नकळत तुझ्यात गु़ंतले भाग १

प्रेमाचा शेवट मनाला वेड लावणारा.
काॅलेजचा पहिला दिवस होता. श्रीनिवास अगदी गप्प-गप्प होता. त्याच्या मित्रांनी वेगवेगळी साईड निवडल्याने मित्रांपासून वेगळे झाल्यावर आता आपण एकटे पडणार या काळजीने तो कासावीस झाला होता. सहज त्याची नजर खिडकीच्या बाहेर गेली होती.

एक मुलगी काॅलेजच्या दिशेने आत येत होती. तिचे लांब सडक काळेभोर केसांची जाड वेणी, चाफेकळीसारखे नाक, हसताना गालावर पडणारी नाजूकशी खळी पाहून पाहताच श्रीनिवास जणू त्या मुलीच्या प्रेमातचं पडला होता.

श्रेया हि तिच मुलगी होती जिच्या रुपाने श्रीनिवास पूर्णपणे प्रेमात आकंठ बुडालेला होता. सर्वप्रथम सर्वांशी ओळख करुन देण्यात आली होती. श्रीनिवास श्रेयाने करुन दिलेली ओळख मन लावून ऐकली होती.

वेळापत्रकानुसार काॅलेज आता नेहमीप्रमाणे सुरु झाले होते. श्रीनिवास रोज काॅलेजच्या झाडामागे उभा राहून श्रेयाची वाट पाहत होता. श्रेया वर्गात गेली की तिच्या पाठोपाठ तो देखील वर्गात जात होता.

श्रीनिवासचे आता मित्र देखील बनले होते. श्रेया आणि श्रीनिवास मधे प्रेमसंबंध सुरु असल्याची चर्चा श्रीनिवासच्या एका मित्राने बातमी काॅलेजमधे पसरवली होती. श्रेयाला मात्र या गोष्टीचा खूप राग आला होता.

"आपण कधी एकमेकांशी बोललो देखील नव्हतो , मग हे प्रेमसंबंध प्रश्नच उद्भवत नाही." श्रेया श्रीनिवासला बोलत होती.

" मला देखील माहित नाही हे कोणी पसरवले आहे. जो कोणी असेल त्याला शोधून मी तुझ्या समोर हजर करतो." श्रीनिवास श्रेयाला बोलत होता.

तेवढ्यात श्रीनिवासच्या दिशेने पंकज येताना दिसतो.

" तुझं प्रेम तू व्यक्त करण्याची युक्ती मला पण सांग. माझं शैलावर खूप प्रेम आहे. मी बोलू शकत नाही. तूझ्याकडे पाहून मला हिंमत मिळाली. तू आज पासून दोन मन जुळवणारा प्रेमगुरु आहेस मित्रा." पंकज श्रेया समोर श्रीनिवासला बोलत होता.

" अनेकवेळा माझा पाठलाग तू करत होतास, काही मैत्रिणी मला सांगत होत्या पण, त्याकडे लक्ष न देता तस काही नसेल म्हणून मी काही बोलले नाही पण आता मात्र प्रिन्सिपलला बोलून तुझी चांगलीच शाळाच घेते का नाही ते बघ आता तू." श्रेया रागाने श्रीनिवासला बोलत होती.

" काॅलेजच्या पहिल्याच वर्षी अश्या गोष्टी होत असतील तर, कसे घडवणार उज्वल भविष्य. ते काही नाही अश्या मुलांची निदान या काॅलेजला तरी गरज नाही. श्रीनिवास तू नाही आलास काॅलेजला तरी चालेल." प्रिन्सिपल श्रीनिवासशी बोलत होती.

" पुन्हा अशी चूक होणार नाही सर. माझी चूक नाही तरी पण मी मान्य करुन आत्ता हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. पण मला काॅलेजमधून बाहेर जायला सांगू नका." श्रीनिवास काकूळतीला येवून प्रिन्सिपलशी बोलत होता.

या मोठ्या ठेच खाणा-या प्रकरणानंतर श्रीनिवासच्या आयुष्यात कोणत्या घटना घडतील पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all