मोसंबीचा शिरा

My Recipe
माय रेसिपी " मोसंबीचा शिरा."

लग्न समारंभ किंवा त्याच सारख्या इतर पार्टीज,आणि फंक्शन मध्ये स्वीट डिश म्हणून मिक्स्ड फ्रूट वा मिक्स ड्रायफ्रुटचा शिरा असतो.

यामधूनच इन्सपायर होऊन मी मोसंबीचा शिरा ,"बनवायला प्रेरित झाले.

आमचे एक स्नेही कुटुंब दिवाळीचा फराळ देऊन गेले,मला वाटले आपणही त्या डब्यात काहीतरी स्पेशल करून द्यावे.

आणि "मोसंबीचा शिरा"माझी स्पेशल रेसिपी ठरली.

ते कुटुंब मला बरेच विनवत होते रेसिपी सांगण्यासाठी.आता वाटतेय सांगून च टाकावे!!

आपल्या साध्या काजू पेक्षा ,भिजवून काप केलेले काजू वेगळे लागतात,तसेच थोडेसे भाजून घेतलेले काजूपन टेस्टला वेगळेच अन् छान लागतात.
हे रोस्टेड थोडेसे काजू शिरा बनवायला घेताना भिजत ठेवायचे.

म्हणजे त्यांचे सुंदर काप करता येतात.

'मोसंबीला 'कुकर मध्ये एक दोन शिट्या देऊन घ्यायची,थंड झाल्यावर मोसंबी चे साल अन् बिया व्यवस्थित काढून घ्यायची,आतला गर सुंदर मोकळा करून घ्यायचा.

थोड्याशा तेला मध्ये(तूप/साजूक तूप नाही)जाडसर रवा(बारीक रवा नाही)छान रंग बदले पर्यंत भाजून घ्यायचा.

आता त्यामध्ये हा मोसंबीचा गर,साखर, रोस्टेड काजूचे काप,थोडीशी वेलची पावडर, चवी नुसार किंचित से मीठ घालून सगळे मिश्रण पूर्ण एकजीव होई पर्यंत एकसारखे परतवून घ्यायचे.

.गॅस मंद आचेवर ठेवून त्यात कोमट केलेले दूध थोडे थोडे करून मिश्रण चांगले एकजीव करत राहायचे.

आता मिश्रण आटून रवा चांगला घट्ट व्हायला लागला असेल तेव्हा पूर्ण वाफ बंद होईल असे झाकण घालून थोडा वेळ थांबायचे.

शिरा छान जमून आला आहे असे वाटले की,त्यावर साजूक तुपाची चमचाभर धार सर्व बाजूने सोडून घ्यायची,त्यामुळे शिऱ्या मधला थोडासा चिकटपना जाऊन पाचनालाही फायदा होतो.

आता सर्व्ह करण्यासाठी एखाद्या सुंदर डिझाईन असलेल्या कटोरी मध्ये मस्त दाबून भरून घ्यायचा,आणि प्लेट मध्ये उलटा करून सर्व्ह करायचा.

गार्निशिंग साठी एखादी मोसंबीची फोड अन् एखादा काजू बस होतो.

ही रेसिपी माझी स्वतःची स्पेशल रेसिपी आहे,आणि फेवरेट सुद्धा.

एकदा नक्की बघा करून,"मोसंबीचा शिरा."
©® Sush.( सुश)