मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण भाग 10 अंतिम

माझ्यासाठी कोण
मी सगळ्यांसाठी माझ्या साठी कोण 10 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

विषय तिची फरपट

प्रदीप समोरून आला. आशा...... त्याने हाक मारली.

हे काय करताय इकडे आशा विचार करत होती.

"मला तुझ्याशी बोलायच आहे." तो म्हणाला.

" हे कोण आहेत." राजेशने विचारल.

"माझे एक्स हसबंड." आशा म्हणाली.

"काय सुरू आहे हे?" प्रदीप राजेश कडे बघत होता.

"हे राजेश आहेत. ते मला भेटायला आले आहेत. " आशा सहज म्हणाली.

का?

"ते आम्ही तुम्हाला का सांगायच. लीव अस अलोन. "आशा म्हणाली.

प्रदीप चिडला. "आशा माझ्या सोबत चल."

"नाही मी येणार नाही. माझ्याशी जोरात बोलायच नाही. आपला काही संबध नाही." ती जोरात म्हणाली.

" चांगल चालल आहे."

" मी काहीही करेल माझ्या कडे एक बोट दाखवण्या आधी चार बोट तुमच्या कडे आहेत. माझी लाइफ कंट्रोल करु नका. तुम्ही काय उद्योग केले ते मला माहिती आहेत. चला राजेश." ती राजेश बरोबर निघाली. कार मधे ती शांत होती.

" मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. हे बघितल ना माझ्या मागे कसे लोक आहेत." आशा म्हणाली.

" मला काही फरक पडत नाही या माणसाला मी अस सरळ करेल. पण मी आता गप्प बसलो." राजेश म्हणाला.

" तुम्ही बरोबर केल मूर्ख माणसांशी वाद घालण्यात अर्थ नाही." दोघ हॉटेल मध्ये पोहोचले. चहा सांगितला. राजेश खूप बोलत होते. स्वतः बद्दल सांगत होते. त्यांचा स्वभाव चांगला आहे ते समजत होते. ते ज्या पद्धतीने आशाची काळजी घेत होते ते समजत होत. आशा विचार करत होती काय करू.

" आशा तुम्ही आपल्या बद्दल विचार करा. मी तुम्हाला रक्षितला अंतर देणार नाही. आई बाबा समजूतदार आहेत तुम्ही घरी या बघा मग ठरवा. काही घाई नाही. रविवारी या."

" रक्षित शिवाय मी राहू शकत नाही ."

" तो माझा मुलगा आहे मी त्याला अंतर देणार नाही. मी आत्ताच म्हणालो ना . " राजेश म्हणाला.

दोघ सोबत खूपच कंफर्टेबल होते. बर्‍याच वेळ ते बोलत होते.

प्रदीप घरी आला. रमा ताई विचारात होत्या." आशा भेटली का? "

" हो भेटली आई ती लग्न करते आहे. "

" मी बोलु का तिच्याशी? "

" काही उपयोग नाही आई माझी चूक झाली."

"आता काय?

" आता तू आणि मी. बघू पुढच पुढे. "
......

आशा घरी आली. रक्षितशी बोलाव लागेल. कस पण. आई बाबा तिच्या कडे बघत होते. तिने काही सांगितल नाही. रात्री रक्षित तिच्या जवळ बसलेला होता.

"रक्षित तुला राजेश आवडले का?"

"हो ते अंकल छान आहेत आई त्यांच्या कडे किती मोठी कार आहे ते माझे लाड करतात."

"बेटा तू लहान आहे तुला समजेल की नाही माहिती नाही पण आजी आजोबा लग्नाच म्हणता आहेत . तुझ्याशी मी नेहमी मोकळी बोलते."

"आई तू तिकडे चालली जाशील मी एकटा राहील. " रक्षित घाबरला.

"नाही बेटा आपण दोघ जावू. मी तुला सोडून कुठे जाणार नाही. तिकडे मोठ घर आहे. तुला तुझी रूम असेल. तिकडे आजी आजोबा आहेत. आपण या रविवारी जायच का त्यांच्या कडे." आशाने विचारल.

"हो आई."

रविवार ते राजेशच्या घरी गेले. खरच सुंदर घर होत. मागे मोठी जागा होती. थोड दूर मोठ शेत होत. भरपूर उत्पन्न आहे समजत होत. घरात कामाला लोक होते. साधे चांगले लोक होते. आशा सगळं बघत होती. तिने होकार दिला.

अंजलीला खूप आनंद झाला होता. दोघांच साध्या पद्धतीने लग्न झाल. आशा घरी आली. आधीच्या अनुभव वरून ती जरा घाबरलेली होती. ती रक्षित एका रूम मध्ये बसून होते. काय कराव काही सुचत नव्हत.
कोणी काही म्हटलं तर. कश्याला हात लावायची हिम्मत नव्हती.

"अरे काय झाल? चला जेवायला. तुम्ही दोघे एवढेच शांत आहात का." राजेश म्हणाला.

आशा रक्षित तरी गप्प होते.

"मला तर वाटल रक्षितने मस्ती करून घर डोक्यावर घेतल असेल. काय काय हव ते सांगा. "

आशा उठली. रक्षित ही खुश दिसत होता. घरचे नीट बोलत होते. बाकीचे वहिनी वहिनी करत होते.

"रक्षितची रूम त्याला हवी तशी सेट करू तो पर्यंत तो आपल्या सोबत राहील ." राजेश म्हणाला.

दुसर्‍या दिवशी तो स्वतः त्याला शाळेत सोडायला गेला.

" अहो तो बस ने जाईल अशी त्याची सवय खराब होईल." आशा म्हणाली

"काही होत नाही एक दोन दिवसांनी." त्यांच रक्षित साठी खूप करण तिला छान वाटत होत. आजी आजोबा शांत होते. मोठा व्याप होता. राजेश बिझी होता.

रक्षित साठी खूप खरेदी झाली. त्याला त्याची रूम खूप आवडली. तो त्याच्या रूम मधे गेला. तो झोपला का आशा बघत होती. तिला तिच्या रूम मध्ये जायची भीती वाटत होती. इतके दिवस बर होत रक्षित सोबत होता. ती विचार करत तिथे उभी होती.

मला नक्की हव तरी काय? या गोष्टीची मी आधी किती वाट बघितली. आता सुख माझ्या समोर उभ आहे. माझ घर, माझा नवरा आता नीट रहायच. ती आनंदने त्यांच्या रूम मधे गेली.

राजेश टीव्ही बघत होता. "रक्षित झोपला का?"

हो. दोघांना काही सुचत नव्हत. राजेशने तिला मिठीत घेतल तिने विरोध केला नाही. दोघ वेगळच सुख अनुभवत होते. चांगल्या माणसांसोबत चांगल वाटत. आशा खूपच खुश होती. ती आता आनंदी राहणार होती. उशिरा का होईना. तिच्या वाटेच सुख तिला मिळाल. ती आता तिच्या लोकांना जपणार होती.

कोणालाही अति गृहीत धरू नका. नीट वागा. कर्माच फळ इथेच भोगायला लागत.

🎭 Series Post

View all