नकळत तुझ्यात गु़ंतले भाग २

प्रेमाचा शेवट मनाला वेड लावणारा.
श्रीनिवासने आता प्रेमाचं भूत डोक्यावरुन उतरुन मन लावून अभ्यास करण्याचा ध्यास धरला होता. तो वर्गात कोणाशीच बोलत नव्हता. लायब्ररी मधे जावून पुस्तक वाचत बसत होता. पहिली परीक्षा जवळ आली होती. सर्वजण काॅलेजचे लाईफ खेळीमेळीने घेत होते. श्रीनिवास मात्र अभ्यासावर फोकस करत होता. परीक्षेतले सर्व पेपर त्याला सोपे गेले होते. तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.

सहामाही आणि वार्षिक परीक्षेतही त्याने पहिला क्रमांक सोडला नव्हता. प्रिन्सिपल ने स्वत: श्रीनिवासला केबिन मधे बोलावून अभिनंदन केले होते. काही गैरसमजामुळे गोष्टींमुळे तुझ्यासारखा हिरा गमावला असता काॅलेजने असे देखील बोलून दाखवले होते.

श्रीनिवासची हुशारी पाहून तसेच पंकजने आपल्या बद्दल नको ती अफवा पसरवली हे श्रेयाच्या लक्षात येताच तिने श्रीनिवासची माफी मागितली होती. परंतु श्रीनिवासने ठिक आहे इतकेच बोलून बोलणे संपवले होते.

श्रेया मात्र आता श्रीनिवासच्या प्रेमात पडत चालली होती. अभ्यासातील चाप्टर, प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता ती श्रीनिवासच्या मागे जात होती. श्रीनिवास तिला मदत करुन त्याच्या कामाला निघून जात होता.

एक दिवस श्रेया आपल्या मनातल्या भावना श्रीनिवासला बोलून दाखवायचे ठरवत होती. तिने श्रीनिवासला काॅलेजच्या कॅटिंगजवळ भेटायला बोलावले होते. तिथे त्याला चिठ्ठी देवून ती निघून गेली होती.

चिठ्ठी वाचून श्रीनिवासने ती फाडून टाकली होती. दुसरी चिठ्ठी लिहून त्याने आपल्या मित्राच्या हाताने ती चिठ्ठी श्रेयाला दिली होती.

त्या चिठ्ठीत त्याने स्पष्टपणे नकार दिली होता. एकेकाळी श्रीनिवास श्रेयाच्या प्रेमांत आकंठ बुडालेला होता. हे पाहून श्रीनिवासच्या मित्राने त्या चिठ्ठीतला मजकूर बदलला होता. आपलं प्रेम स्विकारल्यामुळे श्रेया श्रीनिवासकडे पाहत इशा-या मधून प्रेम व्यक्त करत होती. असे आठवडाभर श्रेयाचे वागणे सुरुच होते.

श्रेयाशी भेट घेवून तो तिला आपण चिठ्ठीत स्पष्टपणे नकार दिल्याचे कळवले तरी स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार का घडवत आहे असे श्रीनिवास श्रेयाला विचारत होता.

"चिठ्ठीत होकार दर्शवल्याने, मी स्वत:ला थांबवू शकले नव्हते म्हणून तुझ्याशी बोलायला व्याकूळ होते. तुझं माझ्याकडे लक्षच नव्हते." श्रेया श्रीनिवासशी बोलत होती.

" माझ्यामुळे तुमच्यात गैरसमज निर्माण झाले. मला माफ करा. तुम्ही दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करता म्हणून मी असे केले. श्रीनिवास तू इतका कसा बदललास माहित नाही." श्रीनिवासचा मित्र श्रेया आणि श्रीनिवास बरोबर बोलत होता.

श्रेयाचं वाढतं प्रेम श्रीनिवासला आता त्रास देत होते. वडिलांच्या नोकरीच्या बदलीचं कारण पुढ करत श्रीनिवास ते काॅलेज सोडून निघून गेला होता.

श्रेयाला हि गोष्ट एक आठवड्यानंतर लक्षात आली होती. तिची अवस्था मेल्याहून अर्धमेल्यागत झाली होती. तिने अन्नपाणी सोडले होते. दवाखान्यात अॅडमिट करुन तिच्यावर उपचार करण्यात आले होते.

ती बरी तर झाली होती, फक्त शरीराने. मनाने मात्र आजारी होती. दिवसरात्र श्रीनिवासचा विचार करत तिला वेड‌ लागायचे बाकी होते.

श्रीनिवास तब्बल तीन वर्षांनी श्रेयाला दिसताच कोणत्या प्रकारची घटना घडली हे आपण पाहूया पुढिल म्हणजेच अंतिम भागात.

🎭 Series Post

View all