नाती सांभाळताना

नातं जपणे
मोना आज बऱ्याच दिवसांनी तिच्या माहेरी आली होती. तिला बघुन तिची आई म्हणाली, अरे व्वा! आज आठवण झाली का आपल्या आईवडीलांची? मागच्या दोन महिन्यापासुन धावती भेट पण दिली नाहीस तु. एवढी व्यस्त असतेस वाटत हल्ली. आमची नात सोनिया काय म्हणते? तिला नाही आणलस. तुझे सासुसासरे कसे आहेत? आणि जावईबापु काय म्हणतात?
आईचे एवढे प्रश्न ऐकुन मोना आईवर चिडली आणि आईला म्हणाली, अगं आई माझ्या घरातील सर्वजण मजेत आहे. त्यांना काय होणार आहे ? त्यांची काळजी घ्यायला मी आहे ना. आई तु सर्वांची चौकशी केलीस पण मी कशी आहे हे नाही विचारले ? कंटाळले मी ह्या नोकरीला, घरातील कामांना आणि घरातील लोकांना. कितीही करा ह्याच्यांसाठी, ह्यांच्या नातेवाईकांसाठी कमीच आहे. सगळ्यांना आनंदी ठेवता, ठेवता माझे हाल होत आहे. असे म्हणुन मोना रडायला लागली.
मोनाला रडताना पाहुन तिची आई तिला म्हणाली, मोना काय झाले बेटा रडायला. भांडण झाले का घरात कोणाशी. अगं त्यात काय एवढ. संसार म्हटलं की भांड भाड्यांला लागणारच.
आई आमच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे ना पुढच्या आठवड्यात म्हणुन राजन मला म्हणाला, आपण दोन दिवस दोघेजण महाबळेश्वरला फिरायला जाऊ. आणि आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस महाबळेश्वरला साजरा करु. मी त्याला म्हणाले, आपण दोघेजण जायचं. मम्मीपप्पा, व सोनलला पण नेऊ. तर मला म्हणाला, तुला मी माझ्या सोबत फिरायला चल म्हणतो, मला तुझ्या सोबत आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस महाबळेश्वरला साजरा करायचा आहे, तर तुला मम्मीपपप्पांना व सोनलला सोबत घेऊन महाबळेश्वरला जायचे आहे. जेव्हा मी त्यांच्या सोबत फिरायला नेतो, तेव्हा तोंड फुगवून बसतेस, म्हणतेस आपण दोघेच जाऊ फिरायला मम्मीपप्पा कशाला? तुझ्याशी कसं वागायचं तेच समजत नाही. दोन दिवस झाले तो बोलत नाही माझ्याशी.
आई, राजनसोबत मी फिरायला गेले तर मम्मीपप्पांना आवडणार नाही कारण दरवेळी त्यांना आम्ही घेऊन जातो. मम्मीपप्पा चिडतील. मम्मींना आता घरातील काम होत नाही आणि सोनलला एकट सोडुन कस जाऊ मी.
मोनाची कारणे ऐकुन मोनाची आई हसते आणि मोनाला म्हणते, मोना तु सांगत आहे त्यातील काही कारणे खरी आहेत आणि काही खोटी आहेत.

🎭 Series Post

View all