तु तुझं पहा शीर्षक अंतिम भाग

कौटुंबिक
भाग -3


विषय - ती नाही कमवत पण..?

" अगं जावई आहेत त्यांच्या कडुन कसं घेऊ, तु उगाच त्यांना सांगु नको. आणि तसं ही माझ्याकडे काही असतील ते देऊ आणि दागिने आहेत की.. " तिची आई बोलते.

" नाही दागिने नको, तु थांब ते पैसे ही ठेव बाबांना नंतर लागतील. मि आहे ना करते काही तरी. " रमा बोलते.

तेवढ्यात आशु येतो, " बाबा कसे आहेत..? तु डॉक्टरांना भेटलीस का..? काय म्हणाले डॉक्टर..? "

ती आशु ला बाजुला घेते, " आता पन्नास हजार भरा म्हणाले आहेत.. "

" हा मग..?"

" आपण करूया का..? आज पन्नास हजार बोललेत अजुन किती दिवस लागतील, बिल किती येईल माहित नाही. आणि मि त्यांची एकुलती एक मुलगी, तुम्ही जावई. आणि जावई मुलासारखा असतो, मदत झाली तर बरं वाटेल.. " रमा त्याला समजावते.

" तुला माहित आहे आधीच घराचे हफ्ते, कार लोन सगळंच तुझ्या सामोरं आहे कुठून करणार मदत आपण. तु त्यांना सांग दागिने असतील तर ते ठेवा, आणि भरा पैसे.. " हे उत्तर ऐकुन रमा ला फार वाईट वाटतं, आपला नवरा जावई म्हणुन मदत करायला तयार नाही..

" म्हणजे तुम्ही काहीच मदत करणार नाही तर.. " रमा बोलते.

" मि कमवत नाही आणि जर कमवत असती तर नक्कीच मदत केली असती, पण मि माझे दागिने ठेवुन माझ्या आई वडिलांना मदत करेन. " आणि ती त्याच्या पुढ्यात गळ्यातलं मंगळसूत्र काढते..

" हे दागिने माझे आहेत ह्याच काय करायचं आणि कुठे वापरायचे हे मि ठरवेन.. "

" म्हणजे आता तु दागिने ठेवणार..? आणि मग सोडवणार कसे.. तुला माहित आहे दागिन्याचा भाव किती झाला आहे ते..? "

" तुमच्या आईच्या वेळेस ठेवले होते ना दागिने, तेव्हा मि काही म्हटलं का नाही ना? मग माला माझ्या आईवडिलांना मदत करू द्या.. "

आशु तिच्या कडे पहातचं राहतो..

" आणि तुम्ही ह्या पुढे हॉस्पिटलला नाही आलात तरी चालेल, मुलगी म्हणुन मि त्यांच्या कायम सोबत आहे.."

खरचं जेव्हा आपण कमवत नाही ना तेव्हा आपण जास्त हलबल होतो.

समाप्त...


🎭 Series Post

View all