नवलाई -2

नवी नवरी

नवरा नेहमीप्रमाणे खोलीत उशिरा आला, तेही पडलेलं तोंड घेऊन. तिने विचारलं, "काय झालं?"

तो मौन होता, सांगत नव्हता..

तिने फार आग्रह केल्यावर तो म्हणाला

"तुला हॉल मध्ये आमच्यासोबत बसायला काय होतं? कामं आवरून झाली की लगेच खोलीत येतेस.."

"दिवसभर मी आई बाबांसोबतच असते की, रात्री आणखी काय वेगळं बोलणार? आणि हे कारण तुम्हाला तरी पटतंय का? कारण एक हेही आहे की जेवण झालं की तुम्ही सोफ्यावर आडवे होतात, कुणी पाय पसरून बसतं तर कुणी जमिनीवरच लोळून घेतं... मी कामं करून थकून जाते, मलाही पाठ टेकाविशी वाटते...म्हणून येते मी खोलीत..आणि तुम्हीही लवकर खोलीत आलात तर बरं होईल.."

ती असं म्हटली आणि त्याने रौद्ररूप धारण केलं..

"आता बोललीस, पुन्हा बोलू नकोस..माझे आई वडील आहेत ते..मी त्यांच्याजवळ बसणार नाहीतर झोपणार, तू कोण मला अडवणारी??"
हे ऐकून तिचाही संताप झाला..पण तिने मौन राखलं..

काय करणार, एक दोन वेळा त्याची अशी तक्रार तिने माहेरी केली होती, पण माहेरच्यांना मोठा धाक,हिला सपोर्ट केला तर उद्या आपल्या दारात येऊन उभी राहील. समाजात काय तोंड दाखवणार आपण?

"बेटा ते म्हणतात तसं कर...वाद वाढवू नको.."

असा सल्ला तिला मिळाला,

तिनेही ऐकलं,

कितीही दमली असली तरी जेवण झाल्यावर ती सर्वांसोबत बसायला लागली,

आता मात्र सासूबाईंना पेच पडला, कारण याच वेळात त्या कविताची तक्रार तिच्या नवऱ्याकडे करत...

त्यांच्या चर्चेत कविता रस दाखवायचा प्रयत्न करायची..पण तिला कुणी बोलुही देत नसे. तिचं बोलणं उडवून लावायचे..

एकदा सहज तिच्या दिराच्या लग्नाचा विषय निघाला, हसी मजाक सुरू होता, ती म्हणाली,

"भाऊजी कशी मुलगी हवीय तुम्हाला सांगून द्या..माझ्या ओळखीत आहे बरं चांगल्या मुली.."

दिर हसला, "चालेल वहिनी बघा तुम्हीच.."

तेवढ्यात सासूबाईंनी टोकलंकलं,

"नको नको बाई, तुझ्या गावची तर अजिबात नको.."

"बरं मग माझ्या मैत्रिणींमध्ये बघते.."

कविताने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला..

"मैत्रीण तर अजिबात नको..." सासूबाई हात जोडून म्हणू लागल्या

तिला प्रश्न पडला,

आपण यांच्यात बसावं यासाठी यांचा हट्ट, बरं चर्चेत सहभागी झालो तर पदोपदी अपमान...का बसावं मग यांच्यात??

नवरा खोलीत आल्यावर तिने नवऱ्याला फैलावर घेतलं,

"काय हो? तुम्हीच म्हणता ना की बसत जा सर्वांसोबत.. काय झालं त्याचं??? पाहिलं ना तुम्ही? हा असा अपमान ऐकायला बसू का मी??"

नवऱ्याकडे उत्तर नव्हतं, दुसऱ्या दिवसापासून तिला खोलीत लवकर येण्याबद्दल त्याने टोकलं नाही..

तिला संगीताची आवड होती,


🎭 Series Post

View all