तिचं तिला जगु द्या भाग -1

कौटुंबिक
विषय - सौसारातली लुडबुड

भाग -1

सकाळी सकाळी दहा वाजता मितालीच्या नणंद बाई दारात येऊन उभ्या..

त्यांना उभं पाहुन मितालीच्या कपाळावर सतराशे साठ आट्या आल्या.

" हे काय, ताई अचानक कसं येणं केलं..? " मिताली दारातच विचारते.

" हा प्रश्न करण्यापेक्षा माझं स्वागत कर, माझी बॅग न्हेऊन आत ठेव. नको ते प्रश्न काय करत बसलीस.. " मितालीची नणंद तिला दरवाजातुन बाजुला करत.

मिताली तिची बॅग आत घेते आणि दार लावते.
जोर जोरात नणंदबाई , " आई... आई.. "ओरडते.

" अहो ताई हळू की, आई आत पूजा करत आहेत तुम्ही बसा मि पाणी आणते.. " आणि मिताली स्वयंपाक घरात जाऊन पाण्याचा ग्लास भरून आणते.

मितालीची नणंद घटा घटा पाणी पिते, " बरं ताई तुम्ही काहीही न सांगता आलात, म्हणजे काही कळवलात नाही.. "
" आणि ही बॅग तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का..? "

" अगं दमानं घे, मि कुठे ही बाहेर जात नाही इथेच आली राहायला.. " राहायला म्हटल्यावर मितालीला प्रचंड राग येतो, पण ती कोणा सामोरं ही व्यक्त करू शकत नव्हती.

तिची नणंद आल्यावर कधीचं शांत राहत नाही, काही ना काही खुसपट काढत राहते. शिवाय किचनवर तर सरळ ताबा मिळवते, आणि सासु बाईंचे कान भरणे हे ही बरं जमत त्यांना. आता गेल्याच महिन्यात त्या चक्क दोन दिवस राहुन गेल्या तरी ही त्या आता आल्याचं..

"काय तर म्हणे माला आईची काळजी वाटते, तु तिचे हाल तर करत नाही ना हे पाहण्यासाठी ती येते."

तेवढ्यात सासु देव पूजा आटपून बाहेर येते, लेकीला पाहुन तिला असा काय आनंद होतो की जसं ती खुप महिन्यांनी भेटली..

" आई गं बरी आहेस ना..? काही त्रास तर नाही ना..? " नणंद तिची टोमन्याने विचारते.

" हो गं बरी आहे मि, आणि ही बॅग घेऊन कुठे निघालीस..? "
" अगं अशी काय करते पाच दिवस मि इथेच राहणार आहे."

" हो बाई तु इथेच रहा, तुझं ही माहेर आहे की.. " सासु तिच्या पाठीवर थाप देत.

मितालीचा चेहरा पडतो, " ह्यांना काय गरज, प्रत्येक महिन्याला इथे यायची काय गरज लग्न केलात ना मग रहा सासरी. बघावं तेव्हा माहेरी, डोक्याला ताप आहे नुसता.. "
ती स्वतःशीच पुटपुटते.

आणि नवऱ्याला उठवायला, बेडरूम मध्ये जाते मिताली त्याला जोरजोरात हलवते, " अहो उठा... उठा की.. "

" अगं झोपू दे की ऑफिस ला आरामात जायचं आहे.. "

क्रमश...

🎭 Series Post

View all