मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 6

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 6

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

" मला आशा सोबत बोलायच आहे." प्रदीप म्हणाला.

ते दोघ बाजूला गेले.

" आशा तुला काय हव? "

" डिवोर्स हवा. " आशा म्हणाली.

" तू कुठे रहाणार? " त्याने विचारल.

" आईकडे. "

" खाणार काय? रक्षित कुठे आहे? तो ही तुझ्या सोबत आहे का?"

हो .

"त्याच्या शाळेचा खर्च परवडेल का तुला? खूप तोरा आहे. दोन दिवस विचार कर. नसेल जमत तर ये परत." तो गर्वाने म्हणाला.

" एक विचारू का? तुम्ही का अस केल. मला धोका दिला. कधी पासून तुमच प्रकरण सुरू आहे? " आशा विचारात होती.

" तू यात पडू नकोस. "

"का पडू नको? मी अजूनही तुमची बायको आहे. मला समजल पाहिजे. तुम्ही का अस केल? स्वतः राजरोस पणे फिरतात. मला सकाळी का मारल? " आशाने विचारल ते बरोबर होत.

तो काही म्हणाला नाही. दुसरीकडे बघून घेतल.

" तुम्ही करताय ते योग्य आहे का? घरी बायको आहे, मुलगा आहे त्यांचा तरी विचार करा. मी तुम्हाला काय दिल नाही ते सांगा. तुम्ही म्हणाल ते होत होतं. उलट बोलण नाही की प्रति प्रश्न नाही. तुमची म्हणाल ते ऐकत होती. सांगा ना पाच पॉईंट्स तरी द्या. " आशा विचारात होती.

प्रदीपने उत्तर दिल नाही.

" ही केस परत घे. मी रक्षित, तुला काही कमी पडू देणार नाही. "

" मला काही नको. मी केस मागे घेणार नाही. " आशा म्हणाली.

प्रदीप इंस्पेक्टर सोबत बोलत होता. ही केस मिटावा. त्याने एक फोन केला. त्याला सोडायला सांगितल.

" हे चुकीच आहे इंस्पेक्टर. " मंगेश, आशा म्हणाले.

"तुम्हाला वाटत तर ही केस सुरू राहील. काळजी करू नका मॅडम. त्यांना कायमच सोडत नाही. आज पुरत सोडल. " इंस्पेक्टर म्हणाले.

ते बाहेर आले. प्रदीप मागे आले. "आशा एक मिनिट. ही केस मागे घे."

"जमणार नाही."

"तुला काय हव ते सांग. सगळं करू." प्रदीप म्हणाला.

" मला हव ते मिळेल? माझ घर, माझा संसार, तुम्ही, थोडी मनःशांती? सगळं माझ्या हातातून गेल. काहीच बाकी नाही. " तिच्या डोळ्यात पाणी होत. ती बाजूला जावून उभी राहिली. शरद राव तिच्या सोबत होते. मंगेश, मावशी, प्रदीप बोलत होते.

"रक्षितच्या शिक्षणाचा खर्च उचला. आशाच्या अकाऊंट दहा लाख रुपये टाका. त्याच्या व्याजावर ती करेल बरोबर. तुमचे दोन तीन फ्लॅट आहेत एक आशाला द्या." मावशी म्हणाल्या.

"मावशी मला काही नको. " आशा म्हणाली.

"आशा तु गप्प बस. गडगंज आहे. तू इतके वर्ष उगीच खस्ता खाल्ल्या का?" मावशी ओरडल्या.

" सगळं मान्य. पण आशाने या पुढे मला त्रास द्यायचा नाही. मी लगेच डिवोर्स देईल. " प्रदीप म्हणाला.

" मी त्रास देते? सिरीयसली. मावशी तू काय बोलते आहेस यांच्याशी. चल इथून मला ही केस लढायची आहे. " आशा चिडली.

" अग तो माणूस पाच मिनिटात पोलीस स्टेशन मधून सुटला. तो किती स्ट्राँग आहे. ही केस ही तो जिंकेल. पैसे, घर, रक्षितच शिक्षण पदरात पाडून घे." मावशी समजावत होत्या.

" मी धडधाकट आहे ना. करेन ना बरोबर. इतक लाचार का व्हा?" आशाने विचारल.

" नीट विचार कर जरा आशा ताई. शांत हो त्याला का सोडा." मंगेश ही म्हणाला.

" बरोबर आहे म्हणजे तू इतके वर्ष केल तो आरामात राहील. मी म्हणते ते घे. " मावशी म्हणाल्या.

" अस का असत जो चुकीचा असतो त्यालाच सगळे सपोर्ट करतात. मी काहीच केल नाही तरी त्रासात आहे. "आशा आता अगदी रडवेली झाली होती. तिला हे सहन होत नव्हत.

" असच आहे बेटा. झाल ते झाल. यातून काय आपल्याला मिळवता येईल ते बघ. आई बाबा एकटे आहेत. पेंशन वर जगतात. हे पैसे मिळाले तर तुलाच आधार होईल. " मावशी प्रॅक्टीकल होत्या.

आता आशा गप्प बसली.

" लिहून द्या. कधी पर्यंत मिळेल हे घर पैसे वगैरे. " मावशी प्रदीपला म्हणाल्या.

" तुम्ही केस मागे घेतली की मी प्रोसेस सुरू करतो. "प्रदीप आशा कडे बघत म्हणाला.

" ठीक आहे मी करतो. " मंगेश म्हणाला. ते निघाले.
......

रमा ताई प्रदीपला संध्याकाळ पासून फोन करत होत्या. त्याने फोन घेतला नाही. नेहमी प्रमाणे तो रात्री उशिरा घरी आला. रमा ताई पुढे बसलेल्या होत्या. " आशा घर सोडून गेली."

" माहिती आहे मला तेच हव होत. पोलीस स्टेशन मध्ये भेटलो तिला . माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली होती. " प्रदीप सांगत होता.

" बाई ग तिची ही हिम्मत. मग काय झालं? " रमा ताई म्हणाल्या.

" काय होणार आहे. पैसे फेकले. झाली नीट. हेच हव असत अश्या बायकांना."

" आता?"

" काही नाही तिच्या वाचून काय अडल आहे?" प्रदीप गुर्मीत होता.

जेवण झाल. प्रदीप अवंतिकाशी त्याच्या गर्लफ्रेंड शी बोलत होता . "सरप्राईज."

" काय सांग ना प्रदीप. " ती लाडाने म्हणाली.

" आपल्या मार्गातला काटा आपोआप दूर झाला डार्लिंग ."

"म्हणजे?"

"आशा तीच सामान घेवून कायमची माहेरी गेली." प्रदीपने आनंदाने सांगितल.

"अरे वाह. तिला डिवोर्स देवून टाक. "

" तू म्हणतेस ते करतो. पण माझ्याशी लगेच लग्न करणार ना. मला आता रहावत नाही. "

अवंतिका लाजली होती.

प्रदीप गोड गप्पा मारत होता. त्याला अजिबात लाज राहिली नव्हती.

तिची मम्मी ही हा फोन ऐकत होती." हे खूप छान झाल अवु. याची किती प्रॉपर्टी आहे. "

" माहिती नाही पण पगार तर खूप आहे. प्लांट हेड आहे. मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. त्याच्या एका शब्दावर लगेच काम होत." अवंतिका माहिती देत होती.

" छान. लगेच लग्न झाल तर बर होईल कोर्ट मॅरेज करायच. तू त्याची लीगल वाईफ हवी." तिची मम्मी म्हणाली.

"हो आधी डिवोर्स होवू दे. विचार केला त्या पेक्षा फारच लवकर हा प्रदीप हातात आला. आता हा आहे मी आहे." अवंतिका खुश होती.
......

आशा, शरद राव घरी आले. प्रभा ताई, रक्षित वाट बघत होते.

"आई काय झाल बाबा भेटले का?" रक्षित विचारात होता.

"हो."

" काय म्हणाले? "

तिने मानेने नाही सांगितल. प्रभा ताई रडत होत्या. "काय पोरीची फरफट आहे. चांगला मुलगा बघून लग्न करून दिल. तर तो असा निघाला."

आशा हातपाय धुवायला बाथरूम मधे गेली. तिथे नळाच्या आवाजात रडून घेतल तोंड पुसल. रक्षित जवळ येवून बसली.

"आई आता काय होईल? "

" काही नाही बेटा. आई आणि रक्षित मजेत राहणार."

"आई तू दुःखी आहे ना?"

"नाही बाळा. आपण उद्या पासून अभ्यास सुरू करू ह. आजच्या दिवस तू तुझ कर."

" बाजूची पिंकी येवून बसली."

"ही मंगेशची पोरगी आहे." प्रभा ताई म्हणाल्या.

छोटी चुणचुणीत मुलगी होती. त्या वहीनी ही मागे आल्या. त्या बर्‍याच वेळ बोलत होत्या. आशा रडत होती. पिंकीने तिचे डोळे पुसले. तुमची मुलगी किती गोड आहे वहिनी.
साधे लोक पण खूपच आपुलकी होती.

दुसर्‍या दिवशी रक्षित व्यवस्थित शाळेत गेला. आशा ऑफिस मधे आली. ती अंजलीला सगळं सांगत होती.

" बरोबर होईल बघ. मावशींनी बरोबर केल. बर झाल पैसे घर घेतल." अंजली म्हणाली.

" मला अस आवडत नाही." आशाला कसतरी वाटत होत.

" त्या प्रदीपला का सोडा."

" आज मी रीलॅक्स आहे. टेंशन फ्री."

दोघांच रूटीन छान सेट झाल. आई बाबा आशाला जपत होते. आशाची बहीण मधून येवून जावून होती. सगळ्यांना प्रदीप बद्दल समजल होत.

🎭 Series Post

View all