आई आयुष्यातील खरी मैत्रीण भाग -2

आई ही आयुष्यातील खरी मैत्रीण असते
भाग -2

विषय - मुलीची आई..

पण आई म्हणुन मुलीची बाजु सावरून घेणं गरजेचं होतं, म्हणुन ती मध्येच बोलते.
" हो येतं की, घरातला माणुस उपाशी नाही राहणार इतकं जेवणं येतं.. " अवंतिका आईच्या तोंडाकडे पाहते, आणि नजरेने खुणावते.

" काय आहे मुलगी किती हि शिकली तरी तिला ह्या गोष्टी यायला हव्यात ना, सौंसाराचा भाग आहे तोही. " त्याची आई बोलतं होती.

बराच वेळ अवंतिका ला टिपिकल प्रश्न विचारले जातात, मुलाला हि तिचे वडील प्रश्न करतात.

आणि होकार लवकरात लवकर कळवतो बोलुन ती मंडळी निघुन जातात.

जशी ती मंडळी निघुन जातात तशी अवंतिका लांब श्वास घेते, हुश्श.. सुटले गं बाई... किती ते प्रश्न.." अवंतिका मॉर्डन जमाण्याची असते.

पण आई वडिलांच्या इच्छेसाठी ती ह्या बघण्याच्या कार्यक्रमाला होकार देते.

तिचे आई वडील मंडळींना सोडुन आत येतात, " चला बाई मंडळी तर छान होती, आता मात्र होकाराची अपेक्षा आहे. "
आईची काळजी आता होकार यावा ह्या कडे वळली होती.

" हो तर, मुलगा आणि त्याचे घरचे उत्तमं होते. तु म्हणतेस तसं आता फक्त होकाराची अपेक्षा आहे.. मग आपण मोकळे.. " बाबा आईला बोलतात.

" काय होकार..? बाबा मला नाही हा हे स्थळ पसंत.. " अवंतिका त्यांच्या बाजुला येऊन बसते. तिच हे उत्तर ऐकुन आई भडकते.

" काय... काय म्हणालीस तु..? पसंत नाही, काय वाईट आहे त्या मुलात..? " आई रोख ठोक पणे विचारते.

" मला त्याचे आई वडील पसंत नाही, मुलगा चांगला आहे पण त्याचे घरचे नाही. तु पाहिलंस ना किती प्रश्न विचारले ते.." अवंतिका बोलते.

" हा मग त्यात काय झालं बाळा.. " बाबा तिला शांतपणे प्रेमाने विचारतात.

" तुम्ही थांबा ओ,, हिचे लाड तुम्हीच जास्त केले आहे. मुलगी सुन म्हणुन जाणार तर तिला ह्या सगळ्या गोष्टी येणं तितकंच गरजेचं असतं. आणि तु बोलतेस पसंत नाही, गप मुकाट्याने ह्या लग्नाला तयार हो. आणि हो ऑफिस चं कामं जसं करतेस तसं स्वयंपाक करायला ही शिक आता .. " आई खडसावून सांगते.

आईच्या ह्या बोलण्याने तिचा चेहरा पडतो, ती बाबांना समजावते पण त्याचा हि काही उपयोग नसतो.
बाबा तिला एकच गोष्ट बोलतात, " ती मुलीची आई आहे, सासरी एखादी गोष्ट चुकली की आईलाच दोष देणार. की आई ने काही शिकवलं नाही, तिचाच उद्धार होणार. "

दोन दिवसांनी मुलाकडुन फोन येतो, मुलगी पसंत आहे म्हणुन त्यांचा होकार येतो. आणि अवंतिकाच्या आई बाबांचा आनंद गगणात मावत नसतो.

क्रमश...

🎭 Series Post

View all