मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 1

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 1

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

आज अजिबात करमत नाहिये. सारख अस वाटतय काही तरी होईल. ही हुरहुर का आहे ते समजत नाही. आशा बाल्कनीत फेर्‍या मारत होती. ती प्रदीपची वाट बघत होती. तो अजून ऑफिस हून आला नव्हता. तिने परत घड्याळ बघितल. बारा वाजले. मीच अस्वस्थ आहे. बाकीच्यांना काही पडलीच नाहिये. ना माझी ना या घराची? सगळ मी करून घेते. ते कश्याला बघतील. सासुबाई तश्या हे ही तसेच.

घरात आशा, प्रदीप त्यांचा मुलगा रक्षित, सासुबाई रमा ताई असे चार लोक होते. आज सहा महिने झाले नणंद रत्ना, तिचा नवरा प्रकाश मुलगी तिघे आशा कडे रहायला होते. ती तर हलायच नाव घेत नव्हती. अगदी कंटाळा आला होता. घरात सगळा आनंदी आनंद होता. रमा ताई रत्नाला काही काम करू द्यायच्या नाहीत त्या ही काही करायच्या नाहीत. प्रदीपच तर घरात लक्ष नव्हतं. आशा एका हाती सगळं हॅन्डल करत होती.

रत्नाच दोन वर्षा पुर्वी लग्न झाल होत . प्रकाशची मधेच नोकरी सुटली. भाऊ भरपूर कमवतो. कसली कमी आहे. रमा ताईंनी दोघांना इकडेच बोलवुन घेतल. आता त्या प्रकाशला नोकरी लागली तरी रत्ना दुसरीकडे रहायला जात नाही. मुलगी लहान आहे नावाखाली इथेच आहे. प्रदीप तर काही म्हणत नाही. काही म्हणायला ते घरी असतात कुठे. त्याच मस्त सुरु आहे.

"कुठे आहेत हे? एवढी रात्र झाले अजून कसे आले नाहीत?" आशाला बाल्कनीतुन बिल्डिंगच गेट दिसत होत. तिच्या मनातले विचार थांबत नव्हते. आजही प्रदीप जेवायला घरी आले नाही. त्यांच्या आवडीची दम आलू केली होती. मी केलेला मेसेज ही बघितला नाही. काय सुरू असत इतक्या उशीरा पर्यंत ते समजत नाही. सारख मीटिंग आहे अस सांगतात.

मी पण नोकरी करते. माझी बरी रात्रीची मीटिंग नसते. आपण परत विचारायच नाही. लगेच चिडतात. ते वरच्या पोस्टवर मी अशीच सामान्य. वर अजून मी काही रिकामा आहे का? कुठे जातो काय करतो सगळा हिशोब तुला देवू का? असे बोलणे ऐका.

पण त्या मागे माझी काळजी आहे हे ते समजून घेत नाही. माझ प्रेम त्यांना कळत नाही. कळणार कस त्यासाठी दोघांच मन एकरूप व्हायला हव ना. कधी समजून घेण नाही की काळजी घेण नाही की दोन शब्द बोलत नाही. बायकोला घरच्यांच्या सेवे साठी आणल आहे जणू.

अस झोपायला उशीर होतो मग सकाळी उठवत नाही. ऑफिस असत. ह्याना सांगितल तर म्हणतात मी तुला कुठे जाग रहायला सांगितल होत का? पण मला हे घरी आल्या शिवाय शांतता लाभत नाही. काय करावं? फोन करून बघू का? नको आल्यावर चिडतील.

अस ही आता हल्ली ते माझ्यावर फक्त चिडलेले असतात. ना प्रेमाने बोलणार ना जवळ घेणार. गप्पा नाही की कुठे फिरायला जाण नाही. फक्त मुलाला मोठ करतो आहे. ते हे मी एकटी. हे कर्तव्य म्हणून घरी पैसे देतात. आता हल्ली आठवड्यातून तीन चार दा घरी येत नाही. आज काय इथे पार्टी तिकडे प्रोग्राम. त्यांच छान सुरु आहे.

माझ काय? मला कश्याला हवी करमणूक. एक मुलगा आहे. सासुबाई आहेत. त्यांच करायच. आता तर नणंद ही इथेच आहे. वय झाल. आता मोह सोडा.

तिन बेडरूम होते एकात सासुबाई होत्या. एक रक्षित साठी. एक त्यांचा बेडरूम होता. आता सासुबाई, रक्षित एकत्र रहात होते. रत्ना प्रकाश एका रूम मध्ये. इतकी चांगली सोय होते ती कशाला माहेर सोडून राहील. मस्त पूर्ण पगार बाजूला टाकत होते. वेळोवेळी भावाकडून पैसे घेते. परत घरकाम नाही काही नाही. प्रकाश आणि ती सदोदित आतच असत. वेळ काळ ही बघत नाही. नातीला आजी सांभाळत बसतात.

ती रक्षितच्या रूम मधे गेली. त्याला नीट पांघरुन दिल. रमा ताईंनी थोड किलकिलत्या नजरेने बघितल. "आला का प्रदीप?"

"नाही आई."

"नवरा कुठे फिरतो ते माहिती नाही. कश्यावर कंट्रोल नाही. नीट वागण नाही की करण नाही. त्यात त्याचा काय दोष तूच प्रेमाने वागत नाही. समजून घेत नाही. नाहीतर कर्ता पुरुष अस बायकोला सोडून बर बाहेर राहील. " त्या बडबड करत झोपल्या.

आशा त्यांच्या कडे बघत बसली. लग्नाला इतके वर्ष झाले एक दिवस ही या बाईने मला आधार दिला नाही की प्रेमाचे दोन शब्द नाही. त्यांचा मुलगा एवढा चुकतो त्याला बोलत नाही. सदोदित उठता बसता मलाच बोलतात. यांना असही वाटत नाही का हिच्या सोबत रोज रहातो. हीच कामाला येणार आहे. थोड तरी चांगल वागव. कुठे फेडतील हे कर्माचे फळ. आपण इथे एवढ झिजा काही उपयोग नाही.

तिच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांना समजल आता की प्रदीप मला अजिबात भाव देत नाही. मला विचारत नाही. काय करू म्हणजे यांचा राग जाईल. हे मला प्रेमाने आपलस करतील.

🎭 Series Post

View all