मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 2

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 2

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

यांच नक्की काय सुरू आहे ते समजत नाही. कोणता नवरा इतके दिवस बायको पासून दूर राहू शकतो. आता जवळ जवळ दोन महिने झाले यांनी मला साधा हात लावला नाही. मला ही वाटत माझ कोणी तरी असाव. कोणी प्रेमाने जवळ घ्याव. हक्क गाजवावा.

बोलून बघू का? तिला लाजल्या सारख झाल. कस म्हणणार. सगळ करुन पाहील. पार्लर मधे जावुन मेक ओव्हर केला. वेगवेगळ्या नायटी घालून बघितल्या . त्यांच्याशी प्रेमाने नेहमीच वागते. त्यांना महत्व देते. वस्तू हातातल्या हातात मिळतात. त्यांनी हाक मारल्यावर मी एका मिनिटात त्यांच्या समोर हजर असते. अजून काय करू? जावू दे. त्यांना मीच आवडत नसेल. आजकाल तिच्या मनाने बंड केला होता. बर्‍याच वेळा ती तळमळत रहायची. कोणाला सांगता येत नव्हतं.

ती तिच्या रूम मधे येवून झोपली. सकाळी साडे पाचला उठाव लागत.

रात्री केव्हा तरी प्रदीप आला. सकाळी बाजूला झोपलेला दिसला. तिने त्याच्या कडे प्रेमाने बघितल. पांघरुन नीट केल.

तिचा दिवस नेहमी प्रमाणे गडबडीत सुरू झाला. रक्षित चौथीत होता त्याच्यासाठी डबा बनवला. त्याला तयार केल. तो खूपच समजूतदार होता. खाली गेट जवळ बस यायची. आशा खालपर्यंत जायची . आल्यावर तीच आवरायची. सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवायची. तो पर्यंत रमाताई उठायच्या. ते सगळे बरोबर नाश्ता करायचे. मग आशा ऑफिसला जायची.

आधी तर सकाळीच सगळ्यांचा स्वयंपाक करावा लागायचा.

एकदा आशाने चांगला विरोध केला. रक्षितची गडबड. त्यांचे डबे त्यात या लोकांचा ही स्वयंपाक. बर नणंद काही लहान आहे का? वेगळी रहात असती तर केलच असत ना सगळं. तेव्हा ते तरी काम कमी झाल. नाही तर सकाळी पंधरा वीस पोळ्या. कुकर लावा. भाजी, कोशिंबीर सगळं होत. आता दुपारी काहीही करा. आशा बघत नव्हती.

म्हणजे मी ऑफिसला ही जायच. या घरी राहणार्‍या नणंदेच सगळं करायच. का? त्या चार पोळ्या ही करू शकत नाही. सारख आपल बाळ लहान आहे. माझा रक्षित एवढा होता तेव्हा मी किती काम करत होते. या सासुबाई मला काम देत होत्या. काम केल्याने व्यायाम होतो अस म्हणायच्या. आता त्यांच्या लेकीचा व्यायाम नको का व्हायला. ती फक्त घरकाम सोडून सगळीकडे एक्टीव्ह असते.

रक्षित दोन वाजता घरी यायचा. चार वाजता शेजारी ट्यूशन लावलेली होती. सहा वाजेपर्यंत आशा यायची. मग संध्याकाळचा स्वयंपाक रक्षित सोबत वेळ घालवायची. प्रदीप या पासून अलिप्त होता. एक ही दिवस तो मुलासाठी वेळ काढायचा नाही. त्याला इंट्रेस्ट नव्हता.

आशा नेहमी प्रमाणे बस स्टॉप वर गेली. रक्षित खूप बोलत होता. दोघ मजेत होते. "आई तू रोज माझा मॅथ्सचा अभ्यास घेते त्यामुळे मला क्लास मधे सगळ येत."

"हुशार ग माझ बाळ ते. टाइम टेबल प्रमाणे तू ही अभ्यास करतो. नाही म्हणत नाही." आशा म्हणाली.

"आई मला आज तो हिंदीचा लेसन समजवून सांग."

हो.

वरच्या मजला वरचा आशुतोष रक्षितच्या वर्गात होता. तो त्याचे बाबा बस स्टॉप वर आले. ते सगळे परीक्षे संदर्भात बोलत होते. आशा त्यांना शेड्यूल सांगत होती.

" रक्षित आता आपल्याला अभ्यास वाढवावा लागेल." दोघ प्लॅन करत होते. आशाने रक्षितला अतिशय चांगल वळण लावल होत. अतिशय हुशार चांगला मुलगा होता.

प्रदीप उठला. बाल्कनीतून बस स्टॉप दिसत होता. त्याने बघितल आशा हसुन बोलत होती . कोणासोबत बोलते आहे? त्याने वाकून बघितल. आशुतोषचे बाबा दिसले. ओह हे अस आहे का? त्याच डोक फिरल. तो आत येवून बसला.

बस आली. मुल गेले. आशा आणि आशुतोषचे बाबा बोलत बोलत आत आले. तिचा हसरा चेहरा बघून प्रदीप चिडला.

"अरे तुम्ही उठले का? चला चहा देते. काल का उशीर झाला? मी तुमची वाट बघत होते." आशा म्हणाली.

" तुला वेळ आहे का आमच्या साठी?" प्रदीप तिरसट पणे म्हणाले.

"हो काय झालं? मी साडे आठला जाणार आहे." आशाला तो काय म्हणतो ते समजल नाही.

"नाही म्हटलं सोसायटीत तुझ्यासाठी बरेच करमणुकीचे साधन आहेत. तू खुश दिसते आहेस. " प्रदीप अजूनही तिरकस बोलत होता.

" म्हणजे? "

" काय सुरू होत ते? एवढ दुसर्‍याशी बोलायची काय गरज होती?" प्रदीपने विचारल.

"ते ? अहो तो आशुतोष आपल्या रक्षितच्या वर्गात आहे. त्याचे बाबा परीक्षे संदर्भात बोलत होते." आशा सांगत होती.

"का? तू त्याची टीचर आहे का? की शाळेची मेंबर? त्यांना काही प्रश्न असतिल तर शाळेत फोन करायचा. नाही तर टीचरला भेटून यायच."

" तुम्ही माझ्या वर संशय घेत आहात का? सहज म्हणून मी कोणाशीच बोलू शकत नाही का? तुमच्या सारख नाही ना तीन चार दिवस घरी येत नाही. काय हे बोलणं? " आशा म्हणाली.

रत्ना, रमाताई आतून ऐकत होत्या. " बघितल का नवर्‍याला कशी उलट उत्तर देते. ही अशीच आहे. म्हणून तो तिला विचारत नाही. नेहमीच ते दोघ भांडत असतात. आशुतोष कालही आपल्या कडे आला होता. त्याचे बाबा ही. हे दोघ बर्‍याच वेळ बोलत होते. " रमा ताई म्हणाल्या. तेच नेमक प्रदीपने ऐकल.

" आई तुम्ही काय बोलताय. उगीच गैरसमज पसरवू नका. "आशा म्हणाली.

" पर्वा ही तुम्ही बोलत होते ना? काल ही. " रमा ताई म्हणाल्या.

" हो ते आपल्या रक्षितची वही घ्यायला आले होते. पण आम्ही थोड बोललो तर काय फरक पडतो. एवढ काय? आपल मन स्वच्छ हव. " ती अस बोलत होती. तिच्या गालावर पाच बोट उमटली. जोरात आवाज आला.

"आई ग.. काय करता आहात? तुम्ही माझ्यावर हात उचलला? " आशाच्या डोळ्यात पाणी आल.

" लाज वाटत नाही का म्हणे बोललो तर काय झालं? राजरोस पणे फिर अजून त्याच्या सोबत. मला काय. " प्रदीप बडबड करत होता.

रत्ना, रमा ताई ही चिडल्या होत्या. "काय हे वागण सोन्या सारखा कर्तुत्ववान नवरा आहे. त्याला जपत नाही. आम्हाला ही असच करते. ना काही करण ना नीट बोलण."

" मी पण तिला नजरेत खुपते. " रत्ना म्हणाली.

" रत्ना तू रहा इथे बघू कोण काय म्हणत. हे घर माझ्या नावावर आहे. " प्रदीप म्हणाला.

🎭 Series Post

View all