जाउबाई-4

नको नको जाउबाई
सकाळची वेळ होती, केतकी अंगण झाडत होती. सगळी माणसं ऑफिसला निघून गेलेली. केतकी समोरच्या बागेतून देवासाठी फुलं आणायला जात होती इतक्यात एक भरधाव गाडीने केतकीला ठोकलं आणि गाडी निघून गेली.

केतकी रक्ताच्या थारोळ्यात पडली..घरातले सगळे धावत आले. Ambulance बोलावण्यात आली. केदार, त्याचा भाऊ, जाउबाई सगळे दवाखान्यात पोचले. प्राथमिक उपचार सुरू झाले.

दैव बलवत्तर म्हणून काही जास्त झालं नव्हतं, जखम होती फक्त ती भरून निघणार होती. तरीही डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती. आठ दिवस दवाखान्यातच मुक्काम सांगितला होता.

जाउबाई आणि तिचे मिस्टर घरी आले. केदार तिथेच थांबला. तेवढ्यात त्याला ऑफिसमध्ये फोन आला, की अमेरिकेचे client अचानक visit ला आलेत. त्यांना जे सांगायचं आहे ती माहिती फक्त केदारकडे होती. त्यामुळे त्याला अर्जंट जाणं भाग होतं.

"मिस्टर केदार, मी तुमची परिस्थिती समजू शकतो पण फक्त 2 तासासाठी या..कुणालातरी मॅडम जवळ थांबायला सांगा.."

केदारने हक्काने वहिनीला फोन केला,

"वाहिनी, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या.."

"सगळं ठीक आहे ना?"

"हो, मला ऑफिसमध्ये जायचं आहे अर्जंट, फक्त 2 तासाचं काम आहे..तोवर तुम्ही थांबा केतकीजवळ..आईला बाबांना बसवणार नाही आणि दादा ऑफिसला गेलाय..हॅलो, हॅलो? वहिनी? ऐकताय ना??"

"अरे देवा...दुसरं कुणी नाही का? मी आले असते पण आज माझा पाय जरा जास्तच दुखतोय..नाही बसवणार मला..डबा देणार होते मी पण नाही रे उभं राहवत, शेजारी एक खानावळ आहे बघ, छान जेवण मिळतं तिथे.."

तेवढ्यात जाउबाईंच्या हातातून त्यांच्या आईने फोन हिसकवला,

"मी येते केतकीजवळ... काळजी करू नका.."

जाउबाईंच्या आई लगेच निघायची तयारी करू लागल्या,

"काय गं आई, काय गरज होती तुला...काय त्या केतकीचा पुळका आलाय काय माहित.."

"तुझा खरंच पाय दुखतोय का गं? मघाशी tv पाहायचा होता तर धावत धावत वरून खाली आलीस.."

"पाय नाही दुखत पण.."

"पण काय??"

"नाही जायचं मला त्या केतकीला सांभाळायला..कोण लागून चालली ती?? तिने आमची सेवा करायची तर ते राहिलं... तिचीच सेवा करावी लागतेय...काय दिवस आलेत.."

"इतके दिवस तिच्या नवऱ्याने तुझ्यासाठी इतकं काही केलं..मग तुझं काम नाही त्याच्या बायकोला आधार द्यायचं? सोड, तुझ्याशी डोकं लावण्यात काही अर्थ नाही.."

🎭 Series Post

View all