आई आयुष्यातील खरी मैत्रीण. भाग -3 अंतिम भाग

आई ही आयुष्यातील खरी मैत्रीण असते
भाग -3

हि गोष्ट आई अवंतिकाच्या कानावर घालते, " पण मला नाही करायचं हे लग्न, तुम्ही त्यांना नकार सांगुण द्या. " अवंतिकाच पुन्हा तेच रडगाणं असतं, आईचा पारा चढतो.

" इतकं चांगल स्थळ आलंय आणि तुझं आपलं तेच पुराण चालु, इतकं समजावलं पण ऐकायला तयार नाही. मला काही ऐकायचं नाही, गप गुमान ह्या लग्नाला तयार हो. "आई तिला दमदाटी करत तिचा निर्णय कळवते.

ती बाबां जवळ जाते, बाबांची ती लाडकी असते त्यामुळे ती बाबांशी बोलायचं ठरवते," बाबा ऐका ना, मला हे लग्न नाही करायचं तुम्ही आईला समजवाना. "

" अगं इतकं चांगल स्थळ आहे, तुला का करायचं नाही..? तुला दुसरं कोणी पसंत आहे का, तर तसं सांग आपण तसं पाहु.. " बाबा तिला तिच्या मनातलं विचारतात.

पण तिचं असं काहीही नसतं, " अहो बाबा माझं असं काही नाही, पण त्याची आई पाहिली का ती कसं बोलतं होती."

शेवटी तिने बोलुन दाखवलं.

" हेच कारण आहे ना ? अगं होईल सगळं लग्नानंतर ठीक.."

आई ने त्या दोघांचं बोलणं शांतपणे ऐकुन घेतलं, आणि मग तिला समजवायचं ठरवलं, " अगं उद्याच टेन्शन तु आज का घेतेस, तुझे आई वडील असे नाही की कोणी पाहिलं आणि एकदाच करुन दिलं. होकार आला म्हणजे लगेच करुन दिलं असं आहे का..? अगं वेळ घे समजुन घे, ओळख त्याला. थोडं एकमेकांन सोबत वेळ घालवा, भेटी घ्या मग तु ठरव. आणि नाहीच पटला तर तुझा निर्णय घ्यायला तु तयार आहेस. "

बाबांना आईचं बोलणं पटत," बरोबर बोलते आई, तु आधीच नकाराची पिपाणी वाजवलीस तर कसं चालेल.. "

" तुम्हा मुलांना आई म्हणजे काय वाटली रे, फॅशनचे कपडे नाही घातले म्हणजे आमचे विचार ही तुम्हाला जुनाट आणि भुरसट वाटतात का..? आई मुलांचा नेहमी चांगला विचार करते, पण कुठे तरी मुल चं हे समजुन घ्यायला कमी पडतात. मि एका मुलीची आई आहे, मला तुझी काळजी कळते आहे. " आई तिच्या पद्धतीने समजुन सांगते.

" ही आई सुद्धा आधी एक मुलगी होती, मग ती सुन झाली. त्यामुळे मला सगळं कळतंय. सासु चांगली असेल ना..? ती वाकड्यात जरी बोलली तरी तिला आपलं करुन घ्यायची जादू तुला आलीच पाहिजे. आणि ती सासु आहे त्यामुळे तिला थोडं सासु सारखं वागणंच आहे, पण ती कधी आई होणार नाही असं नाही. "

आईचं बोलणं अवंतिकाला पटत, " ठीक आहे मला माफ कर, तुम्ही सुद्धा कळवुन द्या त्यांना.. आई तु माझी मैत्रीण होऊ शकतेस हे विसरून गेली होती मि.. "

आणि अवंतिका आईला गच्च मिठी मारते.

खरंच आई ही आपल्या जवळीची खरी मैत्रीण आहे..

समाप्त..


🎭 Series Post

View all