मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 7

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 7

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

प्रदीपच वागण अजूनही तसच होत. घरात जास्त बोलत नव्हता. दोन तीन दिवसांनी घरी येत होता. अवंतिका सोबत रहात होता. आज तो घरी होता रमा ताईऔशी बोलत बसला होता.

" रत्ना चहा नाश्ता झाला का? "त्याने पेपर वाचत आवाज दिला.

" नाही दादा."

" तू करते काय दिवस भर? नुसती बसलेली असते." तो चिडला.

"माझ बाळ लहान आहे. आणि या आवाजात माझ्याशी बोलायच नाही दादा आधीच सांगून ठेवते. मी काही इथली नोकर नाही." रत्ना चिडली.

"भांडु नका मी चहा करते." रमा ताई उठल्या.

"काही वाटू दे म्हातारी आई काम करते." प्रदीप म्हणाला.

"हो का. मग तू कर ना आणि त्या आधी वागणं नीट ठेव. तुझी बायको तुला उगीच सोडून नाही गेली. "रत्ना म्हणाली.

" हा विषय तू आत्ता का घेतला? आशाच नाव या पुढे या घरात घ्यायच नाही. मी काय करायच ते तू मला सांगू नकोस. " प्रदीप रागाने निघून गेला.

" आई दादा अस काय वागतो ग. माझ्या वर काय चिडतो. आणि हा दुसर लग्न करतो आहे का?" रत्ना विचारात होती.

" मी पण ऐकल आहे." रमा ताई म्हणाल्या.

" बर होईल या घरचे काम करून मला कंटाळा आला आहे. कोण आहे ती मुलगी? " तिने विचारल.

" त्याच्या ऑफिस मधली आहे."

प्रदीपने आशाला नोटिस पाठवली. डिवोर्स केस सुरू झाली. अगदी सुरुवाती पासून प्रदीप तिला कस मारझोड करत होता. घरात लक्ष नाही. मुलाकडे बघण नाही. आता तर हे नवीन प्रकरण. ती सगळ सांगत होती. पुढची तारीख मिळाली.

प्रदीप ऑफिस मधे आला. अवंतिका त्याला येवून भेटली. " डिवोर्स केस कुठे पर्यंत आली? आपल लग्न कधी होईल?"

" मलाही आता या केसचा कंटाळा आला आहे. मला तुझ्या सोबत रहायचा आहे अवु. " प्रदीप म्हणाला.

" त्या बाईला काय हव ते देवून टाक ना आपला वेळ वाया जातो आहे. " तिने इतक्या प्रेमाने सांगितल्यावर प्रदीप विरघळला. "कोणाला तरी खूप घाई झाली आहे. "

अवंतिका लाजली.

त्याने वकिलाला फोन लावला." काहीही करा मला पंधरा दिवसात डिवोर्स हवा आहे. "

प्रदीपने रक्षितच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. आशाच्या अकाऊंट वर पैसे आले. घर मिळाल. लवकरच दोघांचा डिवोर्स झाला. रक्षितची कस्टडी आशाला मिळाली. प्रदीपने त्यासाठी प्रयत्न ही केला नाही. पैसे घर दिल या बद्दल प्रदीपने अवंतिकाला काही सांगितल नाही.

आशाने ते घर भाडय़ाने देवून टाकल. बाजूच्या मावशी मंगेश मदतीला होते.

प्रदीप, अवंतिकाच लग्न झाल. त्याने घरी सांगितल नाही. रमा ताई, रत्ना, प्रकाश लग्नाला नव्हते. लगेच फाइव्ह स्टार हॉटेल मधे पार्टी होती. सगळे अवंतिका कडे बघून प्रदीपचा हेवा करत होते. काय बायको मिळाली आहे.

प्रदीप खूप खुश होता. तो अवंतिकाला जवळ घेवून डान्स करत होता.

ती ही खूपच खुश होती. आता सगळं माझ्याच हातात आहे. मी हळू हळू सगळं माझ्या नावावर करून घेईल. केवढा मोठा फ्लॅट. गाडी. पेमेंट ही खूप. मजा आहे. अवंतिका विचार करत होती. मम्मी दीदीला लवकर तिकडे घेवून येईन.

दोघ रात्री घरी आले.

"प्रदीप मला उचलून घे." अवंतिका लाडात आली होती.

"नाही अवंतिका आपल्याला अस करता येणार नाही." प्रदीप म्हणाला.

का ?

"घरात आई आहे .बहीण आहे. "

"कोणाची?"

"माझी. "

"त्या काय करताय इकडे?" अवंतिका चिडली.

"त्या इथेच रहातात ."

"म्हणजे ?आपण दोघेच रहाणार नाही?" तिचा चेहरा खाडकन उतरला.

" एवढा थ्री बेडरूम फ्लॅट आहे. आपल्याला पूर्ण प्रायव्हसी मिळेल. आता मूड घालवू नको ना." तो तिच्या जवळ जात म्हणाला.

अवंतिकाने त्याला दूर लोटल. ती नाराज होती. स्पष्ट दिसत होत. रात्री ही तिने त्याला जवळ येवू दिल नाही.

सकाळी प्रदीप आवरून बसला होती. अवंतिका रेडी होती.

" अवु तू थोडे दिवस ऑफिसला सुट्टी घे. घरी आई, रत्नाशी ओळख कर. आरामात रहा. " प्रदीप म्हणाला.

"नो वे. नॉट इंट्रेस्टेड. मी माझ रूटीन प्रमाणे करेन." अवंतिकाच तोंड वाकड होत.

"चल आता बाहेर तुझी ओळख करून देतो."

दोघ बाहेर आले. एवढी सुंदर मुलगी बघून रमा ताई, रत्ना शॉक झाल्या.

"आई, रत्ना ही अवंतिका. "

तिने तुच्छतेने त्या दोघींकडे बघितल. अगदी कळकट दिसता या.

"अवंतिका चहा कर. आम्ही केव्हाच उठलो. ही काही वेळ आहे बाहेर यायची. " रमा ताई म्हणाल्या. त्यांना वाटल पहिल्या दिवशी सुनेवर वचक निर्माण करू. ती घाबरून जाईल.

" मला काहीही येत नाही. आणि मला अस काम सांगायच नाही. ज्याला जे हव ते त्याने स्वतः करुन घ्या. मला काही प्रॉब्लेम नाही. " अवंतिका ठसक्यात म्हणाली.

रमा ताई तिला उत्तर देत होत्या. प्रदीप मधे पडला. "रत्ना तू चहा कर. सगळ्यांना दे."

"रत्ना रागारागाने किचन मधे गेली. चहा करून घेवून आली."

" फक्त चहा? ब्रेकफास्ट नाही." अवंतिका म्हणाली.

" उद्या पासून तूच लवकर उठून कर. "रत्ना म्हणाली.

" त्यासाठी मी इतकी शिकली का? मला जमणार नाही. कूक लावून घ्या." अवंतिका म्हणाली.

"ठीक आहे बघू आपण काहीतरी. आम्ही येतो." ते दोघ निघाले.

" बाई बाई काय मुलगी आहे. मॉडर्न अगदी. उलट उत्तर देते. माझ्या पाया ही पडली नाही." रमा ताई चिडल्या होत्या.

" तू काय पायाच घेवून बसली इथे मला चहा करायला लागला त्याच काय? मी उद्यापासून काहीही करणार नाही मी आधीच सांगते. " रत्ना रागाने आत निघून गेली.

अवंतिका प्रदीप चार दिवस फिरून आले. रोज प्रेमाणे सकाळी उशिरा उठून अवंतिका काहीही न करता ऑफिसला निघून गेली. ती या दोघींशी बोलली ही नाही.

रात्री दोघ बाहेरून जेवून आले. ते आत जात होते.

" प्रदीप इकडे ये. " रमा ताई आवाज देत होत्या. अवंतिका आत निघून गेली. प्रदीप रमा ताईं जवळ येवून बसला.

" ही काही यायची वेळ आहे का? स्वयंपाक पाणी नाही काही काम नाही. घरच्या सुनेचे काही कर्तव्य आहेत की नाही? घरात रत्ना आहे जावई बापू आहेत." रमा ताई चिडल्या.

"आई ती नवीन आहे समजून घे लहान आहे." प्रदीप म्हणाला.

"चांगली तीसची दिसते आहे. तिच्या प्रेक्षा रत्ना लहान आहे. उद्या पासून नीट घर काम व्हायला हव."

"हो मी सांगतो."

दुसर्‍या दिवशी अवंतिका फोन वर बोलत होती." हो तीच बिल्डिंग. "

कुक आला. त्याने भराभर नाश्ता, चहा, जेवण बनवल.

सगळे खुश होते. एका आठवड्याने त्यांना कंटाळा आला. भाज्या तेलकट असतात. एसिडीटी होते. खूप अन्न वाया जात. तो बाहेरचा माणूस येणार सांगितल ते करून जाणार. काय शिल्लक आहे किती करायच ते थोडी तो बघणार आहे. उरलेल्या अन्नाच तुम्ही काहीही करा अस होत.

अवंतिकाला आज ऑफ होता. ती रूम मधे लोळून पुस्तक वाचत होती. रमा ताई, रत्ना आत गेल्या. अवंतिका उठून बसली.

"तुला काहीच येत नाही का ग? जरा किचन मधे बघ. घराचा काय अवतार झाला आहे. जाळ जळमट काढ. झाडून पुसून घे. बाल्कनी किती घाण झाली ती बघ. धुवून घे. उठ आटोप जरा." रमा ताई ओरडल्या.

मी? तिने विचारल.

हो.

"मला जमणार नाही. मला काम सांगायच नाही. तुम्हाला वाटल तर तुम्ही करून घ्या. या पुढे या रूम मधे यायच नाही. आउट. चला बाहेर व्हा. तुम्हाला माहिती नसेल तर अजून एक गोष्ट सांगते मला कराटे येतात. या पुढे या आवाजात माझ्याशी बोलायच नाही. " तिने दार लावून घेतल.

"आई बघितल का ती अजिबात घाबरत नाही. " रत्ना म्हणाली.

" हो ना. ते काय कराटे की काय येतात उगीच मारायची आपल्याला. "रमा ताई घाबरल्या होत्या.

" आता काय करू या? "

" येवू दे प्रदीपला आज तिचा समाचार घेते. तो देईल ना एक ठेवून बसेल रडत. "रमा ताई म्हणाल्या.

" पण त्याच ही ती ऐकेल का? "

" का नाही ऐकणार."

🎭 Series Post

View all