लुडबुड संसारातील भाग - 3

Shevati Sonawane Kan tochle Ki Borobar tochle Jatat.
"लुडबुड संसारातील भाग - 3

सगळे व्यवस्थित तयार करून ठेऊन, स्नेहा आॉफीसला गेली.
जाताना ती सांगूनही गली.

"समर्थांच्या फोटोला हार व पेढे पण आणून ठेवले आहेत. आज गुरूवार ना येते मी!"

थोडा उशीरच झाला आज आल्या वर छान गप्पा मारू भारतीताई पण वेगळ्या विषयांवर! भारती ताई तुम्हांला रसगुल्ले आवडतात ना ते पण करुन ठेवले आहेत. भारती ताई संध्याकाळी मी लवकरच येईल हं! मग मस्त फिरवून आणते तुम्हाला.तयार रहा!

स्नेहा आॉफीसची तयारी करून सगळे सांगून झटपट छान तयार होऊन ती बाहेर पडली सुध्दा. गॅलरीतून भारती बघत होती. मस्त फोर व्हीलर स्नेहा सफाईदारपणे बाहेर काढत होती.

सासुबाईं आणि त्यांची भाच्ची भारती मात्र विचारात पडल्या.आपण ऐवढे बोललो पण हिनं कुठेही त्रागा केला नाही. शांतपणे सगळे ऐकून घेतले. तितक्यात शांतपणे सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण पण दिले.

यावरून भाच्चीला जरा आत्यातच खोट वाटली. ती आत्याला म्हणाली, "आत्या स्नेहा तशी बरी आहे ग! तिला कुठे नावं ठेवायला जागाच नाही !" पण तु का एवढा तिचा दु:स्वास करतेस?

आत्याला भाच्चीच्या बोलण्याचा राग आला. ती भारतीला म्हणाली, हे तिचे खोटे रूप आहे भारती. कोणी नातेवाईक आले कि, ती बरी वागते. मी किती चांगली आहे. हे दाखवण्याचा तिचा प्रयत्न असतो.

आता हेच बघ तुला रसगुल्ले आवडतात तिनं करून ठेवले. हे मला आधी सांगायला नको का? पण नाही तिनं मुद्दाम तुझ्या समोर सांगितले. कारण सगळ्या गोष्टींचे श्रेय तिला ठापायचे असते.

"असो शेवटी माझेच मेलीच मीठ अळणी. तयार रहा येतील महाराणी संध्याकाळी लवकरच नेतील तुम्हाला फिरायला."

मग काय ती खुश आणि तु तर त्याहून खुश! तीच आता तुला जवळची वाटणार ना! स्नेहाच्या सासूबाईं मनातल्या मनात खजील झाल्या.

हे भारतीच्या नजरेतून सुटले नाही. तिला कळलं आपण स्नेहाला चांगले म्हणालो हे आत्याला मनातून आवडले नाही. पण आपली आत्या पहिली मग स्नेहा यातून आपणच सुवर्णमध्य साधूया!

ती आत्याला म्हणाली, "आत्या तु आता संसारातून विरक्ती घे, चल बर माझ्याबरोबर माहेरपणाला तुझ्या आवडीचं सर्व पदार्थ आई तुला खाऊ घालील."

"अग जग तु बघत नाहीस, फार नशीबवान आहेस एवढी शिकलेली असुनही धार्मिक आणि कर्तृत्वनिष्ठ आहे तुझी सुन!"

आजकाल कोणी ऐकूनच घेत नाही ऐवढे.ती ऐकून घेते. तुझ्या शब्दाचा आदर करते. मुख्य म्हणजे अशिषला वेगळा संसार थाटायला पण लावत नाही. हे फार मोठं भाग्य आहे तुझं!

" खर सांगू आत्या रागावू नकोस तुझी थोडी लुडबुड कमी कर आणि तुझं अधूरी राहिलेले छंद जोपास."

अजुनही तुझ्यात ताकद आहे. कोणावरही अवलंबून नाहीस. वेगळा मार्ग पत्करला तर सगळे कुटुंब गोकूळ होईल बघ!"

मी लहान आहे लहान तोंडी मोठा घास घेते मला माफ कर.

" अजुन एक परत रागावू नकोस. जर मी तुझी सुन झाले असते तर ऐवढी तुझी लुडबुड सहन नसती केली बरका केंव्हाच अशिषला घेऊन वेगळी झाली असते."

भाच्चीबाई चांगल्याच जोमात बोलत होत्या. तर काय बोलतेस म्हणत आत्याबाई पण केंव्हाच कोमात पोंहचल्या होत्या.

इकडे स्नेहा मात्र गाडी चालवताना बॉसला चांगलेच सुनावण्यासाठी बॉससाठी लेक शोधत होती. कारण ती म्हण आहे ना "लेकि बोले सुने लागे ना!..
समाप्त
©️®️सौ.ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all