तिचं तिला जगु द्या अंतिम भाग

कौटुंबिक
भाग -3

" काही नाही गं आई, ते भरून आलं तु जां.. " नणंद बोलते.

रात्र होते, मिताली जेवणाची ताट घेते. तिची नणंद सोफ्यावर सासुच्या बाजुला बसुन मिताली काय करते काय नाही हे पाहत असते..

मिताली जेवणाची ताट लावते, " काय गं किती वाला तांदूळ लावलास..? "

" पन्नास वाला का..? "

" अगं थोडा चिकट झाला, तुला जमला नसेल बनवायला.. आम्ही बाई चाळीस वाला खातो तरी सुट सुटीत होतो.. "

" काय बोलतेस काय.. बघ शिकुन घे हिच्या कडुन.. " सासु टोमणे मारते.

" आई अहो.. " तिचा नवरा तिला थांबवतो.

" अगं आई तु विसरलीस, आपण तर कित्येक महिने हाच तांदूळ खातोय तुला गिळायला बरा पडतो ना म्हणुन.. " जसं तिचा नवरा उत्तर देतो दोघेही शांत होतात.

सकाळ होते, मिताली उठून बाहेर येते.
सगळी कामं भराभर आवरून घेते, तिला आज बाहेर जायचं होतं तसं हे तिने तिच्या सासुला कालच सांगितलेलं होतं..

सासु आणि नणंद दोघेही खिडक्याचे पडदे धुवायला काढतात..
" अहो आई हे पडदे आता कशाला, मि नंतर धुते की.. उगाच ताईंना कशाला आल्या आल्या कामं.. " मिताली बोलते.

" अगं उद्या कशाला पाहिलंस ना किती मळले आहेत ते, आजच धुवून काढ गं बाई.. "आणि तिची नणंद पाण्याने भरलेल्या बादल्यात पडदे भिजत घालते..

" अगं पडदे तु धुणार ताई कशाला..? " सासु बोलते.

" आणि हो पडदे हाताने धु मशीन ला नको... " आणि त्या दोघीही खुर्ची घेऊन हीची मजा बघत बसतात..

रात्र होते, तिचा नवरा तिची वाट पाहत बेडरूम मध्ये असतो," अगं किती कामं करशील, तु फारच थकलेली दिसतेय.. " तो प्रेमाने विचारतो..

" ताई नेहमी येतात आणि आपल्या घरात सौंसारात लुडबुड का करतात.. " ती नवऱ्याला विचारते.

" आता हे पडदे काढायची काय गरज होती, तांदूळ वरून बोलायची काय गरज होती.. "

" जाऊदे, राहायला आली ना तिला आपल्या शिवाय कोण आहे.? " नवरा तिला समजावतो.

" सौसार आपला आहे ना मग त्या का बोलतात मध्ये मध्ये, आलात तर शांत राहतील तर नाही.. " मिताली फारच चिडलेली असते...

तो तिला जवळ घेतो आणि शांत करतो, " मि समजावेन तिला.. "असं बोलुन तो तिला धीर देतो..

सौंसारात लुडबुड कोणाची झाली तर सौसाराचा धागा ढिला पडतो....

समाप्त...

🎭 Series Post

View all