शब्दांची कविता

ईरा : शब्दांचा उत्सव
शब्द

कोठून आले हे शब्द
जोडीती सर्वाना लयबद्ध

शब्दच आमुची फुले
सर्वांना आहे ते खुले

लेखणीचा आहेत ते आधार
अर्थात त्यांंच्या वेगळीच धार

शब्दाविना अपुरे सगळे
महत्व त्यांचे आगळे वेगळे

मिळेल जेंव्हा शब्दांंचे कुरण
लेखणीला मिळे लिहण्याचे स्फुरण

साकारली ही कविता सारी
शब्दांची ही किमया न्यारी

©नामदेवपाटील