मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 9

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 9

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

रमा ताईंनी रत्नाला फोन केला सगळं सांगितल.

" मी बघते." तीने दुसर्‍या दिवशी प्रदीपला फोन केला त्याचा विश्वास बसला नाही. " रत्ना आमच्या कडे भांडण लावायच नाही."

" आईकडे बघ तिची चेन गायब आहे." रत्ना म्हणाली.

प्रदीप घरी आला. "आई काय झाल तुला अवंतिका काही म्हणाली का?"

नाही.

"रत्ना काहीही सांगते." तो बघत होता आईच्या गळ्यात चेन नाही. ती अवंतिकाच्या आईकडे दिसली.

" अवंतिका तुझ्या आई, दीदी साठी दुसर घर बघितल त्यांना जायला सांग." प्रदीप म्हणाला.

"त्या इथून जाणार नाही." ती चिडली.

"त्या जातील. तू ही रोज आईसाठी स्वयंपाक करशील. समजल ना. चल आता किचन मधे जा. माझ ताट कर." तो मोठ्याने म्हणाला.

"मी अस काहीही करणार नाही. मम्मी गेली तर मी ही जाईल."

"नीघ मग आईची चेन देवून जा. " तिघी गेल्या.

सगळ हातच गेल. तिघी बोलत होत्या.

"मी कस जावू देईल. ही बघ घरची चावी आहे उद्या तिकडे जाते पैसे महत्वाचे कागदपत्र म्हातारीचे दागिने घेते. " अवंतिका म्हणाली.

दुसऱ्या दिवशी अवंतिका संध्याकाळी घरी आली. तिने कपाटातून दागिने पैसे घेतले. रमा ताईं वर हल्ला केला. त्या कशा तरी रूम मधे पळून गेल्या. आतून दार लावल. प्रदीपला फोन केला. तो घरा जवळ होता तो आला. आईला सोडवल. पोलिसांना बोलवून तिला अटक झाली.

" हे काय करून बसला तू प्रदीप? अश्या मुली घर सांभाळता का. तिची नजर तुझ्या प्रॉपर्टी वर होती." रमा ताई म्हणाल्या.

"आई मी चुकलो. तुला काही झाल असत तर मी काय केल असत."

अवंतिका तिचा ग्रुप असेच हनी ट्रॅप लावणारे लोक होते. बर्‍याच पुरुषांना त्यांनी फसवल होत. एक वर्षात लुटून पळून जायच हाच प्लॅन असायचा. प्रदीपच नशिबाने यात काही नुकसान झाल नाही. त्याच्या मूर्ख पणा मुळे संसार उद्वस्त झाला. तरुण सुंदर मुलींच्या नादी लागणारे लोक या जगात आहेत तो पर्यंत असे फसवणारे लोक कमी नाहीत.

घराची पार दुर्दशा झाली होती. रमा ताई दिवस भर एकट्या राहून कंटाळल्या होत्या. रत्ना ही येत नव्हती. त्यांना सांभाळायला एक बाई ठेवली होती. ती दिवस भर फोन वर मोठ्या आवाजात व्हीडिओ बघत बसायची. आवाज कमी कर. ऐकायची नाही. मदत होण्या ऐवजी त्रास होत होता. रमा ताई कंटाळल्या. तिला काढून टाकल.

" प्रदीप एक बोलू का? आशाला रक्षितला परत आण."

प्रदीप काही म्हणाला नाही. तो विचार करत होता. त्याने आत जावून आशाला फोन लावून बघितला. फोन लागला नाही.
......

आशा रक्षित मजेत होते. रक्षितला आजी कडे खूप आवडल होत. खूप लाड होत होते. आई ही खुश होती. म्हणून त्याला बर वाटत होत.

आशाला टेंशन नव्हत. ती सगळं सांभाळून आई बाबांकडे नीट लक्ष देत होती. पैसे ही व्यवस्थित बाजूला पडत होते. प्रदीपने दिलेले दहा लाख तिने नीट गुंतवले होते. त्याच व्याज येत होत. तिचा पगार वाढला होता. आधी पासुन शांत चांगली होती. ती जिथे जाईल तिथे बाकीचे खुश होते. शांत आयुष्य होत. तिने छान कॉटनचे ड्रेस विकत घेतले होते. केस ही छान सेट केले होते. ती आनंदी सुंदर दिसत होती.

ती दुसर्‍या दिवशी ऑफिस मधे गेली. गेट जवळ प्रदीप भेटला. ती त्याच्याशी हसली. तो बघत होता ही वेगळी दिसते आहे. "चहा घ्यायचा का?" त्याने विचारल.

"मला जमणार नाही. ऑफिसचा वेळ झाला." ती सहज म्हणाली.

"थोड बोलायच होत. आपल्या बद्दल." तो म्हणाला. त्याला वाटल ती वाट बघत असेल. लगेच हो म्हणेल.

"मला वेळ नाही." ती कोरडे पणाने म्हणाली.

"आशा प्लीज आई आजारी आहे. तुझी रक्षितची आठवण काढते आहे."

"आपला आता काही संबध नाही. तुम्ही या पुढे मला नाही भेटला तरी चालेल." ती शांत पणे म्हणाली.

"रक्षित माझा मुलगा आहे त्याला भेटायला मी आणि आई येवू का?"

"नको मी त्याला तिकडे सोडून देईल. संध्याकाळी घ्यायला येईल ." आशा म्हणाली.

" ठीक आहे."

ती आत निघून गेली.

आशा किती शांत चांगली आहे त्याला आता समजल. शनिवारी रक्षित रमा ताईंना भेटायला गेला. त्याला खाली सोडून आशा ऑफिस मधे गेली. तो आल्या मुळे रमा ताई खूप खुश होत्या. प्रदीप ही दुपार हून घरी होता. संध्याकाळी आशा आली. ती टॅक्सीत होती. तिने रक्षितला फोन केला

"आशा वरती ये ना आई आठवण काढते आहे ." प्रदीप म्हणाला.

"नाही उशीर होतो आहे आम्हाला बाहेर जायच आहे."

"तू आईला भेटणार नाही का?" प्रदीप विचारात होता.

"नाही. रक्षितला पाठवा." त्यांच तोंड ही बघायची इच्छा नाही.

ते दोघ निघून गेले.

आशा रक्षित निघाले. "आजी कशी आहे ?"

"आई त्या घरी अजिबात चांगल वाटत नाही. नुसती घाण आहे. " रक्षित म्हणाला.

"अजून कोण होत? " आशाला विचारायच होत. प्रदीपची बायको होती का. पण रक्षितने तस काही सांगितल नाही. तिने ही नंतर जास्त विचारल नाही.

शेजारच्या पिंकीचा वाढदिवस होता. मोठा कार्यक्रम होता. या सगळ्यांना तिकडे जायच होत. मंगेशचा चुलत भाऊ राजेश वाढदिवसाला आला होता. त्याच लग्न झाल नव्हत. साधारण चाळीशीत होता. अतिशय चांगला होता. शेती करत होता . भरपूर उत्पन्न होत. घर गाडी कसलीही कमी नव्हती. पण त्याचा लग्नाचा योग आला नव्हता . राहील ते राहील.

त्याने पिंकी साठी खूप गिफ्ट आणले होते. आशा खूप काम करत होती. त्या वहिनीला मदत झाली.

मंगेश, वहिनी शरद राव प्रभा ताईंशी बोलत होते. "राजेश साठी आशा ताई कशी वाटते?"

"अरे हो हे चांगल स्थळ आहे. आशाच चांगल होईल. मुलगा खूप चांगला आहे. त्यांना माहिती आहे ना आशा बद्दल रक्षित बद्दल." शरद राव म्हणाले.

" हो सगळ माहिती आहे त्यांना काही अडचण नाही." मंगेश म्हणाला.

" आशा ऐकेल का?" प्रभा ताई म्हणाल्या.

" आपण तिला समजावून सांगू. " शरद राव म्हणाले.

" राजेश खूपच चांगला आहे देव भोळा. घरची भरपूर शेती आहे. कोणतही व्यसन नाही. घरी आई बाबा आहेत. इथेच जवळ रहातात. त्याला आशा ताई पसंत आहे. "मंगेश माहिती देत होता.

"हे कधी झाल?"

"मी मागेच विचारल होत." मंगेश म्हणाला.

रात्री त्यांनी आशाला विचारल. तिला धक्का बसला. कोणी सांगितल मला लग्न करायच नाही. तिने नकार दिला.

" आशा वेळ घे. अस चिडू नकोस."

"काहीही काय आई बाबा मला जमणार नाही. मी लग्न करणार नाही. यापुढे तुम्ही आणि रक्षित हेच माझ आयुष्य."

" बेटा स्थळ चांगल आहे. एवढ मोठ आयुष्य तू एकट कस घालवणार. बघितल ना रक्षित राजेश सोबत रमला होता. किती बोलत होता."

आशा काही म्हटली नाही झोपून घेतल.

दुसर्‍या दिवशी ती ऑफिसची तयारी करत होती. प्रभा ताई तिच्या मागे होत्या. "आशा मी काय म्हणते आहे. "

"आई प्लीज. "

" एकदा भेट त्यांना. बोलून बघ. मग ठरव."

नाही.

ती ऑफिसला गेली.

मंगेश आला." काय म्हटली आशा ताई? "

" ऐकत नाही काय कराव?" प्रभा ताई म्हणाल्या.

"अग तिला एक अनुभव एवढा भयानक आला आहे त्या मुळे अस करते."

"आता काय कराव? "

"काही नाही मी राजेश दादाला सांगतो तिला भेटायला ते त्यांच ठरवतील. " मंगेश गेला.

संध्याकाळी आशा ऑफिस मधून निघाली. बस स्टॉप वर आली. राजेश आला. ती त्याच्याशी हसली.

"मला माहिती आहे तुम्ही मला बघून शॉक झाल्या असाल. मला तुमच्याशी बोलायच आहे. चला चहा घेवू."

दोघ जात होते रस्ता क्रॉस करतांना एक गाडी जोरात आली. आशा आधीच विचारात होती. राजेशने तिचा हात धरला. "काय करताय बी केअरफुल."

"थँक्स." ती घाबरली. त्याने तिला पाणी दिल. ते दोघ बोलत होते. त्याच काळजी घेण, प्रेमाने वागण वेगळ होत हवहवस. आशाला लगेच समजल राजेश चांगला आहे.

🎭 Series Post

View all