जाउबाई-१

नको नको जाउबाई

"तुझा नवरा एकवेळ तुझं ऐकणार नाही पण माझा एकही शब्द खाली पडू देणार नाही.."

थोरल्या जाउबाई मिजाशीत आपल्या नवीनच लग्न झालेल्या धाकल्या जाउबाईला सांगत होत्या..

धाकल्या जाउबाईला धस्स झालं..ताई असं कसं बोलू शकतात? हे असं तोंडावर बोलण्याचा काय अर्थ समजायचा? नवीनच लग्न झालेल्या केतकीला ताईंचं बोलणं खटकलं, पण घरात नवीन असल्याने बोलणार कसं?

केतकीच्या लग्नाला अवघा महिना झालेला. सासूबाईंचं वय झाल्याने घरातल्या कामात त्या लक्ष घालत नसत. सगळं काही थोरल्या सुनेकडे सोपवून त्या मोकळ्या झाल्या होत्या. मोठ्या सुनेने सगळी सूत्र हाती घेतली होती. त्यामुळे मोठ्या सुनेला घरात मोठा मान होता. घरात कुणीही त्यांचा शब्द खाली पडू देत नसे.

घरात कुठलाही कार्यक्रम असो वा कुठलाही निर्णय असो, थोरल्या जाउबाईंशीवाय कुणाचं पान हलत नसे.

सासूबाई भोळवट स्वभावाच्या. थोरल्या सुनेने त्यांचा हाच स्वभाब ओळखून त्यांना बरोबर आपल्या मुठीत ठेवलं होतं. सासूबाईंना कळत नव्हतं असं नाही, पण आता आपल्यानंतर घराची जबाबदारी थोरल्या सुनेकडे असल्याने तिला दुखावून चालणार नाही याची काळजी त्या घेत असत.

थोरली सून जेव्हा लग्न करून आली तेव्हा तिचा लहान दिर कॉलेजला होता. सासूबाईंना दोनच मुलं असल्याने त्यांना मुलीची फार हौस होती. लहान दिर केदार बहिणीची माया वहिनीला देत होता. दिराचं असं भावाप्रमाणे काळजी घेणं, प्रत्येक गोष्टीत मदत करणं, प्रत्येक गोष्टीत सल्ला घेणं हे थोरल्या सुनेला खूप भावलं. तिनेही भावाप्रमाणे दिराला माया दिली. केदारसाठी वहिनी म्हणजे जणू दुसरी आईच.

थोरली सून आणि केदार यांचं बॉंडिंग खूप छान होतं. वहिनीला काहीही लागलं तरी केदार दुसऱ्या मिनिटाला समोर आणून ठेवत असे. वहिनीला काय हवं काय नको याची काळजी तो घेत असे.

थोरल्या जावेची मजा होती. एकीकडे सासूबाई त्यांचं सगळं ऐकत असायच्या, आई मान देते म्हणून त्यांचा मुलगाही बायकोला डोक्यावर घ्यायचा, त्यात भरीस भर म्हणून लाडका दिर...



🎭 Series Post

View all