पाऊस दोघांचा

पाऊस दोघांचा
प्रेमी :

पाऊस
पहिल्या भेटीत
माझ्या भिजणाऱ्या मनात
प्रेमात अन विरहाच्या क्षणांत...

भूमिपुत्र :

पाऊस
पाहुणा आला
दारी सुखाची मधुबाला
सखे पेरणीचा मुहूर्त झाला...

प्रेमी :

पाऊस
गोड आठवणींला
आला प्रेम बहरण्याला
आला प्रेमाचे रंग उधळण्याला...

भूमिपुत्र :

पाऊस
पीक वाढले
रान हिरवेगार झाले
कारभारणीच्या मुखी हसू आले...

प्रेमी :

पाऊस
धुंद क्षणांला
तुझ्या माझ्या मिलनाला
प्रीत मंजुळ गाणे गाण्याला...

भूमिपुत्र :

पाऊस
मोती फुललं
त्याला आले फुले
वाऱ्यासह तेही आनंदात झुले...

प्रेमी :

पाऊस
बेधुंद रात्रीत
सखी सख्याच्या मिठीत
मुसळधार मनी प्रीती वाहत...


भूमिपुत्र आणि प्रेमी :

पाऊस
भरती आनंदाची
चार प्रेमळ क्षणांची
साथ देई तुमची आमची


- श्री ?️✍️

🎭 Series Post

View all