भ लेखन व उत्साहाने
ते अधिक खुलते

शब्दांनाही ईरामध्ये मिळतो
लेखनाचा मेहनताना
प्रतिभासंपन्न लेखकांना
उत्साह येतो लिहताना

दरवर्षी अलोट गर्दीत
लेखकांचा भरतो कुंभमेळा
लेखकांच्या कलागुणांचा
हा असतो नेत्रदिपक सोहळा

सर्वांच्या आवडीचे व प्रेमाचे
व्यासपीठ आहे ईरा
लेखनाच्या अमर्याद आनंदासाठी
लेखकांनो ईरावर लेखन करा


©®नामदेवपाटील