नकळत तुझ्यात गु़ंतले भाग ३ अंतिम

प्रेमाचा शेवट मनाला वेड लावणारा.
आज एका गार्डन मधे श्रीनिवास छोट्या मुलाबरोबर खेळताना श्रेयाला दिसला होता. त्याच्याकडे पाहताच श्रेया पटकन त्याच्याजवळ जावून कसा आहेस तू? किती वर्षांनी पाहते तुला. असे बोलताच. श्रीनिवास देखील श्रेयाशी मैत्रिणीसारखे बोलतो. तो परदेशी असल्याने काही कागद पत्रांकरता तीन वर्षांनी यावे लागल्याचे कारण श्रेयाला सांगतो.

आपलं लग्न होवून हा आपलाच मुलगा असल्याचे श्रेयाला सांगत होता.
श्रेया तिचे अश्रू लपवत आपल प्रेम एकतर्फी असून कधीही पूर्ण होणार नाही याचा स्वत:ला त्रास करुन घेत होती.

रस्ताने विचार करत चालत असताना एका ट्रकची श्रेयाला धडक लागते आणि श्रेया जागच्या जागी मरण पावली होती. श्रीनिवास परतीच्या प्रवासाला निघाला होता. इतक्यात हि घटना त्याचा मित्र फोन करुन त्याला सांगतो. तसेच तिने काॅलेज सोडून गेल्यानंतर कोणत्या परीस्थितीत दिवस अनुभवले ते देखील फोनवर मित्राने सांगितले होते.

धावत-पळत श्रीनिवास श्रेयाला ज्या दवाखान्यात नेतात तिथे त्याला येण्याची परवानगी नसताना देखील श्रेयाला बिलगून रडत होता.

" माझं देखील तुझ्यावर प्रेम होतं श्रेयू. तुझ्या भावाने मला धमकी देवून तुझ्यापासून दूर व्हायला सांगितले होते. कुठतरी दूर शहरात निघून जायला सांगितले. माझी देखील अवस्था तुझ्यासारखीच. घरातल्यांना जीवे सोडणार नाही अशी धमकी च्या निमित्ताने काॅलेज सोडले. आणि नंतर जबरदस्ती माझे लग्न घरातल्यांनी लावून दिले मग. मनात जरी तूच होतीस , संसार मात्र परक्या स्त्री बरोबर करणे भाग होते.

उगाच आलो ना मी. दूर होतो तरी हे आपलं वेडे मन ऐकमेकांत प्रेम करत होते. माझी स्थिती पाहून मी तुला ठार विरसलो की काय वाटत असणार ना..?

आता माझ्या तरी जगण्याला काय उपयोग आहे म्हणा....."

असे म्हणून श्रीनिवास जवळच ठेवलेली सुरी स्वत:च्या पोटात आरपार घुसवून श्रेयाच्या बेडजवळ खाली कोसळून आपले प्राण सोडले होते.

दोघांच एकमेकांवर असणारं जिवापाड प्रेम त्या प्रेमात मात्र गैरसमजामुळे आलेली वादळे , एकमेकांबद्दलची ओढ, त्यातून निर्माण झालेली प्रेमभावना, अखेर मरणा नंतर ते दोघे तरी एकमेकांना भेटले असणार आणि वरती सुखाने संसार करत असतील असे बोल श्रीनिवास आणि श्रेयाचा मित्रांच्या तोंडातून बाहेर पडली होती.

" यांच एवढं मनाला वेड लावणारं प्रेम मला आधी ठाऊक झालं असतं तर मी यांच्या मध्ये कधीच आलो नसतो." श्रेयाचा भाऊ बोलत होता.

" या सगळ्याला तू जबाबदार आहे. याला तुरुंगात पाठवा. आमच्या मित्र आणि मैत्रिणीच्या जीवाचा जिवंतपणीच जीव घेतल्याचा आरोप आहे." श्रीनिवास आणि श्रेयाचे मित्र श्रेयाच्या भावाला बोलतात.

श्रेयाच्या भावाला पुराव्यानुसार तुरंगवास भोगावा लागतो. श्रीनिवास आणि श्रेया मात्र आता खरचं सुखाने संसार करत असतील. त्यांच प्रेम आता तरी सार्थ झालं असेल, हो ना...?

🎭 Series Post

View all