मल्लूदेवा (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
मल्लूदेवा

रामा शक्य होईल तितके त्या चोराला काहीबाही बोलून तिथून निघतो. पुन्हा महादेवाच्या देवळात आल्यावर त्याची अम्मा चिडलेली असते. ती काठी घेऊन रामाच्या मागे लागलेली असते.

“काय झालं आहे हिला?” रामा शारदाला विचारतो.

अम्मा ज्या खुणा करत असते त्याचा अर्थ शारदा सांगू लागते; “तू जे काही केलं आहेस त्याला बदला म्हणतात. माझ्या संस्कारात बदला घेणे म्हणजे पाप आहे. त्या कोतवालला खोट्या आरोपाखाली अडकवलं आहेस. त्याला फाशी झाल्यावर त्याच्या मृत्यूचे पाप जन्मोंजन्मी आपली पाठ सोडणार नाही. पुढच्या जन्मी आपण प्राणी योनीमध्ये जन्माला येऊ.”

“असं काही नाही होणार. कोतवाल वाचणार.” रामा म्हणाला.

“शपथ घ्या तुम्ही खोटं बोलणार नाही.” शारदा म्हणाली.

“सगळ्यांना माहीत आहे शारदा हा रामा कधीच खोटं बोलत नाही. कोतवाल वाचणार.” रामा म्हणाला.

“कसा?” शारदाने विचारलं.

“स्वतः खरा चोर मल्लूदेवा त्याला वाचवणार.” रामा म्हणाला.

“आणि तुम्ही त्याला शोधून पकडणार कसं?” शारदाने पुन्हा विचारलं.

“त्याची काहीच गरज नाहीये. तो स्वतः इथे येणार. मी त्याचा अहंकार इतका दुखावला आहे की तो नक्कीच येणार शारदा. नक्कीच येणार.” रामा म्हणाला.

असं म्हणून त्याने दोघींकडे पाठ केली आणि महादेवाच्या पिंडीकडे तोंड केले.

“तू इतक्या खात्रीने कसा सांगतोय तो चोर येणार ते? तुला एवढी खात्री आहे?” बंधूने विचारलं.

“खरंतर मी फक्त यांना आश्वस्थ करतोय. मी फक्त प्रार्थना करतोय की मी अंधारात मारलेला बाण निशाण्यावर लागू दे.” रामा म्हणाला.

“आणि जर तुझा बाण निशाण्यावर नाही लागला तर?” बंधूने विचारलं.

“तर काय तुझं आणि माझं दुर्भाग्य.” रामा म्हणाला.

इतक्यात काळे कपडे घातलेले आणि हातात तलवारी असलेले काही लोक तिथे आले. त्यांना बघून रामा खुश झाला पण अम्मा आणि शारदा घाबरल्या. अम्मा आणि शारदा रामाला त्यांच्याशी प्रतिकार करायला सांगत होते पण रामाला तेच हवं होतं. शेवटी ते सगळे रामा सकट सगळ्यांना घेऊन एका ठिकाणी आले. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्यांना एका जंगलात आणले गेले होते. डोळ्यावरची पट्टी काढल्यावर अम्मा खुणा करू लागली.

“काय म्हणतेय?” रामाने विचारलं.

“अम्मा देवाला सांगतायत की मला उचल. या चोरांच्या हातून मरण येण्याआधीच मला घेऊन जा.” शारदा म्हणाली.

“आनी माद काय? मी तल अदून काही बघितलं पन नाही.” गुंडप्पा रडत म्हणाला.

“आणि माझं काय? आपली तर अजून मुलंही नाही झाली.” शारदा म्हणाली आणि तीही रडू लागली.

“आणि मी? मी कशाची शिक्षा भोगतेय? एका मूर्ख पंडितची शेंडी असल्याची शिक्षा?” बंधू म्हणाली.

“काही नाही होणार मी आहे ना.” रामा म्हणाला.

“तू आहेस मनुन तर आमी इते आहोत ना.” गुंडप्पा म्हणाला आणि सगळेच रडायला लागले.

रामाला त्यांना कसं शांत करू हेच कळत नव्हतं.

“चूप…..” रामा ओरडला आणि त्याने सगळ्यांना थोडं बाजूला घेतलं.

“तुम्हाला कळत नाहीये माझी युक्ती कामी आली आहे. त्या चोराचा अहंकार चांगलाच दुखावला आहे म्हणून तर त्याने मला इथे उचलून आणलं आहे. विचार करा ज्या चोराला आपण सगळीकडे शोधत होतो तो स्वतः आपल्या समोर येतोय.” रामा म्हणाला.

इतक्यात “मी सूर्य आहे, जे कोणी हात लावायला जातं त्याचा हात भाजतो.” अशी गर्जना ऐकू आली.

सर्व चोर “मल्लूs देवा मल्लुs देवा” असे ओरडू लागले आणि स्वतः मल्लूदेवा समोर आला.

रामा आणि बाकी सगळे मागे वळले. त्यांच्या मागे असल्येल्या एका मोठ्या दगडावर तो थाटात उभा होता. त्याला पाहून रामा थोडावेळ स्तब्ध झाला.

“गोपण्णा! कोतवालचा सहकारी.” रामा म्हणाला.

“गोपण्णा नाही. मल्लूदेवा.” तो म्हणाला.

“काय मुल्ख बनवलं याने लामा. आपन याला सगल्या नगलात शोदत होतो आनी हा आपल्या सोबतच होता. तू विताल तली केला होतास?” गुंडप्पा म्हणाला.

“नाही गुंडप्पा मी विचारही केला नव्हता.” रामा अजूनही गोंधळलेला होता.

इतक्यात अम्मा काठी ठोकून बोलू लागली. शारदाने ती काय म्हणतेय हे सांगू लागली; “हे सगळं काय सुरू आहे मला कळेल का?”

रामा तिला फक्त हाताने गप्प बस म्हणून खुणवत होता. रामाच्या संपूर्ण कुटुंबाला तिथे आणलेलं पाहून मल्लू देवा चिडलाच होता. त्यात त्याला त्याच्या चोरीचे श्रेय कोतवालला दिले असल्याने जास्तच राग आलेला. त्याचा खरंच अहंकार खूप दुखावला गेला होता. रामाने कसंबसं त्याला आवरलं.

“मी खरंतर हे तुम्हाला भेटण्यासाठीच केलं. मी तुम्हाला माझा आदर्श मानतो.” वैगरे वैगरे गोष्टी करून त्याला तो फसवू पाहत होता.

“यातही तुझी चाल असेल तर?” त्याने विचारलं.

“मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. मला एक अशी जागा माहित आहे जिथे खूप धन दौलत आहे. मी आज तुम्हाला तिथे घेऊन जातो आणि चोरीत मदत करतो. ही चोरी यशस्वी झाली की तुम्ही मला तुमचा शिष्य म्हणून घ्या.” रामा म्हणाला.

तो लगेच तयार झाला. अम्मा चिडली होती. ती रामाच्या मागे काठी घेऊन लागली होती पण त्याने कसंबसं शारदाला तिला सांभाळायला सांगितले. झालं! सगळे रामाने सांगितलं होतं तिथे आले.

“हे तर आचार्य तथाचार्यचे घर आहे.” तो म्हणाला.

“हो गुरूवर! त्यांनी आजपर्यंत लोकांकडून लुबाडलेले भरपूर धन आहे. सगळ्यात जास्त धन आपल्याला इथेच मिळणार.” रामा म्हणाला.

“हम्म. मी हा विचार केलाच नव्हता.” तो म्हणाला.

इथे आचार्यची पत्नी त्याला पाटावर बसवून त्याची पूजा करत होती.

“हे सगळं काय आहे?” त्याने वैतागून विचारलं.

“तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी मी हे व्रत केले आहे. आज संपूर्ण व्रत संपेपर्यंत तुम्हाला इथून हलता येणार नाही.” ती म्हणाली.

“अगं पण व्रत तू करतेस आणि आम्हाला का त्रास देतेस? आधी तरी सांगायचं आता अचानक आम्हाला बोलावणे आले तर आम्ही काय सांगायचं?” तो वैतागून म्हणाला.

“जास्त वेळ नाही स्वामी. संध्याकाळ होईपर्यंत संपेल हे व्रत. तोवर फक्त इथेच बसून रहा.” ती म्हणाली.

तो नाईलाजाने तिथेच बसला होता तर धनी मणी बाहेरच्या वऱ्हांड्यातून जाताना बोलत होते.

“तुला माहितेय मणी मला काल काय स्वप्न पडलं? काल एक भिकारी माझ्याकडे भीक मागत होता.” धनी म्हणाला.

“आणि तुला माहितेय मला काय स्वप्न पडलं? आपल्या गुरूच्या घरात चोरी झाली आहे आणि तो पूर्णपणे रस्त्यावर आला आहे.” मणी म्हणाला.

धनी यावर जोरजोरात हसू लागला. मणीने त्याला त्याचे कारण विचारले.

“स्वप्नात जो भिकारी होता तो आपला म्हातारा गुरु होता.” धनी म्हणाला.

दोघे हसत हसत चालत होते इतक्यात समोरून सगळे चोर आले. ते दोघे इतके घाबरले की त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. कसेबसे त्यांनी तुम्ही कोण म्हणून विचारले.

“मी मल्लूदेवा.” तो म्हणाला.

आधी दोघे घाबरले पण नंतर एकमेकांकडे बघून दोघे जोरात हसू लागले. चोरांनी मिळून धनी मणीला एका दोरीने बांधून ठेवले. त्या दोघांच्या हसण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आचार्यने ऐकला होता पण त्याची पत्नी त्याला जागचे उठू देत नव्हती.

“धनी मणीला काय झालंय? मला काहीतरी वेगळं वाटतंय. ए धनी मणी काय झालंय?” तो आतूनच ओरडून विचारत होता.

“काही नाही प्रभू. त्यांना चार चार वेळा भूक लागते. भूक लागली असेल. तुम्ही इथून हलू नका.” त्याची पत्नी म्हणाली.

बाहेर मात्र सगळे जे काही किमती ऐवज सापडेल ते भरून घेत होते. धनी मुद्दाम बोलू लागला; “यांना कधीच कळणार नाही आपले गुरू इतके हुशार आहेत की भरपूर धन पलंगाच्या गादी खाली ठेवले आहे.”

यावर मणी देखील कुठे काय लपवले आहे हे सांगू लागला. चोरांनी सगळा ऐवज सोबत आणलेल्या पेटीत भरला.

क्रमशः…..

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all