लुडबुड संसारातील - भाग - 1

Stri Kitihi Shikali tari tila Sansar sutat nahi.
"लुडबुड" भाग - १

"आई तुम्ही स्पष्ट बोलत जा उगाच घालून पाडून नको. जे आहे ते मला सांगा माझ्या चूका मी दुरुस्त करेन."

आज स्नेहा थोडी जास्तच रिअ‍ॅक्ट झाली. कारण आजकाल तिच्या सहनशक्तीच्या पलिकडे सगळे झाले होते.

स्नेहा एका software कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. आशिष आणि स्नेहाचा प्रेमविवाह तो ही आंतरजातीय. त्यामुळे अचार विचार संस्कृती यात जमीन अस्मानाचा फरक.

आशिषच्या घरात खुपच धार्मिक वातावरण. देवधर्म कुळधर्म कुलाचार. नेहमीच चालायचे.

स्नेहाला सगळेच नवीन देवधर्म तिच्या ही घरात होता. पण सतत देवदेव करत बसायला कोणालाच वेळ नव्हता. आई थोडेफार करायची तेही सणावाराला.

पण बाबा जास्त देवाला मानायचे नाहीत.आईबाबा दोघेही पेशाने डॉक्टर होते. ते आपल्या रुग्णसेवत देव जास्त शोधायचे.

एकंदरीत दोन्हीही घरातील वातावरणात जमीन अस्मानाचा फरक होता.

त्यात सासुबाईंना स्नेहा पसंतच नव्हती. पण शेवटी आशीषचा ठाम निर्णय. त्यामुळे त्यांना झुकावे लागले.
सासुबाईंना भावाची मुलगीच सुन म्हणून आणायची होती. तसा त्या भावाला शब्द देऊनही बसल्या होत्या.

भावाची मुलगी दहावी बारावी झालेली. घरकामात हूशार. सगळे स्वयंपाक पाणी व्यवस्थित करायची. मुख्य म्हणजे आत्या आली कि, तिच्या पुढे मागेच असायची. मग काय आत्या बाईच्या ऐकण्यात होती म्हणून त्यांना आवडायची नाही आवडलीच होती.पण आशीषने काकूबाई म्हणून तिला चक्क नकार दिला होता.हे दु:ख त्यांच्या मनात सलत होते.

आशीषचे वडील मात्र नेहमीच स्नेहाचे कौतुक करायचे .कारण स्नेहा अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. सगळ्यातच तीची कुशलता होती. सहज आणि सुबकता तिच्या कामात होती. मुख्य म्हणजे जे येत नाही ते शिकून घेण्याची तिची धडपड असायची.

घरातील सगळे करून ती आपले क्षेत्रातही अग्रेसर होती. पण नावडतीचे मीठ आळणी तद्वत. सासुबाईं नेहमीच तिच्यात चुका काढायच्या. कोणावर ना कोणावर घालून. तिला काहीबाही बोलत राह्यच्या. सतत तिचे संस्कार, सोवळेओवळे यावर त्यांची टिका टिपण्णी असायची.

स्नेहाला हे कळायचे शेवटी लेकि,बोले सुने लागेच ना! पण ती शांत असायची कारण घरातील वातावरणाचा आपल्या आॉफीसच्या कामावर परिणाम होणार नाही. यासाठी दक्ष असायची.

पण कधी कधी अती झाले कि, त्याचे पडसाद तिच्या आॉफीसवरील कामावर पडत मग तिकडे बॉसचे टोमणे चालू होत.

स्नेहा घर आणि आॉफीस वेगळे ठेव.लग्न झाले आहे आम्हाला माहीत आहे. कामात चूका नको. स्नेहाला वाईट वाटायचे.


सासरे नेहमीच स्नेहाची समजूत घालायचे. निवळेल वातावरण म्हणायचे.आशीष पण खुप चांगला होता. त्याच्या मध्ये व आई मध्ये खटके उडायला नको म्हणून ती त्याला काही सांगायची नाही.

यामुळे सासुबाईंचे चांगलेच फावायचे. कळत नकळत मी किती चांगली आहे हे दाखवून द्यायचा त्या प्रयत्न करायच्या.

आज तेच झाले. सकाळीच त्यांची भाच्ची आली होती. सासुबाईं सकाळ पासून गरज नसतानाही स्वयंपाकघरात लुडबुड करत होत्या.

एरवी कधीही स्वयंपाकघरात न फिरकणाऱ्या सासुबाईंना आज बरेच पदार्थ करायचे होते.आई तुम्ही स्पष्ट बोलत जा उगाच घालून पाडून नको. जे आहे ते मला सांगा माझ्या चूका मी दुरुस्त करेन.

आज स्नेहा थोडी जास्तच रिअ‍ॅक्ट झाली.कारण आजकाल तिच्या सहनशक्तीच्या पलिकडे झाले होते.असं काय झालं? म्हणून ती ऐवढी जास्त रिअ‍ॅक्ट झाली.

कशी लुडबुड करत होत्या सासुबाईं संसारात आणि स्नेहाच्या आयुष्यात! हे सगळं सगळं पाहूया पुढील भागात
क्रमशः
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all