तु तुझं पहा.. शीर्षक -1

कौटुंबिक
विषय - ती नाही कमवत पण..?

शीर्षक - 1

" आशु ही साडी बघ, कशी छान आहे ना..? " रमा मोबाईल मधली साडी आशु ला दाखवते.

आशु तिचा नवरा, चहा चा घोट घेत, " हो छान आहे. " आणि मान डोलावतो.

" ऐक ना घेऊ का साडी, माला फार आवडली आहे. " रमा पुन्हा पुन्हा त्याला मोबाईल मधील साडीचा फोटो दाखवते.

पण आशु तिच्याकडे दुर्लक्ष करतो, " यार पहा ना, काय सारख दुर्लक्ष करता " रमा चिडून त्याला बोलते.

" अगं रमा आता मागच्या महिन्यातच तुला साडी घेतली ना.. मग आता पुन्हा नविन साडीसाठी हट्ट का.. "

" अहो पण ही साडी सेल मध्ये आहे, आणि तुम्हाला माहित आहे माला किती आवड आहे ते. "

" हे बघ माला ऑफिस जायला उशीर होतोय, साडी दाखवण्यापेक्षा माला टिफिन दे मि जातो.. " आणि आशु हातातला कप बाजुला ठेवुन ऑफिस ची तयारी करतो.

" एक साडी द्यायला काय प्रॉब्लेम आहे, पण ही साडी मि घेऊनच राहणार.. " रमा मनातल्या मनात स्वतःशीच बोलते.

आशुला टिफिन देऊन, रमा कामाला लागते. रमा एक गृहिणी आणि आशु एका चांगल्या कंपनीत कामाला. त्यामुळे पगार चांगला होता, पण पगार घराचे हफ्ते, कार चं लोन आणि मुलाचं शिक्षण करण्यात अर्धा व्हायचा.

काहीशी रक्कम आशु रमाला घर चालवण्यासाठी द्यायचा. त्याने रमाला स्पष्ट सांगितलं बाहेर जॉब बघायची काही गरज नाही, तु घरी रहा आणि घर तेवढं सांभाळ..

दिलेल्या पैशात रमा घर, किराणा सांभाळून घेत होती. आणि काही पैसे उरले की त्याची बाजुला सेविंग तेवढी करायची पण ह्याची भनक तिने आशु ला लागु दिली नाही.

दुपार होते रमाला तिच्या आई चा फोन येतो, रमा कॉल घेते आईचा फोन म्हणजे तिला फार बरं वाटायचं. ती आई जवळ मन मोकळ मात्र तेवढी करायची.

" अगं रमा तुझ्या बाबांची तब्येत खराब झाली आहे, डॉक्टरांनी ऍडमिट करायला सांगितलं आहे तु येशील का..?" मुलगी म्हणुन आई तिला हक्काने बोलावते.

रमा ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी, आई वडिलांना काही झालं की रमा ला धावावं लागायचं.

आता ही तेच झालं, रमाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.

" अगं आई ह्यात विचारतेस काय, तु थांब मि तडक निघते काळजी करू नकोस.. "
रमाने आईला सांगितलं पण तिला सगळ्यात जास्त काळजी वाटतं होती..

ती ही गोष्ट सांगण्यासाठी आशु ला कॉल करते, पण आशु तिचा कॉल कट करतो. म्हणुन ती त्याला साधा मॅसेज टाकुन ठेवते.


क्रमश...

🎭 Series Post

View all