मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 8

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 8

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

प्रदीप आला. रमा ताई तोंड उतरवून बसल्या होत्या.

"आई काय झाल?"

"अवंतिका नीट वागत नाही. आज मला फाडफाड बोलली. घर काम नको की काही नको."

"आई अग तिला एक दिवस सुट्टी असते. केला आराम कुठे बिघडल." प्रदीप म्हणाला.

"आशा ही एकच दिवस घरी असायची तिला तू कामाची लिस्ट देवून जायचा."

"आई तो विषय इथे नको."

प्रदीप आत आला. अवंतिका रडत होती. तिने उठून त्याला मिठी मारली.

" काय झाल माझ्या अवुला? रडायच नाही. सांग."

"आई दीदी राहत होत्या ते घर खाली करायला सांगितल. त्यांना रहायला जागा नाही. मला खूप वाईट वाटत आहे. " ती डोळे पुसत म्हणाली.

"एवढच ना त्यांना इकडे बोलवून घे. कामाला बाई आहे. कुक आहे. चल आपण त्यांना घ्यायला जावू. सामान सकाळी येईल." ते दोघ गेले. तिकडून डिनर करून आले.

आई बहीण घराकडे बघत होते." वाह. नॉट बॅड अवंतिका."

" मम्मी पण याची आई बहीण इथेच रहातात."

" राहू दे आता आम्ही आलो ना. करू नीट."

" प्रदीप हे कुठे राहतील." अवंतिकाने गोड आवाजात विचारल.

"एक मिनिट आई तू हॉल मधे शिफ्ट हो." प्रदीप म्हणाला.

"मी का हॉल मधे राहू?" रमा ताईंनी नकार दिला.

"मग रत्ना सोबत रहा. "

" अस कस त्या जोडीत मी राहणार."

" आई थोडे दिवस अॅडजेस्ट कर ना. पाहुण्या आहेत त्या."

रमा ताईंची रवानगी हॉल मधे झाली. त्यांच्या कॉटवर अवंतिकाने स्वच्छ चादर टाकली. तिची आई, दीदी तिकडे झोपायला गेल्या. त्यांनी दार लावून घेतल.

रमा ताई हॉल मधे नुसत्या बसुन होत्या. हळू हळू सगळ हातच निघून जात आहे. त्या विचार करत होत्या.

सकाळी अवंतिकाची आई बहीण उशिरा उठल्या. नाश्ता झाला चहा झाला. डिश कप तसेच पडले होते.

" हे उचला. " रमा ताई ओरडल्या. त्यांनी दुर्लक्ष केल.

"काय घाणेरड्या बायका आहेत. ऐकू येत ना? "

"आमच्याशी बोलायच नाही. काम तर मुळीच सांगायच नाही. वाटत तर तुम्ही करा." त्या आत जावून बसल्या दुपारी ही जेवून आत गेल्या.

"आई काय ग हे या घराच काय झाल?" रत्ना म्हणाली.

"तेच समजत नाही. वैताग आला आहे. आशा होती तेच बर होत .मला रक्षितची आठवण येते आहे. " रमा ताई रडत होत्या.
......

आज शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग होती. रक्षितला खूप चांगले मार्क मिळाले होते. सगळ्या टीचर त्याचे कौतुक करत होत्या." इतका चांगला मुलगा मिळाला तुमची खूप मेहनत आहे आशा मॅडम. याचे बाबा आले नाही का? "

ते दोघं काही म्हणाले नाही. पुढची ऍडमिशन घ्यायची होती प्रदीपने बरोबर पैसे पाठवून दिले. तो प्रॉब्लेम लगेच सुटला.
......

घरी अवंतिका हाताबाहेर गेली होती. ती तिला हव ते करत होती. आज तिच्या फ्रेंड्स येणार होत्या. पार्टी होती. बाहेरून जेवण स्टार्टर घेतले होते. त्या सगळया वन पीस घालून तयार होत्या. रमा ताई बाहेर बसुन बघत होत्या.

"तुम्ही आत बसा बाहेर यायच नाही. रत्ना तू ही." अवंतिका ओरडली.

"हे तू आम्हाला सांगू नको. या घरात हे थेर चालणार नाहीत. दारू काय. छोटे कपडे काय. आधी हा फ्रॉक बदल." रमा ताईंनी उत्तर दिल.

"शी काय आडाणी लोक आहेत तुझ्या घरचे." अवंतिकाची मम्मी म्हणाली.

अवंतिका आत गेली. तिने प्रदीपला फोन केला.

"इथे माझे फ्रेंड्स यायची वेळ झाली आई आत जात नाही उलट भांडण करून तमाशा करत आहेत. "

सांगतो तिला. त्याने फोन केला रमा ताईंनी उचलला नाही.

अवंतिकाने त्यांना हात धरून आत बसवल. बाहेरून लावून घेतल. थोड्या वेळाने प्रकाश घरी आला. त्याला बाहेरून सांगितल. "थोड्या वेळाने ये. "

" मी आत जातो ना. "

" नको असे लो क्लास नातेवाईक बघून मैत्रिणी हसतील."

रात्री प्रदीप घरी आला. रमा ताई, रत्ना खूप चिडलेल्या होत्या . अवंतिका, तिची आई, बहीण मैत्रीणींना सोडायला गेल्या होत्या.

"दादा तुझी बायको दारू पिते. छोटे कपडे घालून नाचते. आज तर तिने आईला मला आत कोंडल." रत्ना म्हणाली.

प्रदीप फक्त ऐकत होता. त्याचा फोन वाजत होता. कार ठोकली पोलीस स्टेशन मध्ये या.

प्रदीप पटकन गेला. "तुमची बायको दारु पिऊन गाडी चालवत होती."

कसतरी तिला तिथून सोडवल. प्रदीप त्या तिघींना खूप रागवत होता. हे प्रकरण मिटवतांना खूप पैसे खर्च झाले. प्रदीप चिडल्या मुळे अवंतिका कंटाळली होती. बाहेरच शॉपिंग, हॉटेल बंद झाल होत.

प्रदीप सकाळी नाश्ता करत होता. रत्ना आली. "दादा जरा पाच हजार रुपये दे ना."

"कशासाठी?" प्रदीप आधी अवंतिका म्हणाली.

"मी दादाशी बोलते आहे अवंतिका. तुझ्याशी नाही."

"मिळणार नाही इथे फुकटच राहतात काही करत नाही. वरून आमच्या कडून पैसे घेतात." ती ओरडली.

"अवंतिका..." प्रदीप काहीतरी बोलत होता.

"गप्प बस प्रदीप हे दोघ मला या घरात नको. "

" हो का मग तुझी आई, बहीण इथे नको." रमा ताई म्हणाल्या.

" त्या गेल्या तर त्यांच्या मागे मी पण जाईल." अवंतिका प्रदीप कडे बघत म्हणाली.

" या पुढे इथे रहायच असेल तर सगळ काम कराव लागेल. दर महिन्याला दहा हजार रुपये घरात द्यायचे. "अवंतिका म्हणाली.

" आम्हाला जमणार नाही. यांची नवीन नोकरी आहे. " रत्ना म्हणाली.

" मग निघा इथून. "

" दादा तू काही म्हणणार नाही का?" रत्ना त्याच्या कडे बघत होती.

"बरेच वर्ष झाले रत्ना तू इथे आहेस आता तुम्ही तुमच बघा." प्रदीप म्हणाला.

पुढच्या आठवड्यात रत्ना दुसरीकडे रहायला गेली. रमा ताईंनी खूप विरोध केला. उपयोग झाला नाही.

अवंतिका तिची आई दीदी यांच्या कचाट्यात रमा ताई एकट्या सापडल्या होत्या. त्यांना कोणी विचारत नव्हत. जेवायला ही बोलवत नव्हत.

कुकच्या हातच खावून रमा ताई खूपच एसिडीटी झाली. त्यांच्या छातीत कळ येत होती. सकाळ पासुन त्रास होत होता. त्या हाक मारत होत्या कोणी पाहिल नाही. त्यांनी प्रदीपला फोन केला त्याने उचलला नाही. रत्ना त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यांनी आशाला फोन लावला. "मला बर नाही छातीत दुखत."

"मला का सांगताय. घरी कोणी नाही का?" आशा विचारात होती.

"तू प्रदीपला सांग तो माझा फोन घेत नाही."

" बर तुम्ही तो पर्यंत ती निळी गोळी घ्या." आशाने सांगितल.

" घेतली तरी त्रास होतोय."

तिने प्रदीपला फोन केला. आशा नाव बघून त्याने फोन उचलला.

"आईंना बर नाहिये. त्या तुम्हाला फोन करताय जरा बघा त्यांना हॉस्पिटल मधे न्याव लागेल."

"ठीक आहे." तो म्हणाला.

आशाने फोन ठेवून दिला. इतर कोणतीच चौकशी केली नाही.

रमा ताईंना अ‍ॅडमिट केल. प्रदीप एकटा हॉस्पिटल मधे जात होता.

"मला रक्षितची आठवण येते आहे." रमा ताई रडत होत्या.

प्रदीपने आशाला फोन केला. तिने रक्षितला पाठवून दिल.

प्रदीप घरी गेला. " अवंतिका आई साठी डबा दे."

"किचन मधे आहे जेवण. घे."

"ते नाही तिला चालत साधी मुगाची खिचडी कढी कर. "

"मला येत नाही."

"रेसिपी बघ."

"जमणार नाही."

त्याने रत्नाला फोन केला. तिने लगेच डबा पाठवला.

रमा ताई घरी आल्या. त्या आता रत्नाच्या रूम मधे रहात होत्या. दिवस भर रूम मधे रहायच. जेवायला मिळत नव्हत. औषध घेतले का कोणी बघत नव्हतं. रात्री प्रदीप आला की त्या रडत बसायच्या.

आज अवंतिका लवकर आली. त्या तिघी बोलत होत्या. रमा ताई खोकलत होत्या.

"ह्या म्हातारीला घराबाहेर काढ. किती घाण खोकलते." तिची आई म्हणाली.

"हो थोडे दिवस तब्येत बघते ना."

" हे घर तुझ्या नावावर कर."

"हो."

"प्रदीप कडे अजुन काय प्रॉपर्टी आहे."

" खूप आहे मम्मी. हळू हळू आपल्या नावावर करून घेवू ."

रमा ताई नेमक किचन मधे जात होत्या त्यांनी ऐकल. तिघी त्यांच्या मागे आल्या. दोघींनी त्यांना धरल. अवंतिकाने त्यांना धमकी दिली. "रोज माझ्या सोबत रहायचा आहे समजल ना. तोंड एकदम बंद."

हो. रमा ताई घाबरून म्हणाल्या.

" म्हातारी नटून थटून रहाते. दागिने बघ किती आहे. "

" अरे हो. " तिने त्यांच्या गळ्यातली सोन्याची चेन काढून घेतली. आईकडे दिली. तिघी हसत होत्या.

"आल्या मोठ्या सासुरवास करणार्‍या. गप्प आत जावून पडून रहा. प्रदीपला काही समजल चूक झाली तर उद्या बांगड्या जातील. समजल ना. " अवंतिकाने धमकी दिली.

रात्री प्रदीप आला. "आई कशी आहेस जेवली का?"

"हो ठीक आहे."

"औषध घेतले?"

"हो." त्यांना प्रदीपशी बोलायच होत हिम्मत होत नव्हती.

"झोप तू. " तो त्याच्या रूम मधे निघून गेला.

अवंतिका त्याच्या कडे बघत होती. बर झाल म्हातारी काही म्हणाली नाही.

🎭 Series Post

View all