मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 5

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 5

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

आशाने आईला फोन लावला. आता ती रडत होती. तिने सकाळपासून काय झालं ते सांगितलं. "आई मी आणि रक्षित आम्ही तुझ्याकडे येवू का? मला आता त्या घरात रहायचं नाही. आई लग्न झाल्या पासुन एकही दिवस चांगला गेला नाही. आई मला कोणाचा आधार नाही .कसं सहन करू तू सांग."

" तुला आधार नाही असं का म्हणतेस ? आम्ही आई बाबा आहोत ना. रडू नकोस बेटा. सांभाळ. " प्रभा ताई ही हळव्या झाल्या होत्या.

"अगं तुम्हीच रिटायर. कसे राहत असाल तुम्हालाच माहिती. त्यात मी तिथे. "

बाबानी फोन घेतला." आशा काय झाल? "

ती सांगत होती.

" काही हरकत नाही. तु इकडे ये. जे असेल ते मिळून खावु. दोन मिनिट ही विचार करू नकोस. मी येवू का तुला घ्यायला. " शरद राव काळजीत होते.

" नाही बाबा मी येईन. संध्याकाळी येते आत्ता ऑफिस मधे आहे. रक्षितच्या शाळेचं काय करूया? तो मोठ्या इंग्लिश मीडियम शाळेत आहे. त्याची फी दोन लाखाच्या घरात आहे .मी ती भरू शकते का? परत बसचे पैसे असतिल."

" आता तुला किती पगार आहे?"

"पन्नास हजार."

"मग तू तुझा पगार बाजूला टाक. त्याच्या शाळेची व्यवस्था करून ठेव. बाकी घरखर्च मी करेन. एवढा त्रास आहे तर त्या लोकांमध्ये राहण्यात काही अर्थ नाही आणि दुसऱ्या मुलीबरोबर फिरतात म्हणजे तर ही भयानकच गोष्ट आहे. " शरद राव म्हणाले.

" हो बाबा. मला सांगायला लाज वाटते आहे. "

" त्यांना फिरतांना नाही लाज वाटत तू का त्रास करून घेते. बेटा ये लवकर. आम्ही वाट बघतो आहोत. "

हो.

" अंजली मी निर्णय घेतला. मी घरी जाते. मी वेगळ होणार. मला काहीही लागल तर मदत करणार ना?" आशा म्हणाली.

"अर्धा रात्री सांग."

"मला फक्त रक्षितच्या शाळेसाठी पुढच्या वर्षी पैसे लागतील. अजून नाही अजून चार महिन्याने. मी लगेच परत करेन. प्रॉमीस."

"काय बोलतेस आशा. कधी ही सांग मी आहे. आणि हिम्मत बांध. मी तुझ्या सोबत येवू का? " अंजली म्हणाली.

"नाही हा माझा लढा आहे मला लढावा लागेल."

ती निघाली. रिक्षा मध्ये ही तिचे डोळे भरून येत होते. यांनी का अस केल? मी इतकी ही वाईट नाही. यांच्या आधी दहा पंधरा मुलांनी तरी मला प्रपोज केल होत. दोन स्थळांनी होकार दिला होता. तरी मला हेच का पसंत पडले. स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेतला.

तरी त्यांना माझी गरज नाही. आता का समजलं. हे मला अजिबात हात लावत नाही. त्यांच्या गरजा बाहेरच पूर्ण होतात. शी कसे वागतात. तोंड वर करून मला मारतात. तिला खूप राग आला होता .

सासूबाई पण जास्त करतात. रहा म्हणा तुमच्या मुलासोबत. ती फॅशनेबल मुलगी त्यांना किती सांभाळेल तेच बघायचं आहे. ती नक्की यांचे हाल करेल. असच व्हायला हव.

ती लवकर घरी आली. रक्षित ट्युशनला जायची तयारी करत होता. "आपल्याला आजीकडे जायच आहे रक्षित थांब. तू तुझे सगळे बुक्स, कपडे घे. दोन माणस मदतीला आली होती.

" या काकांकडे तुझ सगळं सामान दे. "

" आई गालाला काय झाल? बाबांनी मारल का?" तो एकदम येवून भेटला.

" हो बेटा. "

" आई आपले बाबा वाईट आहेत. "

" आपण इथे परत येणार नाही बेटा. आटोप." आशा म्हणाली.

"चालेल आई तु म्हणशील ते करू. पण तू रडू नको ना." त्याने तिचे डोळे पुसून दिले.

तिने तिचे, रक्षितचे महत्वाचे डॉक्युमेंट्स. तिचे दागिने. दोघांचे कपडे रक्षितचे पुस्तक घेतले. काही मागे राहू दिल नाही.

" कुठे चालली ग? थांब जावू नकोस . " रमा ताई विचारात होत्या. रत्ना ही बघत होती ती काय काय घेते आहे . " आई जावू दे ना तिला. " ती म्हणाली.

आशाने उत्तर दिले नाही.

"आज तुला प्रदीपने मारल म्हणून जाते आहे ना? अग असा राग डोक्यात घालून कस होईल? नवरा आहे तो. थोड मारल तर काय झाल? चुकी तुझी होती. कश्याला पर पुरुषांशी बोलायच." रमा ताई म्हणाल्या.

"आई तुम्हाला काही माहिती नाही गप्प बसा. या पुढे स्वतःला सांभाळा. गोळ्या वेळेवर घ्या आता तुमच्या कडे बघायला मी नाही. " आशा म्हणाली.

"नाहीतर अशी मोठी काम करत होती." रत्नाने तोंड वाकड केल. "आई कश्याला तिच्याशी बोलायला जाते. "

"अग ती गेली तर इथे करेल कोण." रमा ताई म्हणाल्या.

"आपण स्वयंपाकाला बाई लावू." रत्ना खुश होती. पूर्ण घर हातात येणार होत.

आशा निघाली. रक्षित तिच्या सोबत होता. तो खूप प्रश्न विचारत होता." आई स्कूल मधे कस जावू?"

"त्या बाजूने येणार्‍या बसने जात जा. मी चौकशी करते. "

" आई ट्यूशन? "

" शोधू तिकडे नाहीतर मी अभ्यास घेईन काळजी करायची नाही. बेटा आपल्या या घरा सारख आयुष्य नसेल. पण मी जमेल तेवढ करेल." आशाने त्याला जवळ घेतल.

"आई मला काही नको. तू रडू नकोस."

आशा बाहेर बघत होती. संपल सगळं. काय करणार आहे मी एकटी ते समजत नाही. पण हे चुकीच वागतात. इतका धोका दिला. यांच्या सोबत रहाण्यात प्रगती नाही. सासुबाई निराळ्या वागतात. रत्ना ही इथेच येवून बसली आहे .

प्रदीपचे संबध एका सुंदर मुलीशी आहेत. त्या मुलीकडे बघता प्रदीप काही तिला सोडणार नाही अस वाटत . मीच वेगळी झालेली बरी. आम्ही कोणाशी बोलायच नाही त्यांनी खुशाल फिरायच. मला आता सुटका हवी आहे मी डिवोर्स घेणार आहे.

ती आईकडे आली. खूप रडत होती. रक्षित घाबरून गेला होता. तो ही रडत होता.

"आशा अग शांत हो." प्रभा ताई तिला समजावत होत्या.

बाजूच्या मावशी आणि मंगेश आले.

"आशा काय झाल? बाहेर पर्यंत आवाज येतो आहे. तुम्ही तरी काहीतरी बोला ताई?"

प्रभा ताई सगळं सांगत होत्या.

"आम्ही आहोत तुझ्या साठी. आशा शांत हो. " मावशी म्हणाल्या.

मंगेश रक्षितला त्यांच्या घरी घेवून गेला. त्याची मुलगी पिंकी रक्षितच्या वयाची होती.

शरद राव, मंगेश, मावशी, आशा पोलीस स्टेशन मध्ये गेले. प्रदीप विरूध्द तक्रार केली. पोलिसांनी त्याला फोन केला. "कोण आशा ती काय करते तिकडे? आलोच. "

प्रदीप पोलीस स्टेशन वर आला. तिच्या कडे रागाने बघितल.

" पोलीस केस झाली आहे. तुम्ही आशा मॅडमला शाररिक मानसिक त्रास देतात. त्यांच्या गालाला किती लागल आहे . एवढच नाही तुमचे बाहेर संबध आहेत." इंस्पेक्टर म्हणाले.

प्रदीप बघत होता हिला कस समजल? " मी अस काही केल नाही. " तो उगीच म्हणाला.

" आमच्या कडे पुरावे आहेत." इंस्पेक्टर दाखवत होते.

🎭 Series Post

View all