नवलाई 3

नवी नवरी

नवऱ्याला सांगून संगीताच्या पुढच्या परीक्षा द्यायच्या असं तिच्या मनात आलं. नवऱ्याशी धड बोलायलाही वेळ मिळेना. तिने एक शक्कल लढवली, सकाळी तो चहा घ्यायचा तेव्हा त्याच्यासोबत चहाचे ते 3 मिनिटं बोलता यावेत यासाठी तिची धडपड सुरू होती.

दुसऱ्या दिवशी तिने चहा बनवला आणि दोन कप घेऊन हॉल मध्ये गेली. नवरा पेपर वाचत बसलेला. तिने कप त्याच्या हातात दिला आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. ती बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात नवरा पटकन उठला आणि मागच्या दाराला झाडाला पाणी घालत असलेल्या आईच्या शेजारी जाऊन उभा राहिला.

तिच्या मनाला तेव्हा काय वाटलं असेल? किती चुकीचं वागणं आहे हे??

तिच्या नव्या नावलाईचे दिवस संपले.. आपल्या वाट्याला हेच येणार म्हणून तिने आयुष्य काढायला सुरुवात केली. नवऱ्याबद्दल प्रेम, कुटुंबाबद्दल आपुलकी वगैरे काहीही शिल्लक नव्हतं.

बरीच वर्षे उलटली,

तिची मुलं लग्नाला आली..मुलींची शोधाशोध सुरू झाली....

एक चांगली मुलगी पसंत पडली, तिच्या कुटुंबासोबत सर्वजण बस्ता करण्यास गेले. घरी आल्यावर मुलगा आईला म्हणाला,

"आई ती फार कमी बोलते गं... काय चालू असेल तिच्या मनात?"

सासूबाई आणि नवऱ्याने त्याच्याकडे पाहिलं, हे याआधी घडलं होतं.. त्यांना आठवण आली...उमजू लागलं...

"हे बघ बाळा, ती तुझी होणारी बायको आहे. काही मुलींना असते सवय कमी बोलायची, पण त्यामुळे तिला तू लगेच जज करू नकोस...मला तर माझी सून फार आवडली बाबा.."

मुलगा खुश झाला , त्याच्या मनातली शंका आईने दूर केली.

सासूबाई आणि तिचा नवरा बघतच राहिले..दोघांच्या विचारातली तफावत... खजीलता स्पष्ट दिसत होती त्यांच्या चेहऱ्यावर...

लग्न झालं आणि नवीन सुनबाई घरी आली...



🎭 Series Post

View all